Tuesday, 25 March 2025

 👌 *ह्या निसर्ग बुद्धात !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


शब्दांची गोड भाषा

मनाचे आपलेपण

प्रेम बंधनाचा गंध

विश्वासाचा धबधबा

हातात हात असणारी मैत्री

आयुष्याची संग सोबत

जीवनात असणारा संघर्ष

बुध्दमय करुणा भाव

पंचशील अष्टांग मार्ग

आयुष्य एक गाथा आहे

सत्य माणुसपणाची .…!

सुर्याचे नित्य उगवणे

निसर्गाची ती पहाट

वर्षा ऋतुचे आगमन

विविध फुलांचे बहरणे

फुल गंधाची मोहकता

निष्पाप पक्षांचे बागडणे

चंद्र शीतल किरण छाया

मनाला मिळणारा आनंद 

हा पुर्णत: शुद्ध असतो

भेसळ ती कधी नसतेच

ह्या निसर्ग बुद्धात... !!!


*************************

नागपूर दिनांक २४/०३/२०२५

No comments:

Post a Comment