Sunday, 3 July 2022

 👌 *बाबासाहेब...!!!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर

      मो.न. ९३७०९८४१३८


बाबासाहेब

प्रस्थापितांच्या संस्कृती संविधानाला

तुम्ही कायमची मुठमाती देवुन

भारत संविधान संस्कृतीची

घट्ट अशी पायाभरणी केलेली आहे.

स्वातंत्र - समता - बंधुता - न्याय

ह्या बुध्द विचारांचा नाद करून

स्त्री असो वा पुरुष असा भेद मिटवुन

जातीय वणव्याला कबरीत टाकलेले आहे.

परंतु तुम्ही केलेल्या ह्या महत प्रयायाचा

आता फार दुरुपयोग होतो आहे

स्वातंत्र म्हणजे स्वैराचार काय ?

समता म्हणजे व्यभिचार काय ?

आता ही प्रश्न भारतीय राजनीतिने

समाजात जन्माला घातलेली आहेत

कारण येथे प्रत्येकांच्या विचार व्याख्या

ह्या आपापल्या परीने बदलत आहेत.

रिपब्लिकन राजनीतिबद्दल न बोललेले बरे !

रिपब्लिकन अर्थात प्रजा + सत्ताक

हा विचार कधीचाच संपलेला आहे

आणि ती प्रजा सत्तावादी न होता

फक्त स्व: अल्प हिताकरीता

प्रस्थापितांची बटीक झालेली आहे

त्यांच्या ए.सी. बेडवर शय्यासोबत असो वा

त्यांनी दिलेल्या उष्ट्या तुकड्याचा घास

ह्यातचं धन्यता मानतांना ती दिसत आहेत.

बाबासाहेब,

आता तुम्ही एकदा पुन्हा जन्म घ्या

नैतिकवादाची पाठशाळा उघडुन

नैतिक स्वाभिमान पाठ देणे गरजेचे काय ?

बुध्द पंचशील पालन हा विषय

आता अभ्यासक्रमात ठेवावा काय ?

ह्याबाबतचे वैचारीक मंथन

समाज आणि देशाहिताकरीता

नितांत गरजचे आहे काय ?

हे तुम्ही आता ठरवायचे आहे....!!!


* * * * * * * * * * * * * * *

(नागपूर, दिनांक ४ जुलै २०२२)

No comments:

Post a Comment