👌 *प्राचिन बौध्द स्त्री साहित्यातील स्त्रीयांचे स्वातंत्र आणि अधिकार !!!*(ब्राम्हणी धर्माने स्त्रीला मानसिक / शारिरीक गुलामी दास्य दिले)
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न. ९३६०९८४१३८, ९२२५२२६९२२
प्राचिन *"बौध्द स्त्री साहित्य"* संदर्भ हा बुध्द धर्माशी निगडित असा विषय आहे. *"थेरी गाथा / थेरा गाधा"* ह्या प्राचिन दोन ग्रंथापैकी "थेरीगाथा" हा ग्रंथ *"स्त्री संगित"* ह्या विषयाचे संकलन आहे. ह्याशिवाय *"यशोधरा (काव्य) / भिक्खुणींच्या कविता"* आणि ग्रंथ हे उपलब्ध आहेत. वरिष्ठ बौध्द भिक्खुणी वर्ग ह्या आपले रचित गीत कनिष्ठ भिक्खुनीकडुन वदवुन घेत असत. थेरीगाथेमध्ये काही कथांचाही समावेश दिसून येतो. *भिक्खुणी पटाचारा* ह्या साहित्य लिखाण करणा-या भिक्खुणीचा उल्लेख बुध्द स्त्री साहित्यात दिसुन येतो. संयुक्त निकायात *भिक्खुणी खेमा* / अंगुत्तर निकायात *भिक्खुणी विशाखा* हिचा उल्लेख दिसुन येतो. स्त्री वर्गाला *भिक्खुणी* (सन्यास) होण्याचा पहिला अधिकार हा *भदन्त आनंद* ह्यांच्या मार्फत बुध्दाने प्रदान केलेला आहे. सिध्दार्थ ह्यांची मावशी (पालनकर्ती आई) *महाप्रजापती* हिला *बौद्ध भिक्खुणी* बनण्याचा पहिला मान मिळाला. ह्याशिवाय *"मित्ता / तिस्सा / उब्बीरी / विजया / किस्सा गौतमी / पतली गौतमी / बम्हण कन्या चंदा"* ह्यांच्या कविता लिखाणांचा संदर्भ आहे. बुध्द साहित्यात स्त्री वर्गाला सन्मानित हे स्थान होते. उच्च शिक्षण घेण्याचा अधिकारही होता. स्त्री वर्गाला पुरुष बरोबरीचा दर्जा होता. स्त्री वर्गाला उत्तराधिकारी करण्याचा अधिकार होता. बौध्द साहित्यात स्त्री वर्गाला घृणा दृष्टीने बघितले जात नसे. बौध्द साहित्यात स्त्री ही *"निर्वाण"* अवस्था प्राप्तीचा संदर्भ आहे. बौध्द साहित्यामध्ये स्त्री वर्गाला गृहस्थ जीवनात मानाचे स्थान होते. काही उच्च वर्गीय स्त्री / पुरुष लेखकांनी *"बुध्दाचा भिक्खुणी"* बनण्याला विरोध असण्याचे संदर्भ दिलेले दिसुन येतात. त्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोतचं. परंतु बुध्द धर्मात असलेल्या भिक्खुणी संदर्भात प्रथम चर्चा करु या.
बौध्द भिक्खुणी संघात सर्वात अग्रणी / वरिष्ठ *महापजापती गोतमी* / ज्ञानामध्ये अग्रणी - *खेमा* / विनय ज्ञानसंपन्न - *पाटाचारा* / धम्म विश्लेषिका - *धम्मदिन्ना* / धम्म तल्लिन अग्रणी - *सुन्दरीनंदा* / धम्म उर्जावान - *सोना* / धम्म दिव्यदृष्टी अग्रणी - *सफुला* / तिव्र अंतर्दृष्टी अग्रणी - *भद्दा कुंडलकेशा* / स्मरणशक्तीमध्ये धारिका - *भद्दाक्कचना* / भारी वस्त्र धारिका - *किसा गोतमी* / धर्मामध्ये आस्था धारिका - *सिंंगालक माता* ह्या बौद्ध भिक्खुणीचा संदर्भ देता येईल. तर उत्तम गृहिणी वर्गात - शरण जाण्यात प्रथम अग्रणी - *सेनियाश्वेता* / दानकर्ता अग्रणी - *विशाखा* / धम्म शिकण्यात अग्रणी - *खुज्जुतारा* / मेत्ता निवास प्रबंधक अग्रणी - *सामावती* / अवशोषण अग्रणी - *उत्तरानंद माता* / उत्तम वस्तु दाता अग्रणी - *सुप्पवसा कोलियधिता* / रोगी सेवा करणारी - *सुप्पिया* / अनुभव आत्मविश्वास अग्रणी - *कातियानी*/ विश्वसनियता अग्रणी - *नकुलमाता* / मौखिक संचरणात विश्वास अग्रणी - *कुरारधारा काली* ह्या स्त्री वर्गाचा विशेष उल्लेख करता येईल. ह्याशिवाय वैशालीची नगरवधु *आम्रपाली* हिचा विशेष उल्लेख करता येईल. आम्रपाली हिने तर *अर्हत* अवस्था प्राप्त केली. तसेच ब-याच भिक्खुणी वर्गानी *"अर्हत"* ही अवस्था प्राप्त केल्याचा बुध्द धम्मामध्ये संदर्भ आहेत. *"बौध्द भिक्खु संघात"* आध्यात्मिक दृष्टीने सर्वोच्च स्थानावर *भदंत महाकश्यप* ह्यांचा उल्लेख आहे. महाकश्यप ह्यांचाप्रमाणेच *"भिक्खुणी संघाची - भदंत भद्दा"* (धम्मसुत्त ३७) थेरीने सर्वोच्च स्थान प्राप्त केले होते.
तथागत बुद्धांनी आपल्या *"भिक्खुणी संघात"* (संन्यास) विवाहित / अविवाहित / विधवा / वेश्या पासुन सर्व प्रकारच्या स्त्रीयांना *"परिव्रजा"* घेण्यास अनुमती दिलेली होती / आहे. सर्व प्रकारच्या स्त्रीयांना पुरुषा बरोबर स्वातंत्र्य / समता / आत्मविकास इत्यादी मानवी जीवनाची सर्व आयामे खुली केलीत. प्राचिन *"बुध्द स्त्री साहित्य"* परंपरा ही पुढे अव्याहत सुरु झाली. सदर बुद्ध साहित्य परंपरेत इसवी ५ व्या शतकात झेन बुध्दीझमच्या *प्रज्ञातारा* (२७ व्या भारतीय कुलगुरू) / १३ व्या शतकात जापानी झेन गुरु *मुगाई न्योदाई* / १८ व्या शतकात *एलिझाबेथ पीबॉडी* ह्यांचा विशेष उल्लेख करता येईल. *"धर्मशास्त्र / इतिहास / पुरातत्त्व शास्त्र / मानववंशशास्त्र / स्त्री वाद"* ह्या विषयावर लिखाण दिसुन येते. ह्यानंतर सदर साहित्य लिखाण परंपरा जापानी बौध्द भिक्खुणी *फुकुदा चियोनी* / तिब्बती बौध्द भिक्खुणी *चोकी द्राण्मा / जेट्सुन्मा तेनजिन पाल्मो* (हिमाचल प्रदेश) / कॅलिफोर्निया येथिल *भेटी वेनगास्ट* / तिब्बती भिक्खुणी *वेंडी गार्लींग* / विदेशी पाश्चात्त महिला *मॅडम ब्लाव्हसी / कनील ओल्काट* / थायलंडच्या भिक्खुणी *वरंगगाना वनविचायान* / ब्रिटिश महिला *फ्रेडा बेदी* / तायवानच्या *ता ताओ फा त्झु* (व्होरामाई) / अमेरिकेतील *करुणा धर्म / ऍनी पेमा चोड्रान / जेत्सुन्मा अहकोन ल्हामो / कुलिंग / शेरी चायात / खेनमो डोलमा / आया सध्दाम्मा* / झेन शिक्षिका *रोशी* / थायलंडच्या *चाटसुपार्म कबिलसिंग* (धम्मानंदा)/ म्यानमारच्या (बर्मा) *सकवादी गुणसिरी* / अमेरिकेच्या *नेव्ही एलटीटस जेनेट सिन* / टेक्सासघ्या *मर्ली कॉड बॉयड*/ *विकी मैकोजी / सुसान मकॉट* अशी स्त्री वर्ग लेखिकेची बरीच लांब यादी आहे. थायलंडच्या धम्मानंदा ह्यांना माझी संस्था *अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशनचा* आंतरराष्ट्रीय *"शाक्यमुनी बुध्दा आंतरराष्ट्रीय पुरस्कार"* देवुन सन्मानित करण्यात आले आहे. ह्याशिवाय दक्षिण कोरीया ह्या देशातील बुध्दीस्ट भिक्खुणी *मदर पार्क चुंग सु* ह्यांना माझी संघटना *जीवक वेल्फेअर सोसायटीचा* आंतरराष्ट्रीय *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार"*'देवुन मला सन्मानित करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
बुध्द हे स्त्री वर्गाला सुरुवातीला धम्मात घेण्यास तयार नव्हते. आणि सिद्धार्थाची मावशी (पालनकर्ता आई) *महाप्रजातापी* हिने ५०० महिलांना सोबत घेवुन *परिव्राजक* होण्याची खुप विनंतीही केली. शेवटी *भदंत आनंद* ह्यांच्या मध्यस्थीने तथागत हे महिलांना दिक्षीत करण्यास तयार झाले. ह्या घटनेचा बाहु तथाकथित *"उच्च वर्गीय स्त्री / पुरुष लेखक वर्गानी"* हा केलेला दिसुन येतो. बुध्दाने महिलांना भिक्खुणी होण्यास योग्य मानले नाही / हा सामाजिक गुन्हा केला / भिक्खुणी संघाला भिक्खु संघांच्या अधिन ठेवले, असाही आरोप झाला. तसेच महिला भिक्खुणींना लावलेल्या *"आठ बंधनावर"* आपत्ती घेतलेली आहे. बुध्दाने स्त्रीयांना भिक्खुणी बनण्यास विरोध करण्याचे काही कारणे होती. ती कारणे म्हणजे - महिलांना भिक्खुणी केल्यास उद्भवणारे विविध परिणाम / त्यावेळी आजच्या सारखे *"रस्ते मार्ग / रेल मार्ग / जल मार्ग / वायु मार्ग अशा सुविधा"* उपलब्ध नव्हत्या. भिक्खुचा प्रवास हा *"जंगल - नद्या - सुनसान रस्त्यातुन पायदळ"* हा असायचा. *"स्त्री ही चंचल असते"* हे सुध्दा कारण नव्हते. कारण अंगुत्तर निकायात भिक्खुणीने बुध्दाला एक प्रश्न विचारला आहे. *"जगात चक्रवर्ती सम्राट अस्तित्वात येतो तेव्हा काय होते ?"* त्यावर बुद्ध उत्तर देतात की, "चक्रवर्ती राजा अस्तित्वात येतो तेव्हा *"सात भंडारे"* अस्तित्वात येतात. जसे - *"रथ / हत्ती / घोडे / रत्न / स्त्री / कुटुंबाचा शास्ता"* ही सात भंडारे आहेत. पुढे बुद्ध म्हणतात, कुटुंबात मुलगी जन्माला आली तर, त्या कुटुंबाने दु:ख न मानता आनंद मानावा. जी कुटुंबे कारभार स्त्रीच्या हातात देतात, ती विनाशापासुन मुक्त होतात. स्त्री ही सात भंडारा पैकी *"मौल्यवान भंडार"* आहे. भगवान बुध्दांनी भंते आनंदाला सांगितले की, *"स्त्रिया ह्या आपला धम्म आणि धम्म शिक्षा जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वागण्यास ह्या सर्वस्वी समर्थ आहेत."* स्त्री ही बुध्दीमत्ता / नीतिमत्ता या बाबतीत पुरुषांपेक्षा कमी दर्जाची आहे, असे ही बुध्दाला कधी वाटले नाही. *"स्त्री ही चंचल आहे / स्त्रियांना संघात प्रवेश दिला तर संघाची समाजात पत कमी होईल,"* असे बुध्दाची भावना असती तर बुध्दाने स्त्रियांना धम्मात कधी प्रवेश दिला नसता. बुध्दासमोर तेव्हा दोन प्रश्न उपस्थित झालेत. एक - स्त्रीयांना संघात प्रवेश दिला तर *"एक संघ असावा वा दोन वेगवेगळे संघ असावेत ? दुसरे परिव्रजा घेतल्यावर भिक्खुंना "ब्रम्हचर्य" शपथबध्द होणे हे आवश्यक होते. तेव्हा दोघांना एकत्र ठेवले तर शपथबध्दता अभंग ठेवणे हे शक्य नव्हते."* बुध्द भगवंताला आयुष्यात *"वैषयिक भावना संदर्भाची"* पुर्ण जाणिव होती. *"वासना"* ही स्त्रीला पुरुषांची दासी बनविते. तर पुरुष हा सुध्दा स्त्रीचा *"गुलाम"* होतो. हे सत्य आहे. म्हणुन बुध्दांनी दोन वेगवेगळे संघ निर्माण केले. भिक्खु हा भिक्खुणीचा गुरु राहातं असल्यामुळे गुरुला धम्मात महत्वाचे स्थान आहे / असे. मग तो पुरुष असो स्त्री वर्ग ही. हा आदराचा भाग आहे. सदर संदर्भ लक्षात घेवुन बुध्दाने भिक्खुणी वर्गाकरीता *"आठ नियम"* सांगितले होते. ह्यामध्ये बुद्ध ह्यांनी भिक्खुणीला कमी लेखले होते, अशी भावना ही मुळीचं नव्हती.
ज्या उच्च जाती वर्ग महिला / पुरुष साहित्यिक वर्गानी *बुध्दांच्या भिक्खु संघातील स्त्री विरोध* संदर्भात बरेच काही लिहिलेले आहे. काही विद्वान (?) *"स्त्री वर्गांनी तर वेदामध्ये स्त्रीला सन्मान"* असल्याचा संदर्भ दिला आहे. तेव्हा ह्या उच्च वर्गांनी *"रामायण / महाभारत / वेद / उपनिषद / मनुस्मृती"* इत्यादी वैदिक ग्रंथातील स्त्री / अस्पृश्यता संदर्भावरही भाष्य करायला हवे. *"विष्णु ह्यांनी स्वतःची मुलगी सरस्वती हिच्यासोबत केलेल्या संभोगाला (बलात्कार ?) आम्ही नैतिक मानावे काय ?"* हा श्लोक बघावा - *"मध्या यत्कर्त्वममवदभीके कामं कृण्वाने पितरी युवत्याम् | मनामग्रेतो जहतुर्विर्यन्ता सानी निषिक्तं सुकृत्यस्य योनौ ||६||"* (अर्थात - ज्यावेळी पितांनी आपली युवा कन्यांसोबत यथेच्छपणे संभोग केले, त्यावेळी संभोग क्रियेतुन काही विर्य हे परस्पर अभिगमन झाल्यावर त्या दोघांनी ते विर्य उच्च स्थानावर विराजीत योनीमध्ये सोडले होते.) विष्णु ह्यांच्या सरस्वती हिचे शिवाय *"सावित्री / गायत्री / मेघा / श्रध्दा"* ह्या चार पत्नी संदर्भात विवेचन करायला हवे. महाभारतातील *कृष्ण* ह्यांच्या *"कृष्णलीला"* तसेच असंख्य पत्नी संदर्भातही लिहायला हवे नां. रामायणातील *राम* ह्यांनी तर पत्नी *"सीता हिला वनवासात सोडणे"* / सीतांवर लांछन लावणे / अग्नीपरिक्षा घेणे / सुर्पणखा हिच्यासोबत खोटे बोलणे / लक्ष्मणाने *सुर्पणखा* हिचे नाक कापणे, हे सर्व काही संदर्भ नैतिकतेत बसते काय ? हे सांगायला हवे नां. विधवा स्त्रीयांना पुनर्विवाह करण्यास मनाई होती. हा श्लोक बघावा - *"न विवाह विधायुक्तं विधवावेदनं पुन: ||६५||"* (अर्थात - विवाह संबंधी मंत्रानी नियोग करणे योग्य नाही. आणि ना ही विधवेनी पुनर्विवाह करावा.) जातीभेद व्यवस्थेचे समर्थन करणारा हा श्लोक पहावा. *"शर्मवद ब्राम्हणस्य स्याद्राज्ञो रक्षासमान्वितम् | वैश्यस्य पुष्टिसंयुक्तं शुद्रस्य प्रेष्यसंयुतम् ||३४||"* (अर्थात - चार वर्णातील लोकांनी आपल्या नावासोबत उपनाम जोडण्याची चर्चा करुन मनु महाराज म्हणतात, विप्रो ! ब्राम्हण ह्यांनी आपल्या नावासोबतचं शर्मा, क्षत्रिय ह्यांनी वर्मा, वैश्य यांनी गुप्त आणि शुद्र ह्यांनी आपल्या नावासोबत दास हे उपनाम जोडायला हवे.) ह्याशिवाय ब्राह्मण ह्यांनी अन्य वर्गांच्या स्त्रीयांसोबत केलेल्या संभोगाबाबत एक श्लोक आहे - *"भगवन्सर्वर्णानां यथावदनुपुर्वश: | अनीरप्रभावाणां च धर्मान्नो वक्तुमहेर्सि ||२||"* (अर्थात - भगवान ! तुम्हाला अनुरोध आहे की, आमचे चार वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र द्वारा उत्पन्न संतान अर्थात ब्राह्मण द्वारा शुद्ध स्त्रीला गर्भवती केल्यावर उत्पन्न संतान हा वर्णसंकर समजला जावा. कारण त्यांची जाती ही दोन भिन्न वर्णाचे रक्त आहे. ह्यावर आपण प्रकाश टाकावा.) असे बरेच काही श्लोक आहेत. तसेच सतराव्या शतकातील आदि हिंदी कवि *तुलसीदास* हे रामचरीतमानस ह्या ग्रंथात लिहितात, *"ढोल गवार शुद्र पशु नारी | सब ताडन के अधिकारी ||"* बुध्दांनी आपल्या स्व धम्मात स्त्री वर्ग / अस्पृश्य वर्गा ह्यांच्या संदर्भात असा अश्लिल / अनैतिक शब्द प्रयोग सांगितलेला नाही. आता *"रामायण / महाभारत / वेद / उपनिषद / मनुस्मृती"* ह्या ग्रंथाचा कालखंड बघू या !!!
*"सिंधु घाटी सभ्यतेचा"* कालखंड इ. पु. ३३०० - १९०० हा आहे. आणि सिंधु संस्कृतीमध्ये आढळलेली *"लिपी"* ही अजुनही वाचण्यात किंवा समजण्यात आलेली नाही. तदनंतर इ. पु सातव्या - सहाव्या शतक *"बुध्द कालखंडात"* व्यवहारात असलेली प्राचिनतम *"ब्राम्ही लिपी "* (धम्म लिपी) ही मात्र वाचण्यात आणि.समजण्यात आली आहे. बुध्द काळात *"बोली भाषा - पाली प्राकृत भाषा"* ही होती. त्यांनंतर इ. पु चवथ्या - तिस-या शतकात *"पाली ह्या भाषेवर संस्कार होवुन "हिब्रु संस्कृत " भाषेचा जन्म झाला."* हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"ब्राम्ही लिपी"* होती. आजची संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाचा शिलालेख* हा प्राचिन बुध्द काळाचा इतिहास बयाण करतो. *"वर्णव्यवस्था"* उल्लेख हा चक्रवर्ती सम्राट ह्यांच्या *"शिलालेखात"* दिसुन येत नाही. *"चाणाक्य / कौटिल्य चाणक्य"* ह्याचाही उल्लेख मौर्य शिलालेखात दिसुन येत नाही. अर्थात *"चाणाक्य"* हे पात्र काल्पनिक असल्याचा हा पुरावा आहे. इसा पुर्व चवथ्या - तिस-या शतकातील सम्राट अशोक मौर्य दबारात असलेला *मेगास्थनिज* ह्यांच्या *"इंडिका"* तसेच इसा पुर्व पहिल्या शतकातील *एरियन* लिखित अन्य *"इंडिका"* ह्या ग्रंथात *"वर्णव्यवस्था"* वा *"ब्राह्मण व्यवस्था"* अस्तित्वात असल्याचा संदर्भ नाही. इतकेच काय इसवी आठव्या शतकातील *अलब्रुनी* ह्यांच्या ग्रंथातही सदर पुरावा उपलब्ध नाही. बुध्द काळात *"शाक्य वंस / कोरिया वंश / हरयक वंश / मौर्य वंश / शुंग वंश"* अशी "वंश राज व्यवस्था" ही अस्तित्वात होती.आठव्या शतकात *"अपभ्रंश भाषा साहित्याचा जन्म"* होतो. त्यानंतर १२ व्या शतकात *"आदि हिन्दी भाषा"* ही उदयाला येते. *"पाली भाषेची अंतिम अपभ्रंश भाषा म्हणजेचं आदि हिंदी भाषा होय."* ह्यानंतर १८ व्या शतकामध्ये *"आधुनिक हिंदी भाषेचा जन्म "* झाला.
बुध्द कालीन प्राचिन *"ब्राम्ही लिपी"* नंतर भारतीय क्षेत्र उगम आधारे जन्माला आलेल्या लिपींची दोन भागात विभागणी करु या. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दोन - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शाहमुखी लिपी"* ह्या लिपींचा उल्लेख करता येईल. इसवी ११०० मध्ये *"देवनागरी लिपी"* हिचे प्रारूप स्वरुप उदयाला आले. आणि इसवी १७९६ मध्ये देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ला *"उर्दु लिपी"* ही उदयास आली.*"मराठी भाषेचा पहिला शिलालेख"* इसवी सन ७५० सालचा पुणे जवळील *तळेगाव ढमढेरे* येथे / *"दुसरा शिलालेख"* हा इसवी १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *अक्षी* येथे / *"तिसरा शिलालेख"* इसवी सन १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *हत्तरसंग कुंडल* येथे / *"चवथा शिलालेख"* हा इसवी १०३९ सालचा कर्नाटक राज्यातील *श्रवणबेळ गोळ* येथे सापडलेला आहे. मराठी भाषेला ढोबळमानाने १८०० वर्ष झालेली असुन *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी २००० वर्ष आवश्यक असल्याने, बौध्द सातवाहन राजे ह्यांच्या *"नाणेघाट शिलालेखाचा"* आधार हा घ्यावा लागलेला आहे. *"मराठीची आद्य कवि"* संत नामदेव महाराज ह्यांच्या परिवारातील *संत जनाबाई* (जन्म १२५८) / तसेच संत चोखामेळा महाराज परिवारातील *संत निर्मळाबाई / संत सोयराबाई* ह्यांना मात्र ब्राह्मणी साहित्यिक वर्गाने दुर्लक्षित केल्याचे दिसून येते. परंतु ब्राम्हणी *संत ज्ञानेश्वर महाराज / मुकुंदराज* ह्यांचा मात्र खुप उदोउदो करण्यात आला. ज्ञानेश्वर महाराज ह्यांनी रेड्याकडुन वेद म्हणवले / भींत चालवली अश्या चमत्काराचे वर्णन हे *"विज्ञान युगात"* शक्य आहे काय ? हा प्रश्न आहे.
तथागत बुध्दाच्या महापरिनिर्वाणानंतर "बुध्द धर्म" हा *"हिनयान / महायान"* ह्या दोन संप्रदायात विभागला गेला. महायान संप्रदायाने *"वज्रयान संप्रदायाला"* जन्माला घातले आहे. मग वज्रयान संप्रदायाने *"तंत्रयान संप्रदायाला"* जन्माला घातले. इसवी ८५० साली *शंकर* ह्या नावाच्या व्यक्तीचा जन्म होतो. त्याला *"प्रच्छन्न बौध्द"* ही म्हटले आहे. इसवी नवव्या - दहाव्या शतकात वज्रयान / तंत्रयान संप्रदायाने *"शैव पंथ / वैष्णव पंथ/ शाक्त पंथ"* ह्याला जन्माला घातले. पुढे शंकर ह्या व्यक्तिने स्वतःला *आदि शंकराचार्य* म्हणवुन महायान बौध्द विहारावर आपले अधिपत्य निर्माण केले. आणि त्याने चार पीठाची स्थापना केली. उत्तर - ज्योतिर्मठ पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - श्रृंगेरी पीठ रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) / पुर्व - गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम - शारदा पीठ द्वारका गुजरात (सामवेद). *"कागदाचा शोध"* हा इसवी दहाव्या शतकात *चीन* ह्या देशात लागला. समस्त वेद / उपनिषद / मनुस्मृती / रामायण / महाभारत हे ग्रंथ केवळ *"कागदावर"* अंकित आहेत. ते *"शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित दिसत नाहीत. *ऋग्वेद* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत ही *"युनोस्कोला"* इसवी १४६२ साली पाठविली आहे. अजुन काय पुरावा हवा आहे ? हा प्रश्न आहे. *महात्मा ज्योतिबा फुले* ह्यांनी सन १९४८ साली पुण्यात *"पहिली मुलींची शाळा"* सुरु केली होती. *सावित्रीबाई फुले* ह्या भारतातील *पहिल्या महिला शिक्षिका* ठरल्यात. फुले दाम्पत्याला ह्या शिक्षण मिशनमध्ये झालेला त्रासावर खुप काही लिहिले जावु शकते. आणि ह्यावर चर्चा पुढे पुन्हा कधी तरी करू या. *डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला *"संविधान सभेत"* भारतीय संविधान हे मंजुर केले होते. २६ जानेवारी १९५० रोजी *"भारतीय संविधान "* लागु होवुन *"प्रजासत्ताक राष्ट्राची"* निव रचल्या गेली. अर्थात *"संस्कृती संविधान"* (मनुस्मृती) हिला मुठमाती देवुन नव्या *"संविधान संस्कृती"* (संविधान) ची बीजे रोपण झाली. समस्त भारतातील लोकांना *"समानता / स्वातंत्र्य / न्यायाच्या सुर्याचा उदय"* झाला. तरीही *"स्त्रीयांच्या अधिकाराचा मोठा प्रश्न"* होता. बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी *"४ वर्षे ४ महिने २४ दिवस"* खुप मेहनत घेवुन *"हिंदु कोड बील"* संसदेत सादर केले होते. परंतु सप्टेंबर १९५१ ला सदर बील नामंजूर करण्यात आले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी *"कायदे मंत्री"* पदाचा राजीनामा दिला. पुढे मात्र पहिल्या लोकसभेत सदर बील मंजूर झाले. आणि स्त्रीयांच्या उन्नतीची खरी पहाट सुरु झाली. एकदंरीत *"भारतीय स्त्रीच्या अधिकार आणि स्वातंत्र्य"* इतिहास हा असा आहे. पण आज तुमच्या ह्या *"साहित्य लिखाणावर"* पुनश्च ह्या *ब्राम्हणी व्यवस्थेने आपले अधिपत्य* चालविले आहे. हा *अधिकार* आता आम्ही मिळविणार आहोत काय ? हा मात्र प्रश्न आहे. कारण प्रश्न हा आपल्या इच्छा शक्तीचा आहे. फुले दाम्पत्त / डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आम्हाला *"धर्मांधता / देवत्व"* ह्या रूढी मानसिकतेतुन बाहेर काढले आहे. पण आताची पिढी पुनश्च स्वतःवर *"मानसिक गुलामी"* लादत आहे ! ह्याला आम्ही काय म्हणावे ?
जय भीम !!!
-------------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक १ मार्च २०२५
(नोट - हा लेख तुम्हाला महत्वाचा वाटल्यास पुढे फारवर्ड करावा)
No comments:
Post a Comment