👏 *प्रा. प्रदिप आगलावे शरणं गिरिश गांधी....(?)*
*डॉ. मिलिन्द जीवने "शाक्य"* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
*"गिरिश गांधी फाऊंडेशन"* द्वारा नुकतेच काही मान्यवरांना नव वर्षाच्या पर्वावर, विविध पुरस्कार देवुन नागपुरात सन्मानित करण्यात आले. त्या पुरस्कार मान्यवरात *दलित साहित्याचे* (आंबेडकरी - बौध्द साहित्याचे अभ्यासक नाही) गाढे (?) अभ्यासक - *प्रा. प्रदीप आगलावे* ह्यांना *"गिरिश गांधी आंबेडकरी (?) साहित्य पुरस्कार"* देवुन सन्मानित करण्यात आले. सदर बातमी मिडियात आल्यानंतर त्या संदर्भात लिहिण्याचा विचार माझ्या मनात आला. परंतु मागिल दोन दिवसापासुन *"व्हायरल फिवर"* ने (ताप) मी पिडित असल्यामुळे सदर विषयावर लिहावे, ह्या स्थितीत मी बिलकुल नव्हतो. आज थोडे बरे वाटत असल्याने माझा लिखाणाला मी वाट मोकळी करून दिली. माझा परम प्रिय / जिवलग मित्र - *प्रदिप आगलावे* ह्याला अभिनंदन द्यावे काय ? द्यावे तर कोणत्या मेरीटवर ? हा सुध्दा प्रश्न माझ्या मनात घर करुन गेला. असो, आता पुरस्कार विषयावर चर्चा करु या !
पाच - सहा वर्षाआधी नामांकित *"दैनिक लोकमत"* ह्या नागपुरच्या वर्तमानपत्रातील आमच्या एका संपादक मित्राकडे मी स्वत: (डॉ. जीवने) तसेच नामांकित आंबेडकरी नाट्य लेखक / आकाशवाणी चे अधिकारी / माझे परम मित्र - *अमर रामटेके* बसलेलो असतांना, आमच्या त्या संपादक मित्रानी आम्हाला *प्रा. प्रदिप आगलावे* ह्याच्या संदर्भात अफलातुन एक बातमी सांगितली. भारत सरकारच्या योजना आयोगाचे सदस्य / खासदार - *डॉ. नरेंद्र जाधव* / नामांकित दलित - ईहवादी (बौध्द - आंबेडकरी साहित्यिक नाही) साहित्यिक *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* / माजी सनदी अधिकारी - संविधान साहित्य (?) शोध घेणारे (ह्याला विरोध झाल्यामुळे आणि मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती) - *इ. झेड. खोब्रागडे* ह्या मान्यवरांना *"डॉ. आंबेडकर राष्ट्रिय पुरस्कार"* (सोबत एक लाख राशी) देवुन सन्मानित केल्यामुळे, *डॉ. गिरिश गांधी* ह्यांना प्रा. प्रदिप आगलावे ह्यांनी पुढच्या वर्षी त्यांच्या (प्रा. आगलावे) नावाचा सदर आंबेडकर राष्ट्रिय पुरस्काराने सन्मानित करण्याचा विचार करावा, असे बोलल्याची ती अफलातुन मजेशीर बातमी होती. सदर बातमी ऐकल्यानंतर आम्ही सर्व मंडळींना खुप खुप हसु आले. तेव्हा अमर रामटेके ह्यांच्या तोंडुन डॉ. गिरिश गांधी ह्यांच्या बद्दल एक शब्द निघुन गेले - *"गिरिश गांधी - सांस्कृतिक डॉन."* पुन्हा हसणे ते आलेचं...!
डॉ. गिरिश गांधी ह्यांना आमचे मित्र प्रा. प्रदिप आगलावे ह्यांचे मेरीट चांगलेचं माहित होते. त्यामुळे प्रदिप आगलावे ह्यांना पाच - सहा वर्षानंतर *"डॉ. आंबेडकर राष्ट्रिय पुरस्कार"* (सोबत एक लाख राशी) ह्या पुरस्काराने सन्मानित न करता, *"डॉ. गिरिश गांधी आंबेडकरी साहित्य पुरस्कार"* (रु. २५ हजार राशी) देवुन सन्मानित करण्यात आले. परंतु *गिरिश गांधी* ह्या नावासोबत सोबत *"आंबेडकरी"* हा शब्द आम्हाला खुपचं खटकुन गेला. *"डॉ. गिरिश गांधी साहित्य पुरस्कार"* ह्या नावाने दलित साहित्यिक - प्रा. प्रदिप आगलावे ह्यांना सन्मानित केले असते तर, ह्यावर लिखाण करावे असा तो विषय अजिबात नव्हता. कारण *"आंबेडकरी"* हा शब्द इतका स्वस्त नाही. आणि गिरिश गांधी नावाच्या कट्टर जातीयवादी व्यक्तीने "आंबेडकरी" शब्द वापरावा, हे तर फारचं झाले. गिरिश गांधी ह्यांनी आपल्या बौध्द समाजाची एक मुलगी गिरिश गांधी ह्यांच्या भावाची पत्नी झाली असतांना *"तु धेडी, हमारे घर कैसे घुसी ?"* असे म्हणुन तिला घरातुन हाकलुन लावणारा उपद्रवी वीर आहेत - गिरिश गांधी. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आता आमचे मित्र - प्रा. प्रदिप आगलावे हे घरी शो केसमध्ये ठेवणार आहेत. ह्याबद्दल न बोललेले बरे ...!
दहा - बारा वर्षापुर्वी असेच एक खुरापी अफलवीर - *प्रा. दिपक खोब्रागडे* ह्यांनीं नागपुरात *"पहिली जागतिक (?) आंबेडकरी साहित्य परिषद"* ह्या संदर्भात आयोजन घोषणा करुन *डॉ. यशवंत मनोहर* ह्यांना सदर परिषदेचे अध्यक्ष आणि *डॉ. गिरिश गांधी* ह्यांना स्वागताध्यक्ष केले होते. तेव्हा आमचे मित्र - *प्रा. प्रदिप आगलावे* ह्यांनी दुस-या दिवशी प्रा. यशवंत मनोहर ह्यांचे त्यांच्या घरी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केल्याची बातमी होती. सदर परिषदेच्या विरोधात माझा लेख प्रकाशित झाल्यावर *गिरिश गांधी* ह्यांच्या विरोधात तमाम आंबेडकरी साहित्यिक उभे झालेत. आणि सदर जागतिक साहित्य परिषद ही तेव्हा रद्द करावी लागली होती. सांगावयाचे असे की, *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / इ. झेड. खोब्रागडे* शरणं गिरिश गांधी...! हे तर जगजाहिर आहे. आता *"प्रा. प्रदिप आगलावे शरणं गिरिश गांधी...!"* असे म्हणायला काहीचं हरकत नाही...!
* * * * * * * * * * * * * * * * *
(नागपुर, दिनांक ३ जानेवारी २०२३)
No comments:
Post a Comment