Wednesday, 9 May 2018

✍ *आंबेडकरी समाजातील दीन-हिन दलित नाचे आणि फोफावणारा अनैतिक नाचेवाद ?*
         *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य', नागपूर*
         मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

           आमच्या ह्या आंबेडकरी समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचार प्रभावातुन बौध्द धम्माशी बांधिलकी घेणे, हा मात्र वैचारिक परिवर्तनाचा मोठा केंद्र बिंदु म्हणावा लागेल...! कदाचित आमच्यातील काही मान्यवर मंडळी ही "आंबेडकर समाज" ह्या शब्द प्रयोगावरही शब्द आगपाखड करतील. परंतु आज ही ह्या महार समाजाचे अस्तित्व ठेवणा-या "दलितत्व" भावाचे काय ? ह्या साध्या प्रश्नाचे उत्तर मिळणे ही गरजेचे राहाणार आहे. दलितत्व जोपासणारा हा महार समुह असो की, अन्य मागासवर्गीय समाज असो, ह्यांना कट्टर, प्रामाणिक, समर्पित असे आंबेडकर विचारवादी म्हणता येईल काय..? पुन्हा हा प्रश्न आलाचं ! अलिकडे काही दलितवादी मंडळी मात्र कधी कधी गांधीचा उदो उदो करतांना दिसतात, तर काही मंडळी ही मार्क्सचा...! भारतात जन्मास आलेला आंबेडकरवाद हा काय अपुर्ण म्हणावा ? वा बुध्दवादात काही अभाव आहे काय ? म्हणुन तो विद्वान दलित वर्ग समुह हा गांधी - मार्क्सच्या विचार पंगतीला बसला आहे...? ह्या उलट गांधी - मार्क्सवादी विचारवंतानी त्यांच्या विचार पीठावर आंबेडकरवादाची औचित्यता ह्यावर कधी चर्चा केली आहे काय...? हा ही प्रश्न महत्वपुर्ण असुन ह्यावर संशोधनात्मक, चिकित्सात्मक विचार होणे गरजेचे आहे.
      प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी २० जुलै १९२४ ला "बहिष्कृत हितकारीणी सभा" ह्या सामाजिक संघटनेची निवं ठेवली. आणि तिन वर्षाच्या अल्पावधीतच १९२७ ला "समता सैनिक दल" ह्या शिस्तबद्ध सामाजिक संघटनेला जन्माला घालणे, हा संदर्भ आम्ही काय समजावा...? पुढे १२ वर्षाचा कालखंड पार पाडल्यानंतर १९३६ ला "स्वतंत्र मजदुर पक्ष" ह्या राजकिय पक्षाचे निर्माण, त्यानंतर सन १९४२ ला "शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची" स्थापना करणे आणि त्यानंतर १९५६ ला "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया" या राजकिय पक्षाच्या संरचनेचा विचार संदर्भ आम्ही कसा समजुन घेणार आहोत ! वर्तमान पत्राबद्दल बोलायचे झाल्यास डॉ. आंबेडकर हे "बहिष्कृत भारत - मुकनायक - जनता" आणि पुढे "प्रबुध्द भारत" ह्या नैतिक विचार-शीलता भावाकडे घेवुन जातांना ते दिसतात. धार्मिक भावना संदर्भाने बोलायचे झाल्यास १ जुलै १९५१ ला "भारतीय बौध्द जन संघ" ह्याची नीव ठेवुन ४ मार्च १९५४ ला "The Buddhist Society of India (भारतीय बौद्ध महासभा)"  ही संघटना स्थापन करतात. आणि दिनांक १४ आक्टोबर १९५६ ला बाबासाहेब आम्हाला बुध्दाकडे घेवुन जातात...! आज ह्या धम्म क्रांतीला ६० वर्षाचा असा मोठा कालखंड लोटलेला आहे. तरी ही आमच्यातील काहींचा दलित - दलितत्वाचा उदो उदो...! आणि स्वत:ला कट्टर, प्रामाणिक आंबेडकरवादी म्हणवुन घेणे...! हा काय गौडबंगाल आहे ? हे समजणे आंबेडकरी बौद्ध समाजाला फारच गरजेचे आहे. आपल्या स्व अस्तीनीतील ही हिन - दीन - दलित निखारे (?) समस्त आंबेडकरी बौद्ध समाजाला कुण्या राजकिय दावणीला (?) बांधताना आपली पोळी मात्र शेकतो आहे. दलित - दलितत्व भावाचे हे हिन - दीन राज सुत्र आम्ही समजणार आहोत की नाही ! हा प्रश्न मात्र तुम्हा स्वत:ला विचारायचा आहे....!!!
      आंबेडकरी भाव विश्वात रमणारे आमचे काही तथाकथित आंबेडकरी नाचेहीे अलीकडे मात्र, मग ती कांग्रेस असो वा भाजपा असो वा, लालशाही असो वा, ती रिपब्लिकन तुकडेवादाची गटशाही असो, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात समोर समोर मिरवतांना दिसुन येतात. तर कधी ते सामाजिक कार्यक्रम असो वा, धार्मिक कार्यक्रम असो वा, सांस्कृतिक कार्यक्रम असो, ही आंबेडकरी (?) नाचे समोर समोर नाचतांना बडेजावपणा सांगुन जातात. आमच्यातील काही प्राध्यापक मंडळीला अशा डायसवर दोन शब्द बोलण्याची संधी दिली की मग त्यांचा ४५ - ६० मिनिटाचा एक पिरियड ठरलेला असतो. तर काही अधिकारी मिरवणारे नाचे ही कुठे सामाजिक - धार्मिक - सांस्कृतिक कार्यक्रम होईल, आणि दुस-याच्या त्या डायसवर समोर समोर नाचायला मिळेल ह्याची वाट बघत असतात. तर काही महाभाग सदर कार्यक्रमाच्या आयोजन समितीत राहतांना आपल्या वार्षिक खर्चाची सहज तजबीज करुन घेतात. ह्याशिवाय कुण्या मोठ्या मान्यवरांच्या जन्मदिवस वा अन्य आयोजनात समरस होवुन स्वत:ची पत (?) किती मोठी आहे, हे सांगुन जातात. इथे प्रश्न आहे तो अशा नाचांच्या मेरिटचा..? ही नाचे स्व-मेरिटवर पुढे गेल्याचे उदाहरण फार क्वचितचं सापडेलं...! त्या नाच्यांमध्ये मात्र एक अ-मेरिट हमखास दिसुन येते. ते आहे "चापुलसगिरी - सलामगिरी...!"
      अलीकडे राजसत्ता धारण करणा-या प्रत्येक राजकिय पक्षांना (गोगा : गोडवलकर - गांधी) डॉ. आंबेडकर - बुध्दवादाला शरण जाणे हे गरजेचे झाले आहे. कांग्रेस युगात गांधी - गांधी नाचेला त्रस्त झालेला जनमत, धर्मांधवादात गुरफटलेला असतांना भाजपाच्या चंगुलवादात फसला. तर दुसरीकडे ओ.बी.सी. आरक्षण मिळण्याकरिता पुर्वी आरक्षणाला विरोध करणारे भडवे "आरक्षण आंदोलन" करतांना हमखास दिसुन येतात. हा प.पु. डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा आणि "हिंदु कोड बील क्रांतीचा" खरा विजय आपण मानणार आहात की नाही ? तरी ही ह्या ओ.बी.सी. वाद्यांचे पुनश्च गांधी चरण...? सोबतीला दलित भडव्यांचे आंबेडकर विचारपीठावर काहींचे "गांधीकरण - मार्क्सीकरण भाव...!" अती भयान वादळ पेटले आहे. आणि जळतो मात्र आंबेडकरी समाज...! मित्रांनो, ह्या सर्व काही उपद्रव्यापात आंबेडकरी समाजात वावरणारे हे अनैतिक नाचे महत्वपुर्ण दिशाहिनता पसरवतांना दिसत आहेत. अर्थात ह्या "अनैतिक नाचेवादाचा" त्वरित असा बंदोबस्त केला नाही तर, सशक्त आंबेडकरी समाज निर्माण हे मृगजळ स्वप्न असणार आहे.

* * * * * * * * * * * * * * * * * * *
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        (भारत राष्ट्रवाद समर्थक)
* राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
* मो.न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

No comments:

Post a Comment