✍️ *शरद पवार / डॉ. श्रीपाल सबनीस / यशवंत मनोहर / भारत सासणे पासुन सर्वच्या सर्व मराठी ईहवादी / भोगवादी / विद्रोही साहित्यिकांना बुध्द - आंबेडकर साहित्य ह्यापासुन भिती / द्वेष कां...!*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
* माजी व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ. आंबेडकर समाज विज्ञान विद्यापीठ, महु (म.प्र.)
* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो.न. ९३७०९८४१३८/ ९२२५२२६९२२
नुकतेचं उदगीर येथे दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी ९५व्या *"अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे"* उदघाटन झाले. सदर संमेलनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा *शरद पवार* यांनी केले. संमेलनाध्यक्ष पद *भारत सासणे* ह्यांनी भुषविले. शिवाय पीठावर स्वागताध्यक्ष *संजय बनसोडे* / कोकणी साहित्यिक *दामोदर मावजो* / साहित्य महामंडळाचे अध्यक्ष *कौतुकराव ठाले पाटील* / माजी अध्यक्ष *डॉ. श्रीपाल सबनीस*/ स्वागत मंडळाचे *बसवराज पाटील नागराळकर* / कार्यवाह *डाॅ. दादा गोरे /* माजी केंद्रिय गृहमंत्री *शिवराज पाटील चाकुरकर* / विधान परिषदेच्या उपसभापती *डाॅ. निलम गो-हे* / महाराष्ट्र भाषा मंत्री *सुभाष देसाई* / महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री *अशोक चव्हाण* / जिल्हाचे पालक मंत्री *अमित देशमुख* / *लक्ष्मीकांत देशमुख* / मराठी साहित्य महामंडळ उपाध्यक्ष *कपुर वासनिक* ही समस्त मोठी मान्यवर मंचावर उपस्थित होती. ह्याशिवाय विविध सत्रात ब-याच साहित्यिक / नामवंत अशा वक्तांचा सहभाग ही होता. सदर परिषदेतील काही मान्यवरांनी बोललेल्या भाषणांचा आढावा घेणे मात्र गरजेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा *शरद पवार* हे आपल्या उदघाटनपर भाषणात म्हणाले की, *"आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्याची निर्मिती करण्यावर काही घटक मंडळी भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटी आहे. प्रचार साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला जन्म देते आणि अराजकता ओढावते. आपल्या भारत देशातही अशा विशिष्ट विचारधारेचा फसवा प्रचार फैलावतांना दिसतो आहे. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालुन जागे राहावे. साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधिल नसावे. कारण अशा बांधिलकीतुन मतप्रणाली तयार होते. ती बुध्दीभेद करणारी, धृवीकरण करणारी, विषारी स्वरुपाची आणि ती राष्ट्रहिताला बाधा आणणारी असु शकते. तेव्हा समान अंतर राखुन त्याकडे त्रयस्थ प्रमाणे पहावयास हवे."*
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ह्याच्या अध्यक्ष पदावरुन बोलतांना *भारत सासणे* म्हणाले की, *"आपण अत्यंतिक अशा भ्रमयुगाबाबत, छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्दयुगाबाबत मला बोलायचे आहे. भर्तृहरि प्रमाणेच आणखी एक रोमांचकारी संकल्पना आपल्या परंपरेत सापडते. प्रत्यक्ष महादेव स्वत:च काळ आहे. तो निरपेक्ष आहे. मात्र गौरी ही काळाची नियंत्रक आहे. या नियंत्रणा मुळेच काळ हा लयबद्ध असतो, असे ही सांगितले गेले आहे. पण ती नियंत्रक असली तरी, ती महादेवाची पत्नीच आहे. म्हणुन, केव्हा तरी काळाच्या छातीवर मस्तक ठेवुन तिला निद्रा येते. अशी निद्रा आली की, काळरात्रीची सुरुवात होते. याच काळात समाजाच्या भवितव्याची सुत्रे नकळतपणे सुपुर्द होत असतात.*
*सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहे. आणि सत्य हे निर्भयपणे सांगितले पाहिजे, ही देखील काळाची गरज आहे. सत्य आपले कथन उच्चारित रहात असते. ऐकण्याचा कान पाहिजे. कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्चरवाणे देखील हे उच्चारला पाहिजे. तो लुप्त भासणारा, न मरणारा असला तरी ! द्रष्टा लेखक असे सांगत असतो. आपण ते पाहिले आणि ऐकले पाहिजे हे मात्र खरे."* ह्याशिवाय सासणे ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोंबडा आणि त्याचे आरवणे हे देखील संदर्भ दिले.
सदर मराठी साहित्य परिषदेत *भारत सासणे* हे भाषिक एकोप्याचे सुर आवळत असतांनाचं मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष *कार्तीकराव ठाले पाटील* यांनी "मराठीची बोली असलेल्या कोकणीला राजभाषेचा दर्जा देतांना बहुसंख्यकाच्या मराठीचा बळी देण्यात आला" ही टीका केली. त्याला प्रत्युत्तर देतांना कोकणी साहित्यिक *दामोदर मावजो* हे म्हणाले की, *"भाषा हा माणसाला दुवा आहे. जुना अन्याय उकरुन काढायचा नसतो. वाद हा संवादाने मिटवता येईल. अन्यथा आपली स्थिती रशिया - युक्रेन सारखी होईल."* सदर परिषद सुरु असतांना ज्येष्ठ मराठी साहित्यिक *राजन गवस* हे विनोद सिरसाठ आणि डाॅ. प्रमोद मुनघाटे ह्यांना मुलाखत देतांना म्हणाले की, *"महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असतांना ही मराठी साहित्यात आज वैचारिक दारिद्र निर्माण झाले आहे. आजच्या ह्या भ्रमितावस्थेत उद्याच्या महाराष्ट्राचा हा चेहरा कायम ठेवायचा असेल, तर आपल्या लेखकांनी लिहिण्याची आणि बोलण्याची आपली जबाबदारी पाडावी लागेल."*
उदगीर ह्या शहरात एकीकडे मराठी साहित्य संमेलन हे होत असतांनाचं, त्याच शहरात दुसरीकडे मात्र *"१६व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे"* आयोजन होते. सदर विद्रोही साहित्य परिषदेचे उदघाटन हे सुफी परिषदेचे अध्यक्ष *सय्यद सरवर चिस्ती* यांनी केले. आणि विद्रोही साहित्य परिषदेचे अध्यक्ष *गणेश विसपुते* हे म्हणाले की, *"दडपशाही आणि सेन्सारशिपचे भय वाढवले गेले आहे. इतके की सार्वजनिक शैक्षणिक संस्थेमधील अधिकारी वर्ग स्वत:हुन रांगायला लागला आहे. समस्त देशातील संपत्ती ही केवळ दोन चार लोकांच्याच हातात असावी, असे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नाकडे आडदांडपणे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ मुठभर लोकांकडे अपरंपार संपत्ती आणि असिम शक्ती गेली आहे. या विरोधात बंड केले नाही, तर आपण पुढील पिढ्यांना काय उत्तर देणार आहोत."* सदर प्रसंगी पीठावर माजी संमेलनाध्यक्ष *डॉ. आनंद पाटील* / *डाॅ. अशोक पांडे / डाॅ. प्रल्हाद लुलेकर / डाॅ. अजिज नदाफ /* कोकणी कवि *शैलेंद्र मेहता / प्रभाकर ढगे / डॉ. प्रतिमा अहिरे / प्रकाश त्रिभुवन* / कार्याध्यक्ष *अरविंद पाटील एकंबेकर* / स्वागताध्यक्ष *डॉ. अंजुम कादरी* / मुख्य संयोजक *निवृत्ती सांगवे* / राज्याध्यक्ष *प्रा.प्रतिमा परदेशी* / कार्यकारी सचिव *यशवंत मकरंद* / राज्य संघटक *किशोर ढमाले* इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सामुहिक गायन, दोहा गायन, पावरी वादनाने तसेच जातीव्यवस्थेच्या उतरंडीचे प्रतिक म्हणुन मडके फोडुन संमेलनाची सुरुवात झाली. आता आपण सदर मान्यवरांच्या *"नैतिक कृतीशिलता"* संदर्भाने चर्चा करु या !
शरद पवार हे मराठी साहित्यिक नाहीत. ते शुध्द चतुर राजकारणी आहेत. ह्यासोबत ब-याच *"अन्य राजकिय नेत्यांना मराठी साहित्याच्या ज्ञानमय पीठावर नाचायला बोलाविण्याचे प्रयोजन* काय ? हा तर फार मोठा संशोधनाचा विषय म्हणायलाचं हवा. खर तर मराठी साहित्यातील त्यांची पात्रता शुन्य आहे. पण नाच्या मंडळींना कोणत्याही पीठावर चढण्यात / प्रसिध्दीत आनंद वाटत असतो...! असे म्हणायला काहीचं हरकत नाही. *"नैतिकता गेली वा-यावर...!"* ह्या राजकिय / साहित्यिक मंडळींना कुठे तरी नैतिकता आहे ? आणि बरे झाले, तो मंच हा *"तमाशा मंच"* नाही. नाही तर, ह्या मंडळींनी *"साड्या"* घालणे ही काही कमी केले नसते ! आणि हातामध्ये *"बांगड्या"* सुध्दा. आमच्या महाराष्ट्र सरकारने *"अनुदानाची काहीसी सुखद भीख"* दिली की, मराठी साहित्याचे तमाम *"ईहवादी / भोगवादी / सुखवादी / रूढीवादी / सत्तांधवादी / भीखवादी / केंद्रस्थानवादी साहित्यिक / पदाधिकारी"* ही मात्र ह्या राजकिय नेत्यांची पाय चाटुकता करणारी *"गावठी कुत्रे"* बनण्याची ती एक किमयाचं म्हणायला हवी. कुणी *"तुकडा"* फेकला की, त्यावर सर्व गावठी कुत्रे भिडुन जात असतात. इंग्रज भारत सोडुन गेले. पण प्रामाणिक *"इंग्रजी कुत्रे"* ही ते सोडुन गेलेत. कारण ती कुत्रे मालकाला फार *"वफादार"* असतात...! कुण्या परक्याचे हातचे जेवण सुध्दा खात नाहीत. म्हणुन साहित्याचे काही बरे तरी आहे.
*शरद पवार* जे काही साहित्य संदर्भात बोलुन गेले आहे, ती *"नैतिक कृतिशीलता"* त्यांनी कधी तरी प्रत्यक्ष राजकारण करतांना जोपासली आहे काय ? स्वत:चा राजकिय फायदा करण्याकरिता *"कांग्रेसला"* तोडले. कांग्रेसला आज दिसणारे फार वाईट दिवस आणले. *"सशक्त आंबेडकरी रिपब्लीकन राजनीति"* पुर्ण लयाला लावली. महाराष्ट्राचा भाजपा ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याला विराजमान करण्याकरीता बाहेरुन बिना अट समर्थन दिले होते. त्यांच्या काळ्या कामाची लांबचं लांब अशी मोठी यादी आहे. आणि *"साहित्यिक वर्गानी कोणत्याही विचारधारेला बांधिल नसावे"* असे बोलणे म्हणजे शरद पवार महाशयांनी अकलेचे तारे तोडले ? हे म्हणायला हवे. *"बुध्द - फुले - आंबेडकर हा विचारचं भारत देशाच्या एकसुत्राला बांधणारा आहे...!"* ही जाण जर शरद पवार महाशय विसरत असतील, त्यांनी *"चुल्लुभर पाण्यात डुबलेले बरे...!"*
*भारत सासणे* ह्यांच्या अध्यक्षीय भाषण संदर्भात न बोललेले बरे...! ते स्वत: भ्रमीत दिसत आहेत. त्यांच्या बुध्दीमध्ये *"वैज्ञानिक प्रज्ञाचा अभाव"* म्हणायला हवा. आणि सत्याचा आग्रह ते सांगत आहे. पण ते सत्य कोणते ? हा मुळ मुद्दा आहे. *कार्तीकराव ठाले पाटील* रूढीवादी मराठी साहित्याच्या चौकटीच्या बाहेर निघायलाचं तयार नाहीत. कोकणी साहित्यिक *दामोदर मावजो* हे तर कोकणी साहित्याच्या बाहेर पडणाच्या काही मानसिक स्थितीत नाहीत. वरुन ते *"रशिया - युक्रेन युध्दाचा"* संदर्भ देत आहेत. वाटते की, सदर युध्दाच्या पागलपणाचा जव किडा त्यांच्या डोक्यात शिरला आहे. *राजन गवस* हे मराठी साहित्याच्या *"वैचारिक दारिद्र"* ह्या विषयावर बोलले, हे एका अर्थाने ठिक आहे. पण महाराष्ट्राचा मराठी साहित्य चेहरा बदल करावयाचा झाल्यास, सदर रूढीवादी मराठी साहित्याची परिसीमा सोडायला ते तयार नाहीत. *शरद पवारापासुन* ही तमाम महाराष्ट्राची *"पुरोगामी"* म्हणविणारी मंडळी ही खरचं *"पुरोगामी"* आहेत काय ? की ती तमाम मंडळी ही *"पुरोवामी"* आहेत ? एक संशोधनीय असा प्रश्न आहे. भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष *श्रीपाल सबनीस* ह्यांचे नुकतेचं नागपुरात आयोजन झालेल्या *"पहिल्या राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनातील"* अध्यक्षीय भाषण, हे अगदी उपरोक्त साहित्यिक मंडळी बोलुन गेलीत, अगदी त्याच प्रकारचे होते. ते सुध्दा रुढीवादात भिजलेले आहेत. *"आमचा भोंगा हा सत्तेचा नसुन सत्याचा आहे."* हे श्रीपाल सबनीस ह्यांचे *नागपुरातील बोल,* उदगीर येथे सत्तेसोबत बसलेले दिसले...! पण ही मराठी साहित्यिक मंडळी ईहवादी साहित्यिक *डाॅ. यशवंत मनोहर* पासुन दुर कां ? हा सुध्दा प्रश्न आहे. महत्वाचा विषय म्हणजे *"बुध्द - आंबेडकर साहित्य"* ह्या संदर्भात त्या तमाम साहित्यिक मंडळींचा द्वेष / आकस, हा सदर साहित्याचे प्रत्यक्ष नाव न घेता सुध्दा, तो आम्हाला दिसुन येत आहे.
तमाम विद्रोही साहित्यिक / आयोजक मंडळींनी *"बुध्द - आंबेडकर साहित्य"* वा साहित्यिक ह्यांच्यापासुन दुरी कां ठेवलेली आहे ? उदगीरच्या विद्रोही साहित्य संमेलन संदर्भाने हा गंभिर विषय दिसुन येत आहे. ते *"सुफी साहित्याची मित्रता"* करतांना दिसुन येतात. शिवाय स्वत:ला विद्रोही म्हणवतांना देखील रुढीवादी परंपरा सोडतांना ते दिसुन येत नाहीत. *"जातीव्यवस्थेच्या उतरंडीचे प्रतिक म्हणुन मडके फोडणे"* हा काय प्रकार आहे...? *"संविधान संस्कृती"* तुम्ही स्विकार करणार आहात किंवा नाही ? येथे हा फार महत्वाचा प्रश्न आहे. *"भारतीय संविधानाची प्रतिज्ञा"* घेवुन संमेलनाची सुरुवात करण्यास वावगे काय ? *"विद्रोही साहित्यिकांना मानवी अधिकार हे हवे आहेत. पण त्यांना संविधानाची प्रतिज्ञा नको"* असा हा प्रकार आहे. भारतामध्ये "जातीविहिन समाज" बांधणीची मोट, ही *"बुध्द - आंबेडकर विचार"* ह्या मार्गानेचं प्रत्यक्षात येणार आहे. भाजपा सरकार सत्तारुढ झाल्यानंतर ह्या देशात *"संस्कृती संविधान"* विचाराला ऊत आलेला आहे. आणि *"संविधान संस्कृती"* लयाला जात असतांना, आमचे हे वैचारिक दुरत्व *"प्राचिन दास्यत्वाची"* चाहुल देत आहे. हे आम्ही लवकरात लवकर समजुन घेणे फार गरजेचे झाले आहे.
*भदंत अश्वघोष* ह्यांना आद्य साहित्यिक दर्जा देण्यास ह्या व्यवस्थेने नाकारलेले आहे. *"नैतिकवाद / बुध्द सौंदर्यशास्त्र"* ह्याचा बोध हा भदंत अश्वघोष ह्यांनी करुन दिला. अश्वघोषांचा ब-याच कालावधी लोटल्यानंतर आलेला भोगवादी / वासनावादी साहित्यिक *कालिदास* ह्यांच्या साहित्यामध्ये कोणते *"सौंदर्यशास्त्र"* दडलेले आहे ? हा मुख्य प्रश्न आहे. आणि तो आद्य साहित्यिक हा कसा ? *"रामायण / महाभारत"* ह्याला आम्ही साहित्याच्या कोणत्या प्रकारात ठेवायला हवे ? *सरस्वती* विद्येची देवी कशी ? तिचा *"विद्या प्रसवात / विकासात"* खरे योगदान काय ? अशी असंख्य प्रश्न आहेत. ईहवादी / भोगवादी / सत्तांधवादी / केंद्रस्थानवादी / सुखवादी / रुढीवादी साहित्यिक ह्या तमाम प्रश्नांची उत्तरे देणार आहात काय ? हा सुध्दा प्रश्न आहे.
विद्रोही साहित्यिक असो की दलित भाव साहित्यिक असो, ती समस्त मंडळी *"बुध्द - आंबेडकर साहित्यासोबत बांधिलकी"* कां स्विकारीत नाही ? त्यांचे दुरत्व कां आहे ? एकवेळ रुढीवादी / भोगवादी / ईहवादी / सुखवादी / सत्तांधवादी / भीखवादी / केंद्रस्थानवादी साहित्यिक वर्गांचा *"बुध्द - आंबेडकर साहित्य विवाद"* हा समजला जावु शकतो...! त्यां मंडळींना साहित्य असो की समाज, ह्या क्षेत्रात समानता नको आहे. ती मंडळी साहित्य सत्ता सोडायला तयार नाहीत. विद्रोही / दलित साहित्य असो वा चळवळ, *"केवळ विद्रोह असुन चालणार नाही. वा केवळ नकार असुन चालणार नाही. तर सोबतचं सकारात्मक दृष्टीही आपल्याला ठेवणे फार गरजेचे आहे...!"* आपल्याला उज्वलतेकडे जाण्याकरीता, एक दिशा निर्धारीत करावी लागणार आहे. नाही तर साहित्य / चळवळ ह्याची दशा होणे, हे अगदी निश्चित आहे. आणि पुढची कडी ही अवदशा...!!! आज आपण त्या दिशेने जात आहोत काय ? हा संशोधनाचा विषय आहे. मराठी साहित्याचा *"दारिद्रता भाव"* मराठी साहित्यिकांनी स्विकारला आहे. पण आपण मंडळीचे काय ? *"आज जगाला बुध्द हवा आहे."* जगातील *"युध्द की बुध्द"* ह्या महत् विवादात बुध्दाचा विजय झालेला आहे. बुध्द विचार साहित्य हे मानवतावाद / प्रेमवाद / नैतिकवाद / स्वांतत्रवाद / समतावाद / बंधुतावाद / करुणावाद / अहिंसावाद / शीलवाद/ मैत्रीवाद/ न्यायवाद / नीतिवाद / शांतीवाद / प्रज्ञावाद ह्याची शिकवणुक देणारे आहे. *"बुध्द सौंदर्यशास्त्र / बुध्द दर्शनशास्त्र"* हा माणसाला वास्तव सुखाची अनुभुती देणारा विचार आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुध्दाच्या मार्गाचा अवलंब केला. आणि अल्पश्या काळामध्ये *"आपण शोषित वर्गाने शोषक वर्गासमक्ष वैचारिक समानता"* ही प्राप्त केलेली आहे. ही जगातील एकमेव मोठी क्रांती म्हणायला हवी. म्हणुन ह्या रुढीवादी मंडळींचा *"बुध्द - आंबेडकर साहित्य विरोध"* आहे. तुमच्या विरोधाचे खरे कारण काय ? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी *"संविधान संस्कृती"* भारत देशाला दिली. *"आंबेडकर सौंदर्यशास्त्र / आंबेडकर दर्शनशास्त्र / आंबेडकर मानवशास्त्र"* ह्या संदर्भात विपुल लेखण होणे गरजेचे आहे. हा विचार समजुन घेणे फार गरजेचे आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा *"व्याकरणवाद"* हा विषय आपल्याला समजुन घ्यावा लागणार आहे. त्या संदर्भात आपल्याला लेखन आणि अभ्यास हा करावा लागणार आहे. तेव्हाचं आम्हाला उद्याचा *"विकास भारत / उज्वल भारत / सफल भारत / प्रबुध्द भारत"* घडविण्याचा निर्धार करता येईल...! जय भीम !!!
* * * * * * * * * * * * * * * * * *
(नागपुर, दिनांक २४ / २५ एप्रिल २०२२)
*डाॅ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
* एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डाॅ. आंबेडकर समाज विज्ञान विद्यापीठ, महु म. प्र.
* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो.न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२