✍️ *आंबेडकरवादी (?) साहित्य संमेलनाच्या गांधी लोटांगणात आंबेडकरी विचारवाद्यांची अ-नैतिक अपात्रता...???*
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर
मो.न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
नुकतेच नागपुरच्या दैनिक वर्तमानपत्रातुन, एक अफलातून बातमी वाचायला मिळाली की, दिनांक ११ - १२ एप्रिल २०२० ला नागपुरात, *"द्वितिय अखिल भारतीय आंबेडकरवादी (?) साहित्य सम्मेलन"* होणार असुन, सदर नियोजित सम्मेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावर वनराई फाऊंडेशन चे *"विश्वस्त"* (?) *डॉ. गिरिश गांधी* ह्या नागपूर किर्तीमान महामानवाची (?) निवड *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ"* ह्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आयोजक असलेल्या सदर जागतिक स्तरावरील (?) *"खाजगी (सरकारी नव्हे) महामंडळाची"* एकट्याने "आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन" घेण्याची कुवत नसल्याने, त्यांनी *"विदर्भ गौरव प्रतिष्ठान"* ह्या कुणा तरी संघटनेला आपल्या सोबतीला घेतलेले आहे. आणि *"ह्या विदर्भ गौरव प्रतिष्ठानाचा सर्वेसर्वा कोण आहे...?"* हा पुन्हा नव्याने प्रश्न हा आलाचं...? सदर बातमी वाचतांना आमच्या ह्या तथाकथित आंबेडकरी (?) आयोजका संदर्भात काय म्हणावे...? हा फार मोठा प्रश्न पडला. *कारण बेशरमपणा जोपासण्याची एक हद्द ही असायलाचं हवी, असे मनोमन वाटायला लागले !* आणि मग त्यावर चिंतन - मनन करायला लागल्यानंतर, माझ्या लेखणीने ह्यावर काही तरी लिहावे, असा मला आवाज दिला..!
मध्यंतरी दोन तिन वर्षापुर्वी हिचं मंडळी आयोजक असलेल्या, आणि ह्या तथाकथित खाजगी (सरकारी मंडळ नव्हे...!) *"जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळांच्या"* पदाधिकारी घोषित वर्गाने, *"प्रथम जागतिक आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन"* नागपुरात घेण्याची घोषणा केलेली होती. त्या जागतिक सम्मेलनाच्या स्वागताध्यक्ष पदावर, *डॉ. गिरिश गांधी* ह्या नागपूर किर्तीमान महामानवाची (?) निवड करण्यात आलेली होती. तर अध्यक्ष पदावर दलित (आंबेडकरी (?)) साहित्यिक *डॉ. यशवंत मनोहर* ह्यांची निवड जाहीर करण्यात आलेली होती. मी त्या संदर्भात लेख लिहुन सदर *"प्रथम जागतिक आंबेडकरवादी साहित्य सम्मेलनाला"* विरोध केलेला होता. त्याचे कारण असे होते की, डॉ. गिरिश गांधी ह्या महामानवाने (?) आंबेडकरी समाजातील एका मुलीचे त्याच्या कुटुंबात सुन (?) म्हणुन घुसल्याने.. *धेडी, तेरी औकात कैसे हुयी हमारे घर घुसने की...?"* असे बोलुन तिला सामानासह घराबाहेर काढले. आणि आंबेडकरी समाजातील त्या मुलीचे आयुष्य उध्वस्त केले. दुसरे असे की, व्होकार्ट हॉस्पिटल बिल्डिंगच्या सरकारी जागेमधील "महाराष्ट्र राष्ट्रभाषा समिती" संदर्भात मा. उच्च न्यायालयाने ताशेरे तिखट ताशेरे ओढलेले असुन, अशा *"नितिमान मान्यवरांची"* (?) निवड ही आयोजक मंडळी करीत आहेत. *काय आमची आंबेडकरी साहित्यिक ह्या पदाच्या लायक नाहीत काय...?* हा माझा तेव्हा प्रश्न होता. सदर माझ्या लेखाने आंबेडकरी साहित्य क्षेत्रात फार खळबळ माजलेली होती आणि नागपुरला होणारे सदर "जागतिक आंबेडकरवादी साहित्य सम्मेलन" हे रद्द करावे लागले. आणि नंतर ते सम्मेलन आयोजकांनी बॅंकांक, थायलंड येथे घेतले. आमच्या त्या आयोजकांनी पुनश्च तीच ती *"री ओढत"* आणि *"द्वितिय अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य सम्मेलनाचे"* नागपुरात आयोजन करून, *"डॉ. गिरीश गांधी"* अशा महामानवाची (?) सदर सम्मेलनाच्या "स्वागताध्यक्ष" पदावर निवड केलेली आहे. आणि असा बेशरमपणा जोपासत नागपुरच्या दैनिक वर्तमानपत्रात ही बातमी सुध्दा छापलेली आहे. *"काय आमच्या आंबेडकरी / बौद्ध समाजात 'स्वागताध्यक्ष' पदाकरिता योग्य असे पात्रताधारक मान्यवर मंडळी / साहित्यिक नाहीत...?"* असा त्या आमच्या विद्वत आयोजकांचा संदेश तर नाही नां...!!!! *हाच प्रश्न माझा आमच्या तमाम आंबेडकरी / बौद्ध समाजातील मान्यवर मंडळी आणि साहित्यिकांना आहे, जी अशी बाह्य अनैतिक घुसखोरी सहन करतात...!* आता बघु या...! आमचा आंबेडकरी / बौध्द समाज हा खरोखर जिवंत आहे की मुडदा...???
* * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:
Post a Comment