Saturday, 21 July 2018

💧 *भीम साद घाली ...!*
          *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
           मो.न. ९३७०९८४१३८

ह्या फुल वेलीची रे, कमान दारात माझ्या
निल फुल वर्षा करुनी, भीम साद घाली...

बहु पक्षी थव्यांचा, विहार बागेत माझ्या
रमतांना त्या संग रे, प्रेमाची आस आली
त्यांच्या निर्मलतेची, सावली बघुनी राज्या
अरे मानव जातीची रे, आता लाज झाली ...

ह्या गुलमोहराचे, आवास बागेत माझ्या
निजल्या फुल चादरीने, मना शांती आली
ह्या मोगरा फुलांचा, सुगंधी वास घेतांना
करुणा बुध्द पथाची रे, जगा आस झाली ...

ह्या सौंदर्यी मनाच्या, गुलाब फुलात राज्या
विभिन्न रंग छटेची, ती मोहकता आली
अन्य ह्या फुलांनी ही, सोबत ती करतांना
पावन बुध्द मैत्रीची रे, जगा याद झाली ...

* * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment