Monday, 17 November 2025

 👌 *प्राचिन बुद्ध इतिहास प्रेम संदर्भामुळे साहित्याला नविन चेतना आली !* (ब्राम्हणी मराठी साहित्याने प्रेम संदर्भाचे विकृतीकरण केले) *प्राचीन बुद्ध साहित्य आणि मराठी भाषा - साहित्य उगम एक इतिहास आलेख.* भाग २

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

एक्स मेडिकल ऑफिसर एवं हाऊस सर्जन 

आंतरराष्ट्रीय परिषदेतील संशोधन पेपर परिक्षक 

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षा, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


           बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ हे बुध्द विचारासोबत निगडित विषय आहे. आरोग्य व आनंदासाठी स्वतः:वर प्रेम करणे हे फार सोपे आहे. *"प्रेम ही एक शक्तिशाली , सकारात्मक उर्जा आहे. जी शरिर आणि मन यांच्यातील निरोगी संतुलनासाठी ती आवश्यक आहे."* इतर व्यक्तींंचे प्रेम ओळखणे हा सहज विषय नाही. बुध्द साहित्यातील प्रेम संदर्भ प्रामाणिक अंतर्मनाचा साद घालतो. प्राचिन बुध्द कालखंड हा पहिला बुध्द - *ताण्हणकर बुध्द* ह्यांचेपासुन २८ वे *शाक्यमुनी गोतम बुध्द* असा लांब हा कालखंड आहे. तर चवथे बुध्द *दीपांकर बुद्ध* हे तर शाक्यमुनी बुध्द होण्याचे पहिले भविष्य कथन दानवीर - *सुमेध* ह्या श्रीमंत व्यापा-याला बघुन करतात. अर्थात ही बुध्द परंपरा *"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या नगरीय संस्कृतीधारेपासुन ती पुढे चालत आलेली दिसुन येते. आणि प्रेम / नैतिकता / ध्यान भावना ही उदात्त संकल्पना बुध्द संस्कृतीची एक मोठी देण आहे. त्यासोबतच प्राचिन स्तुप / भित्ती चित्र ही शिल्पकृतीसुध्दा बुध्द इतिहासाची ती साक्ष देतात. *"लोकशाही पध्दती"* (लोक शासन) ही प्राचिन बौध्द भिक्खु संघातील विशेष पध्दती आपल्याला दिसुन येते. आणि हा संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी संविधान सभेत २५ नोव्हेंबर १९४९ च्या अंतिम दिलेल्या स्व-भाषणात तो केलेला आहे. प्राचिन बुध्द भिक्खु संघामध्ये विद्यमान असलेली *"लोकशाही"* (Democracy) ही *"प्रेम / मैत्री / बंधुता / अहिंसा /करूणा"* ह्या उदात्त भावनेची अनुभुती करून देते. आणि *"जगत मानवतेचा"* हा विषय संदर्भ इतिहासाची साक्ष देतो. सोबत *"सौंदर्यशास्त्र "* आणि *"नैतिकवाद"* उदात्त भाव मग ते आलेचं.

           राजकुमार सिध्दार्थ आणि सिध्दार्थाचे सम्यक संबुध्द होणे, ह्या मध्य काळात सिध्दार्थ महाराणी - *"यशोधरा"* हिचे ते निस्सीम प्रेम / त्याग / जबाबदारी / वेदनांचे आकलन आम्ही कसे करणार ? हा अहं प्रश्न आहे. ह्याशिवाय वैशाली राज्याची नगरवधु *"आम्रपाली"* हिच्या सौंदर्याची ख्याती दुरवर होणे / तिचे मगध देशाचा महान सम्राट *बिंबिसार* ह्यांच्या सोबतचे निस्सीम प्रेम संबंध / आम्रपाली हिला तिचा प्रेमी शत्रु देशाचा राजा आहे म्हणून देश-प्रेमासाठी त्या दोघांचे वियोग होणे, हा संदर्भ सहज विषय नाही. आम्रपाली ही आपला महाल / आम्रवन हे बुध्द भिक्खु संघाला दान करणे / सम्राट बिंबिसार - आम्रपाली ह्यांचा एकुलता एक मुलगा *विमल कौंडिण्य* ह्यांचे ही नंतर बुद्ध भिक्खु बनने / ह्या आधी *आम्रपाली* हिने बौध्द भिक्खुणी बनुन *"अर्हत"* अवस्थेला प्राप्त होणे, ह्यामध्ये बुद्ध काळात *"स्त्री स्वातंत्र अधिकार"* हा सुध्दा आपल्याला दिसुन येत आहे. *आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही मान्यवर, प्राचिन बौध्द साहित्यातील *"चार महासुर्य"* दिसुन येतात. आणि बोधिसत्व अश्वघोष हे आपल्या स्व-प्रेम जीवनातील संदर्भ *"उर्वशी वियोग"* ह्या स्वरचित नाटकात ते अधोरेखित करतात. बुध्द साहित्यात *"विभत्स प्रेम संदर्भ"* हे दिसुन येत नाही. *बोधिसत्व अश्वघोष* हे कुशल नाटककार / संगितकार / विचारविद / कुशल वक्ता ही आहेत. अश्वघोष ह्यांच्या सर्व लिखाणात *"सौंदर्यशास्त्र / नीतिशास्त्र / दर्शनशास्त्र / मानवशास्त्र एवं नैतिक वाद"* ह्या विषयाचा आपल्याला बोध होतो.

          *कवि कालिदास* ह्यांनी *"अभिज्ञान शाकुंतलम्/ विक्रमोर्वशीयम्/ कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदुतम् / ऋतुसहांरम्"* इत्यादी ४० संस्कृत रचना लिहिल्याचे सांगितले जाते. कालिदास ह्यांचेवर *आचार्य अश्वघोष* ह्यांच्या बुद्ध साहित्याचा प्रभाव हा दिसुन येतो. शिवाय *"अपभ्रंश भाषा साहित्य"* ह्याचाही प्रभाव ही दिसुन येतो. परंतु कालिदास ह्यांचा *"जन्म कधी - कुठे झाला ?* तसेच *मृत्यू ही कधी - कुठे झाला ?"* हे एक ना सुटणारे कोडे आहे. कालिदास हा *"काल्पनिक पात्र "* सिध्द होतो. अर्थात *कालिदास* ह्या नावाने *"इसवी दहाव्या - बाराव्या शतकानंतर कुणीतरी ही रचना"* लिहिलेली असावी ? ह्या संशयाला जागा मिळते. तसेच *"अभिज्ञान शाकुंतलम्"* हे संस्कृत नाटक *"राजा दुष्यंत - शाकुंतला"* ह्यांचे प्रेम - स्वयंवर - वियोग ह्यावर लिहिलेले आहे. प्राचिन बुध्द साहित्यात *"सम्राट बिंबिसार - आम्रपाली"* ह्यांचे निस्सीम प्रेम - वियोग हा इतिहास आहे. परंतु शाकुंतल हे नाटक *"स्त्री अंगाचे विभत्स चित्रण"* करीत *"भोगवाद"* ह्या मानसिकतेची जाण करुन देतो. ही अ-मर्यादा बुध्द साहित्यात ओलांडलेली दिसुन येत नाही. तसेच *"रघुवंशम् / कुमारसंभवम्"* समान ह्या संस्कृत भाषा रचना इसवी *"दहाव्या - बाराव्या शतकातील"* इतिहास पात्राकडे घेवुन जातांना दिसुन येतो. साहित्य लिखाणातील संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* प्रभावाची आहे. *"हिब्रू संस्कृत भाषा"* नाही. हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ब्राह्मी आहे. तर  क्लासिकल संस्कृत भाषा लिपी ही देवनागरी लिपी आहे. इसवी ११००० मध्ये देवनागरी लिपीचे प्रारुप तयार करण्यात आले. शिवाय कालिदास हा *"चरवाह"* असल्याचे विशेष सांगितले जाते. *वैदिक /  ब्राह्मण वर्ग* आशिया खंडात *"चरवाह"* असल्याचा इतिहास आहे. तेव्हा प्राचिन कालखंड  *"लिपी - भाषा - साहित्य"* ह्या प्रमुख बिंदुवर आपण चर्चा करु या.

              *"सिंधु घाटी सभ्यता"* कालखंडात इ. पु. ३३०० - १९०० मध्ये सापडलेली प्राचिन *"लिपी"* ही अजुनही वाचली किंवा समजली गेलेली नाही. आणि *"शाक्यमुनी गोतम बुध्द"* काळात इ.पु. सातव्या - सहाव्या शतकातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही मात्र वाचल्या / समजल्या गेलेली आहे. गोतम बुद्ध काळात बोली भाषा ही *"पाली प्राकृत भाषा"* होती. चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य ह्यांचे समस्त *"शिलालेख हे ब्राम्ही लिपीमध्ये"* कोरले गेले. ह्याशिवाय प्राचिन *"ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर सुध्दा लिपी अंकित असल्याचा प्राचिन इतिहास साक्ष आहे. श्रीलंका देशातील *"सिंहली"* भाषेत ताडपत्रावर *"त्रिपिटक"* हा बौध्द धम्म ग्रंथ कोरल्याचा प्राचिन इतिहास आहे. सदर प्रकारचे शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र हे मात्र *"वैदिक / ब्राह्मणी संस्कृतीचा"* इतिहास कथन करीत नाही. इसा पुर्व चवथ्या - तिस-या  शतकात *"पाली भाषा"* ह्यावर संस्कार होवुन *"हिब्रू संस्कृत भाषा"* ही उदयाला आली. लिपी मात्र ही *"ब्राम्ही लिपी"* होती. हाच कालखंड बुध्द धर्माचे *"हिनयान - महायान संप्रदाय"* विभक्ती करण्याचा आहे. हिनयान संप्रदायाने *"पाली"* भाषेचे जतन करून *"त्रिपिटक"* ह्याला मान्यता दिली. तर महायान संप्रदायाने *"हिब्रू संस्कृत"* भाषेचा अविष्कार केला.*"हिब्रु संस्कृत भाषा व्याकरण"* लिखाण कर्ते म्हणुन *"ऐंद्र / चांद / शाकट / पाणिनी / कातंत्र / शशीदेवश्रती / दुर्गविवृती / शिष्य हिताव्रती"* ह्या आठ मान्यवरांचा उल्लेख दिसुन येतो. *पाणिनी* हे चवथ्या क्रमांकावर असुन ते बौध्द विद्वान होते, असा प्राचीन इतिहास आहे. बुध्द कालखंडात *"बम्हण"* हा शब्द *"ब्राह्मण वर्ग"* ह्या अर्थाने प्रयोगात नसुन, "बम्हण" शब्द हा *"समन / श्रमण / विद्वान"* या अर्थाने प्रयोगात होता. तसेच *"चातुर्वर्ण्य व्यवस्था"* ही त्याकाळी अस्तित्वात नव्हती. *"साक्य वंस / कोलिय वंस / हरयक वंस / मौर्य वंस"* ह्या प्रकारे "वंस राज सत्ता" अस्तित्वात होती. *"हिब्रू संस्कृत भाषा"* ह्यानंतर सातव्या- आठव्या शतकात *"अपभ्रंश भाषा साहित्य"* हिचा उगम होतो. त्यानंतर १२ व्या शतकात *"आदी हिंदी भाषा - साहित्य"* हिचा उगम होतो.*"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजेचं आदि हिंदी भाषा होय."* ह्यानंतर १८ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा - साहित्य"*  हिचा उदय होतो.

           *"रामायण / महाभारत"* ही हिंदु धर्म ग्रंथ नाहीत. तर कविंनी रचलेली ती *"महाकाव्य"* आहेत. *"महाभारत"* ह्या महाकाव्याचे मुळ नाव *"जय"* असुन *महर्षी व्यास* हे सदर ग्रंथाचे *"रचयिता"* नाहीत. त्यांनी केवळ ग्रंथ *"संपादन"* केल्याचा इतिहास आहे. तेव्हा संपादित केलेल्या महाभारतात केवळ ८,८०० श्लोक होते. सदर मुळ प्रत ही आज उपलब्ध नाही. दुसरे संपादन *वैशंपायन* ह्यांनी केले असुन ग्रंथात २४,००० श्लोक आहेत. नंतर संपादित झालेल्या ग्रंथात १ लाख श्लोक दिसुन येतात. वाल्मिकी *"रामायण"* मधील "अयोध्या कांडात" (१०९/३४) बुध्दाला *"चोर"* म्हटल्याचा संदर्भ आहे. *"यथा हि चोर: से तथा हि | बुध्दस्तथागतं नास्तिकमंत्र विध्दी ||"* सुरेंद्र अज्ञात ह्या लेखकानी तर रामायण / महाभारत *"फर्जी"* असल्याचे म्हटलेले आहे. रामायण ग्रंथातील "अयोध्या कांड" (६६) मध्ये *सिता* ही वयाने रामापेक्षा मोठी सांगितली आहे. सदर महाकाव्यात रामाला *"मंद बुध्दी"* तसेच *"पौरूष्य अभावाचा"* ही उल्लेख आहे. सदर महाकाव्य हे *"कागदावर"* लिखित आहे. ह्याशिवाय *"वेद / उपनिषद"* ही धर्म ग्रंथसुध्दा कागदावर लिखित आहेत. सदर ग्रंथाची मुळ प्रत *"शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित असल्याचा इतिहास नाही. इसवी ८५० मध्ये *शंकर* नावाचा व्यक्ती जन्माला येतो. त्याला *"प्रछन्न बौध्द"* ही म्हटले जाते. तथागत बुध्दाच्या महापरिनिर्वाणानंतर पुढे धर्मात *"हिनयान - महायान"* संप्रदाय अशी दोन भागात विभागणी झाली. ह्यावर आपण चर्चा केलीच आहे. महायान संप्रदायातुन *"वज्रयान संप्रदाय"* ह्याचा उदय होतो. वज्रयान संप्रदायातुन *"तंत्रयान संप्रदाय"* ह्याचा उदय होतो. तर पुढे वज्रयान / तंत्रयान संप्रदाय हे *"शैव पंथ/ वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* निर्माण करतात. शंकर हा माणुस *"आदि शंकराचार्य"* बनुन चार पीठाची निर्मिती करतो. जसे : उत्तर - ज्योतिर्मठ पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - ऋंगेरीपीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) / पुर्व - गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम - द्वारका पीठ, गुजरात (सामवेद). आणि आदि शंकराचार्य हा समस्त *"बुध्द महायान विहारावर"* आपले अधिपत्य करतो. *"कागदाचा शोध"* हा दहाव्या शतकात *"चीन"* ह्या देशात लागलेला आहे. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत काहींच्या मते *"सन १४६२"* साली तर काहींच्या मते सन २००५ साली *"युनोस्को"* ला सादर करण्यात आली. अजुन कोणता पुरावा हवा आहे ? हा प्रश्न आहे.

           प्राचिन *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ह्यानंतर भारतीय क्षेत्र उगम आधारे जन्माला आलेल्या अन्य लिपी *"दोन भागात"* विभागणी करता येईल. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दुसरी - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय भारत वर्षातील *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"* ह्या प्राचिन लिपी प्रकारांचा उल्लेख करावा लागेल. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारुप"* स्वरूपात उदयास आली. इसवी १७९६ ला *"देवनागरी लिपी"* ही व्यवहारात आली. इसवी १६४५ हा कालखंड *"उर्दु लिपी"* सोबत सलग्न आहे. *"मराठी भाषा पहिला शिलालेख"* हा इसवी ७०५ सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे आढळला. *दुसरा शिलालेख* हा इसवी १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला आहे. *तिसरा शिलालेख* हा इसवी १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. *चवथा शिलालेख* सन १०३९ सालचा हा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे आढळला. ढोबळमानाने मराठी भाषेला १८०० वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी २००० वर्षाचा इतिहास हा आवश्यक असल्याने, बौध्द राजे सातवाहन काळातील *"नाणेघाट शिलालेख"* ह्याचा आधार घ्यावा लागलेला आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. मराठी भाषा तज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"संमत सिध्दांता"* द्वारे मराठीचे मुळ हे *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी भाषा मानलेली आहे. या ठिकाणी दुर्गा भागवत ह्या संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* संदर्भात बोलतांना दिसतात. तर *प्रा. हरी नरके* ह्यांनी तर *"मराठी भाषा ही इसवी पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती झाली. आणि शौरसेनी भाषेपासुन मागधी / देशाची ह्या दोन भाषेची उत्पत्ती झाली,"* असा जावई शोध लावला. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट-प्रकार दिसुन येतात. उपरोक्त संदर्भ हे मराठी भाषा - साहित्याला *"बुध्द भाषा - साहित्याचा प्रभाव"* इंगित करतांना दिसुन येते.

           *"मराठी भाषा आणि साहित्य"* ह्या उगम दिशेकडे गेल्यास *संत नामदेव महाराज* हे आपल्या अभंगात म्हणतात, *"बुध्द अवतारी आम्ही झालो संत | वर्णावया मात नामा म्हणे ||"* दुस-या अभंगात ते म्हणतात, *"मध्ये झाले मौन देव निज घ्यावी | बौध्द ते म्हणोनी नावे रुप ||"* ह्या अभंगात संत नामदेव महाराजांचे पंढरपूरचा विठोबा अर्थात - *"बुध्द ह्यांच्या प्रती असलेली खरी प्रेम भावना"* ही दिसुन येते. संत नामदेव परिवारातील *संत जनाबाई* ही सुध्दा आपल्या अभंगात म्हणते, *"होवुनिया कृष्ण कंस वधियेला | आता बुद्ध झाला सखा माझा ||"* तसेच दुस-या अभंगात म्हणते, *"ऐसा कष्टी होवुनी बौध्द राहिलासी ||"* ह्या अभंगात संत जनाबाईची प्रामाणिक निष्ठा संत नामदेव महाराज ह्यांच्या प्रती दिसुन येते. संत चोखामेळा महाराज ह्यांची पत्नी *संत सोयराबाई* ही तिच्या अभंगात म्हणते, *"देह असुनही तु ही देही | सदा समाधिस्त राही | पाहाते पाहणे गेले दुरी | मने चोखीयाची महारी ||"* ह्या अभंगात सोयराबाई हिचे संत चोखामेळा ह्यांचे प्रती असलेले खरे प्रेम आणि काळजी करणे ही दिसुन येते.  ब्राह्मण समाजाचे *संत एकनाथ महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात, *"नवबा बैसे स्थिररुप | त्या नाम बौध्दरूप || संत तया दारी | तिष्ठाताति निरंतरी ||"* एकनाथ महाराज ह्यांची बुध्दाप्रती असलेली ही निष्ठा उच्च वर्गाला सहन झालेली नाही. *संत तुकाराम महाराज* हे त्यांच्या अभंगांत म्हणतात, *"नावे रुपे अंगी लावला विटाळ | होते ते निर्मळ शुध्द बुध्द ||"* दुस-या अभंगात ते म्हणतात, *"शुध्द त्यासी शुद्ध बुद्ध व्हावे ||"* संत तुकाराम महाराज ह्यांचे बुध्दाप्रती असलेली प्रेम निष्ठा आम्ही समजून घेणार आहोत की नाही ? हा प्रश्न आहे. कारण ब्राह्मणी मराठी साहित्याने ह्या संतांना वंचित करुन *संत ज्ञानेश्वर महाराज / संत रामदास स्वामी* ह्यांचा फार उदोउदो केलेला आहे. तर मराठीचे आद्य कवि म्हणुन *मुकुंदराज / संत ज्ञानेश्वर महाराज* ह्यांना अग्रस्थानी ठेवलेले आहे. आणि *संत नामदेव महाराज / संत चोखामेळा / संत जनाबाई* ह्या थोर मराठी आद्य कवि ह्यांच्यावर अन्याय केलेला आहे. हा झालेला अन्याय आम्ही तो दुर करणार काय ? हा प्रश्न आहे.

             बुध्द धर्म हा *"प्रेम / मैत्री / शांती / अहिंसा / प्रज्ञा / शील / करुणा / स्वातंत्र्य / समता / बंधुता / न्याय / लोकतंत्र"* इत्यादी आयामांचा खरा पुरस्कर्ता आहे. आणि ही समस्त आयामे एकमेकांसोबत सलग्न झालेली आहेत. अर्थात ती मानवतेची प्रामाणिक निष्ठा कास बांधणारी आहेत. *"प्रेमात पडणे / त्यात राहाणे / जाणते म्हणा वा अजाणेतुन बाहेर पडणे / हृदयभंग होणे, खरे तर हा प्रेमाचा (?) अलग विषय म्हणायला हवा."* प्रेमाच्या ख-या वास्तव्याची अनुभुती बौध्द धर्म हा *"मैत्री / बंधुता / करुणा / समता / न्याय"*  ह्या समस्त आयामासी ती निगडीत आहे. *"आनंद"* ही दुसरी व्यक्ती सहजपणे आपल्याला देत नसते. आपल्याला ती स्वतः निर्माण करावी लागत असते. *"नातेसंबंध"* जीवंत राहाणे हा अपरिहार्य भाग आहे. म्हणुन निरोगी, दिर्घकालीन, मजबुत, आंतरीक गाभा हा विकसित करणे हे परिपूर्ण आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली मानली जाते. *तथागत बुध्दांनी* स्वतः सोबतचं इतरांच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. *बुध्द साहित्य असो वा आंबेडकरी साहित्यात केवळ विद्रोह आणि नकार आहे,"* असा आरोप ब्राम्हणी मराठी साहित्यिकांनी केलेला दिसुन येतो. आणि आमची तथाकथित साहित्यिक ही त्या संदर्भाला बळी झालीत. परंतु बौध्द साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद / प्रेम / मैत्री"* इत्यादी आयामांना समजण्याची पात्रता वा मेरीट ब्राम्हणवादात कुठे आहे ? ह्या वर्गानी तर सहजपणे बौध्द साहित्यावर आपले स्व-अधिपत्य निर्माण केले आहे. *"ब्राह्मण्य मराठी"* हे लेबल लावले आहे. ब्राम्हण्य मंडळी साहित्याचा जो काही उपभोग घेत आहेत, ती सर्व काही *"बौध्द साहित्याची प्राचिन देणं"* आहे. मग ती *"गांधार कला / मथुरा कला"* ह्या शिल्पकला कां असे नां ? तेव्हा आता काही पात्र संदर्भावर चर्चा करु या.

           शाक्यकुमार *"सिध्दार्थ - यशोधरा"* ह्यांच्या जीवनातील प्रेम संदर्भ / किंवा शाक्य संघातील पाणीसंघर्ष विवाद आणि सिध्दार्थाचा गृहत्याग / यशोधरा हिच्या त्याग आणि कुटुंब जबाबदारी / सिध्दार्थ ह्याचे बुद्धत्वाला जाणे / धम्माला आपला पुत्राचे दान करणे आणि यशोधरा हिचे धम्माला पुर्णत: समर्पण होणे, ह्या समस्त जीवन प्रसंगात *"प्रेम, सौंदर्यशास्त्र, नैतिकवाद"* आम्ही शोधणार की नाही ? की नकार / विद्रोह ह्यावर चर्चा करणार ? हा प्रश्न आहे. *"चक्रवर्ती सम्राट अशोक - देवी"* ह्यांचे मिलन - प्रेम - विवाह होणे / शाक्य कुमारी देवी उर्फ वेदिसा उर्फ महादेवी हिची बुध्द श्रध्दा / सम्राट अशोकाच्या जीवनातील देवीचे स्थान आणि अशोकाचे बुध्द धर्माकडे जाणे / ८४ हजार स्तुपांचे - शिलालेख निर्माण / सम्राट अशोकाचे इतिहासात अजरामर होणे, ही संपूर्ण विषय बुध्द संदर्भाची भाषा सांगतात. *"महात्मा ज्योतिबा फुले - सावित्रीबाई"* ह्यांचे घरातुन बाहेर पडणे / सावित्रीबाई हिची म. फुलेंंना साथ देणे / फुलेंच्या शिक्षण मिशनमध्ये पुर्ण सहभाग देणे / अपमान सहन करुन स्त्रीयांना शिक्षित करणे / दत्तक पुत्र घेणे / फुलेंचे मिशन पुढे चालविणे / ज्योतिबा - सावित्री ह्यांच्या अंतर्प्रेमभावाचे काय ? , ह्या समस्त विषयात फुले परिवाराचे *"प्रेम, त्याग आणि जबाबदारी"* आम्हाला एक चिंतनाचा एक मोठा विषय आहे. आणि पुणेरी ब्राह्मण साहित्यिक हे *"ज्योतिबा फुलेंच्या लिखाणामध्ये व्याकरण"* शोधित बसले होते, ह्याला आम्ही काय म्हणावे ? *"डॉ बाबासाहेब आंबेडकर - रमाई"*  ह्यांचे शालेय वयात झालेले झालेले लग्न / रामजींचे जगाला निरोप दिल्यावर रमाई मातेवर आलेली जबाबदारी / पाठोपाठ मुलांचा मृत्यु होणे आणि हलाखीची घरची स्थिती / घर सांभाळताना रमाई आईचे बाबासाहेबांना *"घरच्या स्थितीची"* ती जाणिव न देता फार कष्ट करणे / बाबासाहेब ह्यांचे रमाई आईला पत्र लिहिणे वा रमाई आईचे बाबासाहेब ह्यांना पत्र लिहिणे / बाबासाहेब हे विदेशात शिक्षणाला असतांना बाबांच्या अभ्यासावर परिणाम होवु नये म्हणुन *"बाळाचा मृत्यु लपवुन"* ठेवणे / बाबासाहेब विदेशात बोटीवर जातांना रमाई आईचे निरोप देतानांचे अश्रु / बाबासाहेब विदेशातुन शिक्षण घेवुन आल्यावर त्यांचा सत्काराला नविन लुगडे नसल्याने बाबासोबत न जाण्याचा काही बहाणा करणे / आणि बाबासाहेब सत्काराला गेल्यावर छ. शाहु महाराजांनी बाबासाहेबांना भेट दिलेली शाल ही लुगडे समान घालुन दुरुनचं बाबासाहेब ह्यांचा सत्कार बघणे / रमाई आईने पंढरपुरच्या विठोबाचे दर्शन इच्छा केल्यावर बाबासाहेब ह्यांचे देवदर्शनास मना केल्यावर न जाणे / रमाई आईचा जगाला निरोप देणे / रमाईच्या जाण्याने बाबासाहेबांचे खचुन जाणे / बाबासाहेब - रमाई ह्यांच्या अंतर्प्रेमभावाचे आकलन ? आम्ही करणार आहोत की नाही ? भारतीय संविधान लिहितांना स्वातंत्र्य - समता - बंधुता - न्याय ह्या बुध्द विचाराचा आदर्श ठेवणे, ह्या समस्त विषय संदर्भात आम्हाला *"प्रेम / सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद"* दिसत नसल्यास, तो दोष हा मात्र आमच्या *"प्रज्ञा चक्षुचा"* म्हणायला हवा नां ! कारण ब्राम्हणी वर्ग साहित्यिकांना *"आंबेडकरी साहित्यात केवळ नकार आणि विद्रोह दिसुन येतो,"* ह्याला काय म्हणावे ? आमची साहित्यिक वर्गाचे गप्प राहाणे ? ह्याबद्दल न बोललेले बरे. ब्राह्मण धर्मीय *संत ज्ञानेश्वर महाराज* हे रेड्याकडुन वेद वदवुन घेतात / ज्ञानेश्वर महाराज भींत चालवतात हा चमत्कार / इतकेच नाही तर *संत रामदास स्वामी* (नारायण सुर्याजीपंत कुळकर्णी  ठोसर) त्यांच्या "दासबोध" ग्रंथातील अभंगांत म्हणतात, *"संसार मुळीचा नासका | विवेक करावा नेटका ||"* / अर्थात संसारातुन पळ काढणारे ह्या संताचा उदोउदो करण्यात ब्राह्मण्य साहित्यिक वर्ग धन्यता मानतात. तेव्हा ह्या उच्च वर्गीयांच्या साहित्य दर्जाची खरी जाण होवुन जाते. ब्राम्हणी साहित्यिकांच्या ह्या *"भोगवाद / अनैतिकवाद"* विचारांची आम्ही समिक्षा करणार की नाही ? ह्या मराठी साहित्यावर आम्ही आपले अधिपत्य निर्माण करणार की नाही ? आमचा *"प्रज्ञा चक्षु"* उघडणार आहोत की नाही ? हा प्रश्न आम्ही सर्व साहित्य मंडळींना करीत आहोत. 

        जय भीम !!!!


-------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर, दिनांक १८ नोव्हेंबर २०२५

No comments:

Post a Comment