Friday, 21 September 2018

🎍 *तु मला रमाई दिसते गं ...!*
             *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपुर*
            मो.न.९३७०९८४१३८,९२२५२२६९२२

ह्या दाराच्या वेलीवर, हे निळे फुल फुलले गं
बाबाच्या मिशनची, तु मला रमाई दिसते गं..

वर्षाच्या मोसमाला, ही वेल लई बहरली गं
माणसाच्या जिवनात, एक चैतन्य आणले गं
उदासीन जगाला, तुचं कामाला लावलेस गं
प्रेमाच्या भावनेला, कवितेचे रुप दिलेस गं..

निळ्या ह्या फुलामध्ये, क्रांतीची चिंगारी दिसते गं
आकाशी नकाशात, आम्ही तो हत्ती शोधतो गं
चुकलो आम्ही भीम वाट, जगात लाज झाली गं
कुणाला दोष द्यावे,आम्ही कधी ना झालो बुध्द गं..

रमाई आसवाचे, थेंब वेलीवर पडले गं
राजरत्नाच्या मरणाचे, भान हे विसरले गं
चिंध्यांच्या त्या आवारात, चादर तु पसरली गं.
भीम-रमाई त्यागाला,आम्ही ना झालो लायक गं..

* * * * * * * * ** * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment