Tuesday, 17 December 2024

 👌 *निसर्गाचे प्रेम संदर्भ !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


निसर्गाचे प्रेम संदर्भ 

आणि माणसांचे प्रेम संदर्भ 

हे कधीचं जुळणारे नाहीत

कारण दोघांच्याही प्रेम संदर्भात 

एक मोठा दगड आहे

सहज असा अडसर आहे 

तो म्हणजे स्वार्थ !

निसर्गानी प्रेम देतांना

एक समानता ठेवलेली आहे 

ह्या समानतेमध्ये सुंदरता आहे

मनमोहक असा गंध आहे

निसर्ग एक तत्व आहे

नदी पहाड ह्या विविधतेतं

जंगलातील वाटांनी जातांना 

हवेची मिळणारी झुळक

ह्यामध्ये पुर्णतः रममाण झाल्यावर 

माणसांनी निर्मित केलेल्या 

प्राचिन जाड भिंतीवर बसल्यावरही

समोर हा फक्त दिसतो निसर्ग

आणि जुन्या आठवणी सांगतांना

सहज निसर्ग बोलुन जातो

बुध्द प्रेम - मैत्री - बंधुता - करुणा 

शांती - अहिंसा आणि मानवता !


---------------------------------

नागपूर, दिनांक १६/१२/२०२४

No comments:

Post a Comment