Thursday, 13 November 2025

 ✍️ *बुद्ध - आंबेडकरी साहित्याची आजची भरारी  : दिशा - दशा आणि वास्तव !*

      *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म. प्र.

एक्स मेडिकल ऑफिसर एवं हाऊस सर्जन 

आंतरराष्ट्रीय परिषद के संशोधन पेपर परिक्षक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             *"बुध्द - आंबेडकरी साहित्य"* तसे बघावे तर परस्पर एकजीव आहे. काही थोडे फार बदलाव वरवर दिसुन येतात ही ! परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सरते शेवटी बुध्दाच्या मार्गाचा स्वीकार करतात. *"बुध्दमय भारत"* हे बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम ध्येय होते. बुध्द - आंबेडकराचा जीवन संघर्षात बरीचं साम्य ही दिसुन येतात. बुध्दाचा पहिला संघर्ष हा *"रोहिणी नदी पाणी वाटपावरुन"* शाक्य युवा संघामध्ये झालेला प्रमुख विवाद होता. शाक्य संघाचे म्हणने सिध्दार्थास मान्य न झाल्यामुळे सिध्दार्थाला शाक्य संघ / आपले राज्य सोडुन जावे लागलेले होते. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी सुद्धा ३० मार्च १९२७ रोजी महाड जिल्हा रायगड येथे *"चवदार पाणी सत्याग्रह"* केला. बुध्दाचा दुसरा सत्याग्रह म्हणजे *"अनैतिक रीती रिवाजांच्या"* विरोधात होता. बुध्दाने अनिष्ट प्रथा - रूढी विरोधात बंड केले. अर्थात *"मानवी अधिकार प्राप्तीचा"* तो मुख्य लढा होता. बुध्दाचा लढा हा *"समतेचा"* होता. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी २ मार्च १९३० रोजी नासिकचा *"काळाराम मंदिर सत्याग्रह"* केला. सदर लढा ही *"मानव अधिकार प्राप्तीचा"* होता. *"समतेचा लढा"* होता. देवदर्शन हा प्रमुख उद्देश नव्हता. बुध्दांनी *"देवत्व संकल्पना"* नाकारली. बाबासाहेब ह्यांनी ही *"देवत्व संकल्पना"* नाकारली. बुध्दाचे अंतिम लक्ष *"बहुजन हिताय बहुजन सुखाय"* राहिलेले आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"भारतीय संविधान"* ह्याचे लिखाण करुन  *"संविधानिक मौलिक अधिकार"* मिळवुन दिलेले आहेत. सांगायचे असे की, बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी आम्हाला *"बुद्ध"* दिला. आमचा आदर्श हे *"बुद्ध साहित्य"* असायला हवे. *"दलित साहित्य"* हे तर कदापी नाही. *"दलितत्व भावना"* कोण शहाणा व्यक्ती स्वीकार करणार ? मग *"दलित साहित्याचा"* उदोउदो कश्यासाठी ? परतुं काही साहित्यिक पांढरपेशा वर्गानी *"दलित विचार"* तर काहीं साहित्यिक वर्गांनी *"कॅम्युनिस्ट विचार"* हा शोषित वर्गावर लादण्याचा प्रयत्न केला होता. आणि काळाच्या ओघात ती मंडळी ही सफल सुध्दा झालीत. परंतु *"सत्य हे सत्यचं असते."* पुढे दलित साहित्य / कॅम्युनिस्ट साहित्य हा विचार मागे पडला. आणि *"बुध्द साहित्य"* हे माणसाच्या केंद्रस्थानी आले. आता तथाकथित पांढरपेशा वर्गाच्या गोरख विषयाकडे वळु या.

            इहवादी साहित्यिक *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांनी मार्क्स ही सांगितला आणि सोबत केशवसुत ही सांगितला. *"रमाई"* वर लिखाण केले म्हणुन / वा बुध्द ह्यावर थोडेफार बोलले म्हणुन मनोहर ह्यांना आपण *आंबेडकरी - बौध्द साहित्यिक* म्हणायचे काय ? वरुन डॉ मनोहर यांना रमाई वर लिहिण्याची प्रेरणा *सिध्दार्थ तलवारे* संपादित रमाई ह्या प्रतिनिधिक कविता संग्रहावरुन मिळालेली आहे. डॉ मनोहर ह्यांनी पहिल्या दोन आवृत्तीती सदर नावाचा उल्लेख केला. नंतरच्या आवृत्तीत नावाचा उल्लेख गायब झाला. मनोहर ह्यांनी तर स्वतः:ला *"इहवादी"* मानलेले आहे. यशवंत मनोहर हे स्वतः *"श्रध्दा / अंधश्रद्धा"* दोघांना समान समजुन *"श्रध्दा"* ही नाकारतात. बुध्द म्हणतात, *"सध्दा बिजं तण्ते वुट्ठि पञ्ञा मे | .........."* (अर्थात : श्रध्दा हे माझे बी आहे. तपश्चर्या ही वृष्टी आहे. प्रज्ञा हा जु आणि नांगर आहे. पापलज्जा हा इसाड, चित्त ही दोरी, आणि स्मृती (जागृती) हा फाळ व चाबुक आहे. काय आणि वाचेचे मी संरक्षण करतो. उदरनिर्वाहाच्या आहारात संयमित असतो. सत्य हे माझे निंदन आहे. आणि संतोष ही माझी सुट्टी आहे. तसेच धुरा वाहणारा उत्साह योगक्षेमभिमुख (निर्वाणाभिमुख) जातो. व तेथे गेल्यावर तो परत येत नाही. तो शोकरहित होतो.) ह्या प्रकारे *"श्रध्दा"* ह्या विषयावर खुप काही बुध्द गाथा संदर्भ देता येतील. लेखाला शब्द मर्यादा असल्याने हा विषय आटोपता घेतो. यशवंत मनोहर ह्यांना व्यावसायिक साहित्यिक मानल्यास गैर होणार नाही. दुसरे साहित्यिक *प्रा. रावसाहेब कसबे / प्रा. हरी नरके* हे आंबेडकरी विचाराला *"गांधी विचारांची"* फोडणी देण्याचा प्रयास करीत असतात. ह्या दोन्ही लेखकांच्या *"गांधी फोडणीवर"* मी उत्तर दाखल माझे विचार ह्यांनी प्रकाशीत  झालेले आहेत. त्यामुळे हा विषय आटोपता घेतांना ह्या दोघां महाशयांना गांधींची गरज कां पडलेली आहे ? हा अहं प्रश्न आहे.

            *"दलित पॅंथर"* ही ९ जुलै १९७२ ला अमेरिकेतील *"ब्लॅक पॅंथर"* ह्या कॅम्युनिस्ट विचारापासुन स्थापन झालेली एक सामाजिक संघटना. आम्ही युवा पिढी त्याकाळात गारद झालेली बघितली आहेत. *"ब्लॅंक पॅंथर"* (१९६०) चे संस्थापक मंडळीत *ह्युब न्युटान / ओटान फोर्ट / बॉबी स्कले* / ह्यांच्या सोबत *माल्कम एक्स* ह्यांच्या लिखाणातुन जन्माला आल्याचा एक इतिहास आहे. लिखाणाला शब्द मर्यादा असल्याने हा विषय आटोपता घेतो. प्रश्न आहे, *"बुध्द - फुले - शाहु - आंबेडकर विचारधारा"* भारतामध्ये असतांना *राजा ढाले / नामदेव ढसाळ / ज. वि. पवार* समान काही मंडळींना *"कॅम्युनिस्ट विचारधारा"* प्रभावाच्या नावाचा आसरा कां घ्यावा लागलेला आहे ??? दलित पॅंथर स्थापनेच्या एक वर्षापुर्वी *नामदेव ढसाळ* ह्यांच्या *"गोलपीठा"* ह्या काव्यसंग्रहाचा खुपचं उदोउदो झालेला होता. *"गोलपीठा"* ह्या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे *"वेश्यालयातील कविता."* शब्द भाषा तर भयानक घाणेरडी आहे. काही वर्गांच्या न समजणाच्या पलिकडची. वेश्यांच्या जीवनातील कोणते संदर्भ आपण हे घ्यायला हवेत ? ह्या विषयावर पुन्हा कधी तरी चर्चा करु या. *शरणकुमार लिंबाळे* ह्याला स्वतः ला तर दलित कवि म्हणण्यास धन्यता दिसुन येते. लिंबाळे हा दलितत्व सोडायला तयार नाही तर, त्याला मिळालेल्या *"सरस्वती पुरस्कार"* ह्याची त्याला लाज वाटण्याचे काही कारण दिसत नाही. आणि *लोकनाथ यशवंत* हा स्वतः:ला तर *"वादीहिन कवि"* असल्याचे तो बोलुन गेला. लोकनाथ हा आंबेडकरी बांधिलकी नाकारत असल्यामुळे ह्या विषयावर अधिक जास्त काय बोलावे ? कदाचित प्रेत उचलतांना समाजाच्या *"चार लोकांची"* त्याला गरज असण्याचे कारण दिसत नाही.

         सनदी अधिकारी ह्या पदावरून निवृत्त झालेले आमचे धम्म मित्र - *इ. झेड. खोब्रागडे* हे तर *"अफलातुन प्राणी"* आहेत. आंबेडकरी साहित्याला छेद देण्यास खोब्रागडेच्या मेंदुतुन *"संविधान साहित्य"* किडा हा जन्माला आला. *"भारताचे संविधान"* हे कसे साहित्य होणार आहे ? *"भारताचे संविधान"* हे तर *कायद्याचे पुस्तक* (Legal Book) नाही. तर ते *"कानुनी दस्तावेज"* (Legal Documents) आहे, हे समजुन घेणे खुप गरजेचे आहे. दीक्षाभूमी नागपूरला झालेल्या पहिल्या *"संविधान साहित्य संमेलनाला"* माझी संघटना *"सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल"* द्वारा तिव्र विरोध केला गेला. *"उच्च न्यायालय"* नागपूर खंडपीठात याचिका क्र. ३९४०/२०१९ मी स्वतः *(डॉ मिलिन्द जीवने विरुद्ध संविधान फाऊंडेशन)* दाखल केली होती. उच्च न्यायालय नागपुर येथे माझी बाजु सर्वोच्च न्यायालयातील वकील *एड चेतन बैरवा आणि एड बी बी रायपूरे* ह्यांनी मांडलेली होती. त्यावेळी माझ्यासोबत *एड. संदिप ताटके / वंदना जीवने / डॉ किरण मेश्राम / डॉ मनिषा घोष / डॉ भारती लांजेवार / चैताली रामटेके* ह्या मंडळीची खुप साथ होती. आपल्याला जी काही साथ मिळत असते, ती कधीच विसरता कामा नये. विद्वत न्यायाधीश द्वय *रवी देशपांडे / विनय जोशी* ह्यांच्या बुध्दीची मला खुप कीव करावीशी वाटते. सदर महोदयांनी *"संविधान साहित्य"* संमेलन घेतल्याने माझ्या (डॉ जीवने) *"मुलभुत अधिकाराचे हनन होत नसल्यामुळे माझी सदर याचिका रद्दबातल केली."* सदर याचिका ही *"माझ्या मुलभूत अधिकाराचे हनन"* होत असल्यामुळे दाखल केली नव्हती. *"भारतीय संविधानाची गरीमा कायम रहावी"* म्हणुन दाखल केली होती. साहित्य जर मान्य नसेल / वा स्वीकार्य नसेल तर त्याला जाळले ही जावु शकते. जसे *"मनुस्मृती ग्रंथाचे दहन"* हे बाबासाहेब आंबेडकर द्वारा करण्यात आले होते. इ झेड  खोब्रागडे महाशयाच्या ह्या दुष्कृतीमुळे नवी दिल्लीच्या जंतरमंतर येथे *"संविधानाची होळी"* पेटविण्यात आली होती. असे ही लोक प्रशासनात वा शासनात बिन-अकलेचे सनदी अधिकारी नियुक्त होतातचं कसे ? हा अहं प्रश्न आहे.

            *"जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद"* ह्या नावाने विदेशात *टुरीझम बिझनेस* करणारे *प्रा. दीपक खोब्रागडे* एक अफलातून प्राणी आहे. जागतिक साहित्य परिषद आयोजन ह्यास विरोध करण्याचे काही कारण नाही. पण *"जागतिक साहित्य परिषदेचा आयोजन दर्जा जागतिक स्तरावरील असायला हवा नां !"*  वा आंतरराष्ट्रीय परिषद घेण्याची आपल्यात ती पात्रता हवी. आंतरराष्ट्रीय दृष्टी हवी. पण ह्या जागतिक साहित्य नावाने चक्क *"ट्युरीझम व्यापार"* करणे !!! ह्यापेक्षा खुलेपणाने व्यापार करणारे *"दलाल"* बरे. सोबत जातीयवादी *डॉ. गिरीश गांधी* ह्यांचा विशेष आशिर्वाद आहे. तसे गिरीश गांधी ह्यांच्या आर्थिक सहकार्याने पुरस्कृत असणारे *प्रा. डॉ. यशवंत मनोहर / इ. झेड. खोब्रागडे / स्मृतिशेष डॉ. भाऊ लोखंडे* सारखी काही मान्यवर आहेत / होतीचं. आता तर *प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस* सारखी पंडा मंडळीसुद्धा आवाजी पोंगा वाजवीत आहेत. *पुरस्कार* तसेच *अध्यक्ष* पदाचा मोह आमच्या *"तथाकथित पांढरपेशा साहित्यिक वर्गाला"* दिसुन येतो. असाचं ह्या *"पुरस्काराच्या"* मागे धावणारा माझा जीवलग मित्र *प्रा. डॉ. प्रदिप आगलावे*  हा सुद्धा *डॉ गिरीश गांधी* ह्यांच्या मागे धावतांना मला दिसुन आला होता. नामांकित नाटककार / आकाशवाणी नागपुर येथे कार्यक्रम अधिकारी असलेला माझा खुप जीवलग मित्र *अमर रामटेके* ह्यांच्या शब्दात *डॉ. गिरीश गांधी म्हणजे सांस्कृतिक डॉन."* माझा जीवलग मित्र *प्रदीप आगलावे* हा तर महाराष्ट्र शासनाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर खंड प्रकाशनात खुप विवादाचा पात्र झाला. समाजशास्त्री - *प्रदीप आगलावे* ह्यांचे लिखाण बुद्ध - आंबेडकरी साहित्य विषयासी निगडित आहे काय ? हा तर संशोधनाचा विषय आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी *"जातीची"* समाजशास्त्रीय व्याख्या केली. *"Caste is a closed class."* (जात हा बंद वर्ग आहे.) बाबासाहेब ह्यांची *"समाजशास्त्रीय थेयरी"* सुध्दा आहे. आमचे मित्र प्रदीप आगलावे ह्यांनी स्वतःची कोणती समाजशास्त्रीय थेयरी विषद केली ? हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. आम्ही *"अभ्यासक मंडळींनी"* ह्या विद्वानाकडुन अशी अपेक्षा करणे काही गैर होणार नाही.

          बुध्द - आंबेडकरी साहित्य हा विषय खुप गहण विषय आहे. *"सर्व साहित्याची ती जननी आहे."*  बौध्द साहित्य हे *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / दर्शन शास्त्र / नैतिकवाद / राष्ट्रवाद / प्रेम - मैत्री - करुणा"* ह्याचा संगम आहे. परंतु ह्या साहित्याला केवळ *"विद्रोह - नकार"* ह्यामध्ये सिमित करण्याचा प्रयत्न *"ब्राम्हण्य मानसिकता साहित्यिक वर्गांकडुन"* झालेला आहे. *"बुध्द साहित्य हेच खरे तर समस्त भाषा साहित्याची जननी आहे."* बुध्द साहित्याचे संदर्भ *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) / बोली भाषा - *"पाली भाषा"* निगडीत असतांना, सदर विषय रुजविण्याचा प्रयास कां गेला नाही ? हा प्रश्न आहे. बुध्द - आंबेडकरी साहित्यामध्ये *सौंदर्यशास्त्र / नैतिकवाद / मानवतावाद / राष्ट्रवाद / प्रेम आयाम"* इत्यादी संदर्भाचा उहापोह करणारी/ संशोधन लिखाण करणारी फार कमी मान्यवर दिसुन येतात. *"हिब्रू संस्कृत / अपभ्रंश भाषा / आदि हिंदी"* ह्याचे उगम स्थान *"पाली भाषा"* आहे. हिब्रू संस्कृत ची लिपी *"ब्राम्ही लिपी"* आहे. आताची संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *कालीदास* ह्यांचा खुप उदोउदो होत असतांना कालिदास ह्यांच्या लिखाणात *"नैतिक वाद"* कुठे आहे ? कालीदास हा *"भोगवाद साहित्याचे प्रतिक"* आहे. ह्यावरुन कालीदास ह्यांचा *"जन्म - मृत्यु स्थान"* गुमनाम आहे. अर्थात कालीदास हा काल्पनिक पात्र दिसुन येतो. भारतातील *"भाषा साहित्यावर एकाधिकारशाही"* ब्राह्मण वर्गाची असतांना, *"आमचा हा साहित्यिक वर्ग"* ब्राह्मण पायाखाली लोळण कां घेतो ? ही आमची वेदना आहे. उपरोक्त कारणे ही *"आमच्या साहित्यिक वर्गाच्या वस्त्रहरण करण्याची"* आहेत, हे पुनश्च सांगायला नको !!!


---------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      नागपूर दिनांक ९ मे २०२५

Tuesday, 11 November 2025

 👌 *प्राचिन बौध्द स्त्री साहित्यातील स्त्रीयांचे स्वातंत्र आणि अधिकार !!!*(ब्राम्हणी धर्माने स्त्रीला मानसिक / शारिरीक गुलामी दास्य दिले)

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

एक्स मेडिकल ऑफिसर एवं हाऊस सर्जन 

आंतरराष्ट्रीय परिषद संशोधन पेपर परिक्षक 

मो. न. ९३६०९८४१३८, ९२२५२२६९२२


          प्राचिन *"बौध्द स्त्री साहित्य"* संदर्भ हा बुध्द धर्माशी निगडित असा विषय आहे. *"थेरी गाथा / थेरा गाधा"* ह्या प्राचिन दोन ग्रंथापैकी "थेरीगाथा" हा ग्रंथ  *"स्त्री संगित"* ह्या विषयाचे संकलन आहे. ह्याशिवाय *"यशोधरा (काव्य) / भिक्खुणींच्या कविता"* आणि ग्रंथ हे उपलब्ध आहेत. वरिष्ठ बौध्द भिक्खुणी वर्ग ह्या आपले रचित गीत कनिष्ठ भिक्खुनीकडुन वदवुन घेत असत. थेरीगाथेमध्ये काही कथांचाही समावेश दिसून येतो. *भिक्खुणी पटाचारा* ह्या साहित्य लिखाण करणा-या भिक्खुणीचा उल्लेख बुध्द स्त्री साहित्यात दिसुन येतो. संयुक्त निकायात *भिक्खुणी खेमा* / अंगुत्तर निकायात *भिक्खुणी विशाखा* हिचा उल्लेख दिसुन येतो. स्त्री वर्गाला *भिक्खुणी* (सन्यास) होण्याचा पहिला अधिकार हा *भदन्त आनंद* ह्यांच्या मार्फत बुध्दाने प्रदान केलेला आहे. सिध्दार्थ ह्यांची मावशी (पालनकर्ती आई) *महाप्रजापती* हिला *बौद्ध भिक्खुणी* बनण्याचा पहिला मान मिळाला. ह्याशिवाय *"मित्ता / तिस्सा / उब्बीरी / विजया / किस्सा गौतमी / पतली गौतमी / बम्हण कन्या चंदा"* ह्यांच्या कविता लिखाणांचा संदर्भ आहे. बुध्द साहित्यात स्त्री वर्गाला सन्मानित हे स्थान होते. उच्च शिक्षण घेण्याचा अधिकारही होता. स्त्री वर्गाला पुरुष बरोबरीचा दर्जा होता. स्त्री वर्गाला उत्तराधिकारी करण्याचा अधिकार होता. बौध्द साहित्यात स्त्री वर्गाला घृणा दृष्टीने बघितले जात नसे. बौध्द साहित्यात स्त्री ही *"निर्वाण"* अवस्था प्राप्तीचा संदर्भ आहे. बौध्द साहित्यामध्ये स्त्री वर्गाला गृहस्थ जीवनात मानाचे स्थान होते. काही उच्च वर्गीय स्त्री / पुरुष लेखकांनी *"बुध्दाचा भिक्खुणी"* बनण्याला विरोध असण्याचे संदर्भ दिलेले दिसुन येतात. त्यावर आपण पुढे चर्चा करणार आहोतचं. परंतु बुध्द धर्मात असलेल्या भिक्खुणी संदर्भात प्रथम चर्चा करु या.

           बौध्द भिक्खुणी संघात सर्वात अग्रणी / वरिष्ठ *महापजापती गोतमी* / ज्ञानामध्ये अग्रणी - *खेमा* / विनय ज्ञानसंपन्न - *पाटाचारा* / धम्म विश्लेषिका - *धम्मदिन्ना* / धम्म तल्लिन अग्रणी - *सुन्दरीनंदा* / धम्म उर्जावान - *सोना* / धम्म दिव्यदृष्टी अग्रणी - *सफुला* / तिव्र अंतर्दृष्टी अग्रणी - *भद्दा कुंडलकेशा* / स्मरणशक्तीमध्ये धारिका - *भद्दाक्कचना* / भारी वस्त्र धारिका - *किसा गोतमी* / धर्मामध्ये आस्था धारिका - *सिंंगालक माता* ह्या बौद्ध भिक्खुणीचा संदर्भ देता येईल. तर उत्तम गृहिणी वर्गात - शरण जाण्यात प्रथम अग्रणी - *सेनियाश्वेता* / दानकर्ता अग्रणी - *विशाखा* / धम्म शिकण्यात अग्रणी - *खुज्जुतारा* / मेत्ता निवास प्रबंधक अग्रणी - *सामावती* / अवशोषण अग्रणी - *उत्तरानंद माता* / उत्तम वस्तु दाता अग्रणी - *सुप्पवसा कोलियधिता* / रोगी सेवा करणारी - *सुप्पिया* / अनुभव आत्मविश्वास अग्रणी - *कातियानी*/ विश्वसनियता अग्रणी - *नकुलमाता* / मौखिक संचरणात विश्वास अग्रणी - *कुरारधारा काली* ह्या स्त्री वर्गाचा विशेष उल्लेख करता येईल. ह्याशिवाय वैशालीची नगरवधु *आम्रपाली* हिचा विशेष उल्लेख करता येईल. आम्रपाली हिने तर *अर्हत* अवस्था प्राप्त केली. तसेच ब-याच भिक्खुणी वर्गानी *"अर्हत"* ही अवस्था प्राप्त केल्याचा बुध्द धम्मामध्ये संदर्भ आहेत. *"बौध्द भिक्खु संघात"* आध्यात्मिक दृष्टीने सर्वोच्च स्थानावर *भदंत महाकश्यप* ह्यांचा उल्लेख आहे. महाकश्यप ह्यांचाप्रमाणेच *"भिक्खुणी संघाची - भदंत भद्दा"*  (धम्मसुत्त ३७) थेरीने सर्वोच्च स्थान प्राप्त केले होते.

          तथागत बुद्धांनी आपल्या *"भिक्खुणी संघात"* (संन्यास) विवाहित / अविवाहित / विधवा / वेश्या पासुन सर्व प्रकारच्या स्त्रीयांना *"परिव्रजा"* घेण्यास अनुमती दिलेली होती / आहे. सर्व प्रकारच्या स्त्रीयांना पुरुषा बरोबर स्वातंत्र्य / समता / आत्मविकास इत्यादी मानवी जीवनाची सर्व आयामे खुली केलीत. प्राचिन *"बुध्द स्त्री साहित्य"* परंपरा ही पुढे अव्याहत सुरु झाली. सदर बुद्ध साहित्य परंपरेत इसवी ५ व्या शतकात झेन बुध्दीझमच्या *प्रज्ञातारा* (२७ व्या भारतीय कुलगुरू) / १३ व्या शतकात जापानी झेन गुरु *मुगाई न्योदाई* /  १८ व्या शतकात *एलिझाबेथ पीबॉडी* ह्यांचा विशेष उल्लेख करता येईल. *"धर्मशास्त्र / इतिहास / पुरातत्त्व शास्त्र / मानववंशशास्त्र / स्त्री वाद"* ह्या विषयावर लिखाण दिसुन येते. ह्यानंतर सदर साहित्य लिखाण परंपरा जापानी बौध्द भिक्खुणी *फुकुदा चियोनी* / तिब्बती बौध्द भिक्खुणी *चोकी द्राण्मा / जेट्सुन्मा तेनजिन पाल्मो* (हिमाचल प्रदेश) / कॅलिफोर्निया येथिल *भेटी वेनगास्ट* /  तिब्बती भिक्खुणी *वेंडी गार्लींग* / विदेशी पाश्चात्त महिला *मॅडम ब्लाव्हसी / कनील ओल्काट* / थायलंडच्या भिक्खुणी *वरंगगाना वनविचायान* / ब्रिटिश महिला *फ्रेडा बेदी* / तायवानच्या *ता ताओ फा त्झु* (व्होरामाई) / अमेरिकेतील *करुणा धर्म / ऍनी पेमा चोड्रान / जेत्सुन्मा अहकोन ल्हामो / कुलिंग / शेरी चायात / खेनमो डोलमा / आया सध्दाम्मा* / झेन शिक्षिका *रोशी*  /  थायलंडच्या *चाटसुपार्म कबिलसिंग* (धम्मानंदा)/ म्यानमारच्या (बर्मा)  *सकवादी गुणसिरी* / अमेरिकेच्या *नेव्ही एलटीटस जेनेट सिन* / टेक्सासघ्या *मर्ली कॉड बॉयड*/ *विकी मैकोजी / सुसान मकॉट* अशी स्त्री वर्ग लेखिकेची बरीच लांब यादी आहे. थायलंडच्या धम्मानंदा ह्यांना माझी संस्था *अश्वघोष बुध्दीस्ट फाऊंडेशनचा* आंतरराष्ट्रीय *"शाक्यमुनी बुध्दा आंतरराष्ट्रीय पुरस्कार"* देवुन सन्मानित करण्यात आले आहे. ह्याशिवाय दक्षिण कोरीया ह्या देशातील बुध्दीस्ट भिक्खुणी *मदर पार्क चुंग सु* ह्यांना माझी संघटना *जीवक वेल्फेअर सोसायटीचा* आंतरराष्ट्रीय *"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार"*'देवुन मला सन्मानित करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

            बुध्द हे स्त्री वर्गाला सुरुवातीला धम्मात घेण्यास तयार नव्हते. आणि सिद्धार्थाची मावशी (पालनकर्ता आई) *महाप्रजातापी* हिने ५०० महिलांना सोबत घेवुन *परिव्राजक* होण्याची खुप विनंतीही केली. शेवटी *भदंत आनंद* ह्यांच्या मध्यस्थीने तथागत हे महिलांना दिक्षीत करण्यास तयार झाले. ह्या घटनेचा बाहु तथाकथित *"उच्च वर्गीय स्त्री / पुरुष लेखक वर्गानी"* हा केलेला दिसुन येतो. बुध्दाने महिलांना भिक्खुणी होण्यास योग्य मानले नाही / हा सामाजिक गुन्हा केला / भिक्खुणी संघाला भिक्खु संघांच्या अधिन ठेवले, असाही आरोप झाला. तसेच महिला भिक्खुणींना लावलेल्या *"आठ बंधनावर"* आपत्ती घेतलेली आहे. *"बुध्दाने स्त्रीयांना भिक्खुणी बनण्यास विरोध करण्याचे काही कारणे होती."* ती मुख्य कारणे म्हणजे - महिलांना भिक्खुणी केल्यास उद्भवणारे विविध परिणाम / त्यावेळी आजच्या सारखे *"रस्ते मार्ग / रेल मार्ग / जल मार्ग / वायु मार्ग अशा सुविधा"* उपलब्ध नव्हत्या. भिक्खुचा प्रवास हा *"जंगल - नद्या - सुनसान रस्त्यातुन पायदळ"* हा असायचा. *"स्त्री ही चंचल असते"* हे सुध्दा कारण नव्हते. कारण अंगुत्तर निकायात भिक्खुणीने  बुध्दाला एक प्रश्न विचारला आहे.  *"जगात चक्रवर्ती सम्राट अस्तित्वात येतो तेव्हा काय होते ?"* त्यावर बुद्ध उत्तर देतात की, "चक्रवर्ती राजा अस्तित्वात येतो तेव्हा *"सात भंडारे"* अस्तित्वात येतात. जसे - *"रथ / हत्ती / घोडे / रत्न / स्त्री / कुटुंबाचा शास्ता"* ही सात भंडारे आहेत. पुढे बुद्ध म्हणतात, कुटुंबात मुलगी जन्माला आली तर, त्या कुटुंबाने दु:ख न मानता आनंद मानावा. जी कुटुंबे कारभार स्त्रीच्या हातात देतात, ती विनाशापासुन मुक्त होतात. स्त्री ही सात भंडारा पैकी *"मौल्यवान भंडार"* आहे. भगवान बुध्दांनी भंते आनंदाला सांगितले की, *"स्त्रिया ह्या आपला धम्म आणि धम्म शिक्षा जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वागण्यास ह्या सर्वस्वी समर्थ आहेत."* स्त्री ही बुध्दीमत्ता / नीतिमत्ता या बाबतीत पुरुषांपेक्षा कमी दर्जाची आहे, असे ही बुध्दाला कधी वाटले नाही. *"स्त्री ही चंचल आहे / स्त्रियांना संघात प्रवेश दिला तर संघाची समाजात पत कमी होईल,"* असे बुध्दाची भावना असती तर बुध्दाने स्त्रियांना धम्मात कधी प्रवेश दिला नसता. बुध्दासमोर तेव्हा दोन प्रश्न उपस्थित झालेत. एक - स्त्रीयांना संघात प्रवेश दिला तर *"एक संघ असावा वा दोन वेगवेगळे संघ असावेत ?  दुसरे परिव्रजा घेतल्यावर भिक्खुंना "ब्रम्हचर्य" शपथबध्द होणे हे आवश्यक होते. तेव्हा दोघांना एकत्र ठेवले तर शपथबध्दता अभंग ठेवणे हे शक्य नव्हते."* बुध्द भगवंताला आयुष्यात *"वैषयिक भावना संदर्भाची"* पुर्ण जाणिव होती. *"वासना"* ही स्त्रीला पुरुषांची दासी बनविते. तर पुरुष हा सुध्दा स्त्रीचा *"गुलाम"* होतो. हे सत्य आहे. म्हणुन बुध्दांनी दोन वेगवेगळे संघ निर्माण केले. भिक्खु हा भिक्खुणीचा गुरु राहातं असल्यामुळे गुरुला धम्मात महत्वाचे स्थान आहे / असे. मग तो पुरुष असो स्त्री वर्ग ही. हा आदराचा भाग आहे. सदर संदर्भ लक्षात घेवुन बुध्दाने भिक्खुणी वर्गाकरीता *"आठ नियम"* सांगितले होते. ह्यामध्ये बुद्ध ह्यांनी भिक्खुणीला कमी लेखले होते, अशी भावना ही मुळीचं नव्हती.

            ज्या उच्च जाती वर्ग महिला / पुरुष साहित्यिक वर्गानी *बुध्दांच्या भिक्खु संघातील स्त्री विरोध* संदर्भात बरेच काही लिहिलेले आहे. काही विद्वान  वर्गाने (?) *"स्त्री वर्गाला वेदामध्ये खुप मोठा सन्मान असल्याचा"* संदर्भ दिलेला आहे. त्या अकलेचे तारे तोडणा-या वर्गा करीता - ब्राह्मण्य उच्च वर्गांनी *"रामायण / महाभारत / वेद / उपनिषद / मनुस्मृती"* इत्यादी वैदिक ग्रंथातील स्त्री / अस्पृश्यता संदर्भावरही भाष्य करायला हवे. *"ब्रम्हा ह्यांनी स्वतःची मुलगी सरस्वती हिच्यासोबत केलेल्या संभोगाला (बलात्कार ?) / पत्नी करण्याच्या कृतीला आम्ही नैतिक मानावे काय ???"* हा एक श्लोक बघावा - *"मध्या यत्कर्त्वममवदभीके कामं कृण्वाने पितरी युवत्याम् | मनामग्रेतो जहतुर्विर्यन्ता सानी निषिक्तं सुकृत्यस्य योनौ ||६||"* (अर्थात - ज्यावेळी पितांनी आपली युवा कन्यांसोबत  यथेच्छपणे संभोग केले, त्यावेळी संभोग क्रियेतुन काही विर्य हे परस्पर अभिगमन झाल्यावर त्या दोघांनी ते विर्य उच्च स्थानावर विराजीत योनीमध्ये सोडले होते. ब्रम्हा ह्यांना सरस्वती हिचे शिवाय *"सावित्री / गायत्री / मेघा / श्रध्दा"* ह्या चार पत्नी संदर्भात विवेचन करायला हवे. ब्रम्हा सरस्वती ह्यांच्या संभोगातुन *मनु* चा जन्म होतो. अर्थात मनु ह्याला अनैतिक पुत्र मानावे काय ?महाभारतातील *कृष्ण* ह्यांच्या *"कृष्णलीला"* तसेच असंख्य पत्नी संदर्भातही लिहायला हवे नां. रामायणातील *राम* ह्यांनी तर पत्नी *"सीता हिला वनवासात सोडणे"* / सीतांवर लांछन लावणे / अग्नीपरिक्षा घेणे / सुर्पणखा हिच्यासोबत खोटे बोलणे / लक्ष्मणाने *सुर्पणखा* हिचे नाक कापणे, हे सर्व काही संदर्भ नैतिकतेत बसते काय ? हे सांगायला हवे नां. विधवा स्त्रीयांना पुनर्विवाह करण्यास मनाई होती. हा श्लोक बघावा - *"न विवाह विधायुक्तं विधवावेदनं पुन: ||६५||"* (अर्थात - विवाह संबंधी मंत्रानी नियोग करणे योग्य नाही. आणि ना ही विधवेनी पुनर्विवाह करावा.) जातीभेद व्यवस्थेचे समर्थन करणारा हा श्लोक पहावा. *"शर्मवद ब्राम्हणस्य स्याद्राज्ञो रक्षासमान्वितम् | वैश्यस्य पुष्टिसंयुक्तं शुद्रस्य प्रेष्यसंयुतम् ||३४||"* (अर्थात - चार वर्णातील लोकांनी आपल्या नावासोबत उपनाम जोडण्याची चर्चा करुन मनु महाराज म्हणतात, विप्रो ! ब्राम्हण ह्यांनी आपल्या नावासोबतचं शर्मा, क्षत्रिय ह्यांनी वर्मा, वैश्य यांनी गुप्त आणि शुद्र ह्यांनी आपल्या नावासोबत दास हे उपनाम जोडायला हवे.) ह्याशिवाय ब्राह्मण ह्यांनी अन्य वर्गांच्या स्त्रीयांसोबत केलेल्या संभोगाबाबत एक श्लोक आहे - *"भगवन्सर्वर्णानां यथावदनुपुर्वश: | अनीरप्रभावाणां च धर्मान्नो वक्तुमहेर्सि ||२||"* (अर्थात - भगवान ! तुम्हाला अनुरोध आहे की, आमचे चार वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र द्वारा उत्पन्न संतान अर्थात ब्राह्मण  द्वारा शुद्ध स्त्रीला गर्भवती केल्यावर उत्पन्न संतान हा वर्णसंकर समजला जावा. कारण त्यांची जाती ही दोन भिन्न वर्णाचे रक्त आहे. ह्यावर आपण प्रकाश टाकावा.) असे बरेच काही श्लोक आहेत. तसेच सतराव्या शतकातील आदि हिंदी कवि *तुलसीदास* हे रामचरीतमानस ह्या ग्रंथात लिहितात, *"ढोल गवार शुद्र पशु नारी | सब ताडन के अधिकारी ||"* बुध्दांनी आपल्या स्व धम्मात स्त्री वर्ग / अस्पृश्य वर्गा ह्यांच्या संदर्भात असा अश्लिल / अनैतिक शब्द प्रयोग सांगितलेला नाही. आता *"रामायण / महाभारत / वेद / उपनिषद / मनुस्मृती"* ह्या ग्रंथाचा कालखंड बघू या !!!

           *"सिंधु घाटी सभ्यतेचा"* कालखंड इ. पु. ३३०० - १९०० हा आहे. आणि सिंधु संस्कृतीमध्ये आढळलेली *"लिपी"* ही अजुनही वाचण्यात किंवा समजण्यात आलेली नाही. तदनंतर इ. पु सातव्या - सहाव्या शतक *"बुध्द कालखंडात"* व्यवहारात असलेली प्राचिनतम *"ब्राम्ही लिपी "* (धम्म लिपी) ही मात्र वाचण्यात आणि.समजण्यात आली आहे. बुध्द काळात *"बोली भाषा - पाली प्राकृत भाषा"* ही होती. त्यांनंतर इ. पु चवथ्या - तिस-या शतकात *"पाली ह्या भाषेवर संस्कार होवुन "हिब्रु संस्कृत " भाषेचा जन्म झाला."* हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ही *"ब्राम्ही लिपी"* होती. आजची संस्कृत भाषा ही *"क्लासिकल संस्कृत"* असुन लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाचा शिलालेख* हा प्राचिन बुध्द काळाचा इतिहास बयाण करतो. *"वर्णव्यवस्था"* उल्लेख हा चक्रवर्ती सम्राट ह्यांच्या *"शिलालेखात"* दिसुन येत नाही. *"चाणाक्य / कौटिल्य चाणक्य"* ह्याचाही उल्लेख मौर्य शिलालेखात दिसुन येत नाही. अर्थात *"चाणाक्य"* हे पात्र काल्पनिक असल्याचा हा पुरावा आहे. इसा पुर्व चवथ्या - तिस-या शतकातील सम्राट अशोक मौर्य दबारात असलेला *मेगास्थनिज* ह्यांच्या *"इंडिका"* तसेच इसा पुर्व पहिल्या शतकातील *एरियन* लिखित अन्य *"इंडिका"* ह्या ग्रंथात *"वर्णव्यवस्था"* वा *"ब्राह्मण व्यवस्था"* अस्तित्वात असल्याचा संदर्भ नाही. इतकेच काय इसवी आठव्या शतकातील *अलब्रुनी* ह्यांच्या ग्रंथातही सदर पुरावा उपलब्ध नाही. बुध्द काळात *"शाक्य वंस / कोलिय वंश / हरयक वंश / मौर्य वंश / शुंग वंश"* अशी "वंश राज व्यवस्था" ही अस्तित्वात होती.आठव्या शतकात *"अपभ्रंश भाषा साहित्याचा जन्म"* होतो. त्यानंतर १२ व्या शतकात *"आदि हिन्दी भाषा"* ही उदयाला येते. *"पाली भाषेची अंतिम अपभ्रंश भाषा म्हणजेचं आदि हिंदी भाषा होय."* ह्यानंतर १८ व्या शतकामध्ये *"आधुनिक हिंदी भाषेचा जन्म "* झाला.

          बुध्द कालीन प्राचिन *"ब्राम्ही लिपी"* नंतर भारतीय क्षेत्र उगम आधारे जन्माला आलेल्या लिपींची दोन भागात विभागणी करु या. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दोन - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शाहमुखी लिपी"* ह्या लिपींचा उल्लेख करता येईल. इसवी ११०० मध्ये *"देवनागरी लिपी"* हिचे प्रारूप स्वरुप उदयाला आले. आणि इसवी १७९६ मध्ये देवनागरी लिपी व्यवहारात आली. इसवी १६४५ ला *"उर्दु लिपी"* ही उदयास आली.*"मराठी भाषेचा पहिला शिलालेख"* इसवी सन ७५० सालचा पुणे जवळील *तळेगाव ढमढेरे* येथे / *"दुसरा शिलालेख"* हा इसवी १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *अक्षी* येथे / *"तिसरा शिलालेख"* इसवी सन १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *हत्तरसंग कुंडल* येथे / *"चवथा शिलालेख"* हा इसवी १०३९ सालचा कर्नाटक राज्यातील *श्रवणबेळ गोळ* येथे सापडलेला आहे. मराठी भाषेला ढोबळमानाने १८०० वर्ष झालेली असुन *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी २००० वर्ष आवश्यक असल्याने, बौध्द सातवाहन राजे ह्यांच्या *"नाणेघाट शिलालेखाचा"* आधार हा घ्यावा लागलेला आहे. *"मराठीची आद्य कवि"* संत नामदेव महाराज ह्यांच्या परिवारातील *संत जनाबाई* (जन्म १२५८)  / तसेच संत चोखामेळा महाराज परिवारातील *संत निर्मळाबाई / संत सोयराबाई* ह्यांना मात्र ब्राह्मणी साहित्यिक वर्गाने दुर्लक्षित केल्याचे दिसून येते. परंतु ब्राम्हणी *संत ज्ञानेश्वर महाराज / मुकुंदराज* ह्यांचा मात्र खुप उदोउदो करण्यात आला. ज्ञानेश्वर महाराज ह्यांनी रेड्याकडुन वेद म्हणवले / भींत चालवली अश्या चमत्काराचे वर्णन हे *"विज्ञान युगात"* शक्य आहे काय ? हा प्रश्न आहे.

           तथागत बुध्दाच्या महापरिनिर्वाणानंतर "बुध्द धर्म"  हा *"हिनयान / महायान"* ह्या दोन संप्रदायात विभागला गेला. महायान संप्रदायाने *"वज्रयान संप्रदायाला"* जन्माला घातले आहे. मग वज्रयान संप्रदायाने *"तंत्रयान संप्रदायाला"* जन्माला घातले. इसवी ८५० साली *शंकर* ह्या नावाच्या व्यक्तीचा जन्म होतो. त्याला *"प्रच्छन्न बौध्द"* ही म्हटले आहे. इसवी नवव्या - दहाव्या शतकात वज्रयान / तंत्रयान संप्रदायाने *"शैव पंथ / वैष्णव पंथ/ शाक्त पंथ"* ह्याला जन्माला घातले. पुढे शंकर ह्या व्यक्तिने स्वतःला *आदि शंकराचार्य* म्हणवुन महायान बौध्द विहारावर आपले अधिपत्य निर्माण केले. आणि त्याने चार पीठाची स्थापना केली. उत्तर - ज्योतिर्मठ पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - श्रृंगेरी पीठ रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) / पुर्व - गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम - शारदा पीठ द्वारका गुजरात (सामवेद). *"कागदाचा शोध"* हा इसवी दहाव्या शतकात *चीन* ह्या देशात लागला. समस्त वेद / उपनिषद / मनुस्मृती / रामायण / महाभारत हे ग्रंथ केवळ *"कागदावर"* अंकित आहेत. ते *"शिलालेख / ताम्रपट / ताडपत्र"* ह्यावर अंकित दिसत नाहीत. *ऋग्वेद* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत ही *"युनोस्कोला"* काहींच्या मते इसवी १४६२ साली तर काहींच्या मते २००५ साली पाठविली आहे. अजुन काय पुरावा हवा आहे ? हा प्रश्न आहे. *महात्मा ज्योतिबा फुले* ह्यांनी सन १९४८ साली पुण्यात *"पहिली मुलींची शाळा"* सुरु केली होती. *सावित्रीबाई फुले* ह्या भारतातील *पहिल्या महिला शिक्षिका* ठरल्यात. फुले दाम्पत्याला ह्या शिक्षण मिशनमध्ये झालेला त्रासावर खुप काही लिहिले जावु शकते. आणि ह्यावर चर्चा पुढे पुन्हा कधी तरी करू या. *डॉ बाबासाहेब आंबेडकर* ह्यांनी २५ नोव्हेंबर १९४९ ला *"संविधान सभेत"* भारतीय संविधान हे मंजुर केले होते. २६ जानेवारी १९५० रोजी *"भारतीय संविधान "* लागु होवुन *"प्रजासत्ताक राष्ट्राची"* निव रचल्या गेली. अर्थात *"संस्कृती संविधान"* (मनुस्मृती) हिला मुठमाती देवुन नव्या *"संविधान संस्कृती"* (संविधान) ची बीजे रोपण झाली. समस्त भारतातील लोकांना *"समानता / स्वातंत्र्य / न्यायाच्या सुर्याचा उदय"* झाला. तरीही *"स्त्रीयांच्या अधिकाराचा मोठा प्रश्न"* होता. बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी *"४ वर्षे ४ महिने २४ दिवस"* खुप मेहनत घेवुन *"हिंदु कोड बील"* संसदेत सादर केले होते. परंतु सप्टेंबर १९५१ ला सदर बील नामंजूर करण्यात आले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी *"कायदे मंत्री"* पदाचा राजीनामा दिला. पुढे मात्र पहिल्या लोकसभेत सदर बील मंजूर झाले. आणि स्त्रीयांच्या उन्नतीची खरी पहाट सुरु झाली. एकदंरीत *"भारतीय स्त्रीच्या अधिकार आणि स्वातंत्र्य"* इतिहास हा असा आहे. पण आज तुमच्या ह्या *"साहित्य लिखाणावर"* पुनश्च  ह्या *ब्राम्हणी व्यवस्थेने आपले अधिपत्य* चालविले आहे. हा *अधिकार* आता आम्ही मिळविणार आहोत काय ? हा मात्र प्रश्न आहे. कारण प्रश्न हा आपल्या इच्छा शक्तीचा आहे. फुले दाम्पत्त / डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी आम्हाला *"धर्मांधता / देवत्व"* ह्या रूढी मानसिकतेतुन बाहेर काढले आहे. पण आताची पिढी पुनश्च स्वतःवर *"मानसिक गुलामी"* लादत आहे ! ह्याला आम्ही काय म्हणावे ?

         जय भीम !!!


-------------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १२ नोव्हेंबर २०२५

(नोट - हा लेख तुम्हाला महत्वाचा वाटल्यास पुढे फारवर्ड करावा)

Monday, 10 November 2025

 🧜‍♀️ *प्राचिन बौध्द साहित्यातील सौंदर्यशास्त्र आणि नैतिकवाद  !* (मराठी भाषेवरील ब्राम्हणी साहित्य मक्तेदारीला आम्ही शह देणार काय ?)

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

एक्स मेडिकल ऑफिसर एवं हाऊस सर्जन 

आंतरराष्ट्रीय परिषद संशोधन पेपर परिक्षक 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


             बौध्द धर्मामध्ये सौंदर्यशास्त्र म्हणजे *"जीवनातील आंतरिक मुल्य म्हणून आनंद घेणे होय."* सौंदर्यशास्त्रातुन जीवनाचे मुल्य म्हणून आनंद घेण्याची मुलभुत धारणा योग्य मानली जाते. आणि *"जग आणि जीवन"* ह्यांना आंतरिक मुल्य मानलेले आहे. *"निर्वाण"* म्हणजे जे आहे तसेच आहे, असा साधा आणि सोपा अर्थ दिलेला आहे. बौध्द धर्म हा *"निरिश्वरवादी / अध्यात्मवादी / समतावादी / विज्ञानवादी / मानवतावादी / नैतिकवादी"* असा धर्म आहे. प्राचिन बौध्द काळातील विविध मान्यवरांच्या बौध्द ग्रंथांचा संदर्भ हा देता येतो.आणि त्यामध्ये धर्मग्रंथ / भाष्य / काव्यात्मक भावांचा उल्लेख करता येईल. बुध्दाच्या शिकवणुकीचे जतन करणे मग ते आलेचं. बौध्द साहित्याची उत्पत्ती / वैशिष्ट्ये / प्रमुख कालखंड / महत्वपूर्ण ग्रंथ / विविध सांस्कृतिक आणि बौध्दिक परंपरा / प्रभाव ह्या संदर्भात आपल्याला तपशीलवार अभ्यास करणे हे फार गरजेचे आहे.‌ *"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या नगरीय सभ्यतेमध्ये पहिला बुध्द  *ताण्हणकर बुध्द* पासुन २८ वे बुध्द *शाक्यमुनी बुद्ध* पर्यंतचे सर्व जीवन संदर्भ - लिपी - भाषा साहित्य, ही सौंदर्यशास्त्राचा बोध करुन जातो. निसर्ग मैत्रीचा संदर्भ देतो. सिंधु सभ्यतेतील चित्र असो वा डॉंस करणारी सुंदर स्त्री प्रतिकृती हे सर्व काही सौंदर्यशास्त्र भावनेची अनुभुतीचं आहे नां !

           प्राचिन बुध्द साहित्यातील बरीच पात्रे ही सौंदर्यशास्त्र विषयाचे बोध करणारी आहेत. वैशाली राज्याची नगरवधु *"आम्रपाली"* हिच्या जन्मापासुन ते तिचे *"अर्हत"* अवस्थेला जाणे, ह्यामधील कालखंड हा आम्रपालीच्या सौंदर्य भावनेची अनुभुती देतो. आम्रपाली हिचे नगरवधु बनने / मगध राजा *बिंबिसार - आम्रपाली* ह्या दोघांचे निस्सीम प्रेम होणे / मगध द्वारा वैशाली वर आक्रमण / आम्रपाली हिच्यावर असणा-या राजा बिंबिसाराच्या निस्सिम प्रेमामुळे युध्द बंद होणे / आम्रपाली हिला तिचा प्रेमी *"हा मगध देशाचा राजा आहे,"* म्हणुन देशप्रेमातुन दोघांचा वियोग होणे / बिंबिसाराचा पुत्राला आम्रपालीने - विमल कौंडिण्य ह्याला जन्म देणे / रस्त्याने जाणा-या एका युवा बौध्द भिक्खुला आम्रपाली हिने तिच्या महालात चार महिने वर्षावासाला निमंत्रण देणे / चार महिन्यांनंतर युवा बौध्द भिक्खु समवेत आम्रपाली हिने स्वतः भिक्खुचे वस्त्र घालुन बुध्दासमोर दीक्षीत होणे / आम्रपाली द्वारा आपला आलिशान महल - आपले आम्रवन बुध्दाला दान देणे / आम्रपाली हिचे *"अर्हत"* बनने / नंतर  आम्रपाली - राजा बिंबिसाराचा मुलगा विमल कौंडिण्य ह्यांचे बौध्द भिक्खु बनने, आम्रपाली हिच्या ह्या समस्त जीवन कार्यात आम्ही *"सौंदर्यशास्त्र"* शोधणार आहोत की नाही ? हा प्रश्न आहे. *कालीदास* ह्याची रचना *"अभिज्ञान शाकुंतलम्"* ह्यामध्ये *"राजा दुष्यंत - शाकुंतला"* ह्यांच्या प्रेमाच्या संबंधातील, शांकुतला हिच्या अंगप्रदर्शनाचे अश्लील वर्णन, हा *"भोगवाद"* संदर्भ देवुन जातो. परंतु बौध्द साहित्यात *"आम्रपाली"* हिच्या निस्सिम प्रेमाच्या संबंधात नैतिकता ही जोपासलेली दिसुन येते. अर्थात बौध्द साहित्यात *"सौंदर्यशास्त्र वर्णनात नैतिकवाद"* जोपासलेला दिसुन येतो, हे समजून घेणे गरजेचे आहे.

             *"सिंधु घाटी सभ्यता"* कालखंड  (पुर्व सिंधु सभ्यता इ. पु. ७५०० - ३३०० / सिंधु सभ्यता इ. पु. ३३०० - २६०० / परिपक्व सिंधु सभ्यता इ. पु. २६०० - १९००) हा नगरीय सभ्यतेचा इतिहास आहे. **ब्राम्हण सभ्यता"* इतिहास हा *"ग्रामिण ऋषी सभ्यतेचा"* इतिहास आहे. परंतु सिंधु घाटी सभ्यतेमध्ये कुठेही (?) *"ग्रामीण ब्राह्मण संस्कृतीचा"* आढळुन आलेला नाही. अर्थात ब्राह्मणी संस्कृतीचा *"शिलालेख / ताम्रपत्र / ताडपत्र"* असा ठोस पुरावा आढळुन आलेला नाही. त्यामुळे *"विदेशी आर्य ब्राह्मण थेअरी"* हा इतिहास एक प्रश्न चिन्ह आहे. *"सिंधु घाटी सभ्यता लिपी"* ही अजुनही वाचली गेलेली नाही. इसा पुर्व सातवी - सहावी शतकातील *शाक्यमुनी बुध्द* ह्या कालखंडातील *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही वाचली गेलेली आहे. बुध्द कालखंडात बोली भाषा ही *"पाली प्राकृत"* भाषा होती. पुढे पाली भाषेवर संस्कार करण्यात आले. आणि *"हिब्रू संस्कृत"* ह्या भाषेचा जन्म झाला. लिपी मात्र ही *"ब्राम्ही लिपी"* होती. तर सध्याची संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत"* भाषा असुन, तिची लिपी ही *"देवनागरी"* आहे. *चक्रवर्ती सम्राट अशोकाचे शिलालेख "* ही बौध्द संस्कृतीची साक्ष आहे. प्राचिन काळातील *"बम्हण"* हा शब्द *"ब्राम्हण"* ह्या अर्थी नसुन, बम्हण हा शब्द *"समन / श्रवण / विद्वान"* ह्या अर्थाने प्रयोगात होता. ब्राम्हण संस्कृतीची *"चातुर्वर्ण्य पध्दती"* ही सुध्दा बुध्द कालखंडात अस्तित्वात नव्हती. तर *"वंश पध्दती"* हिच अस्तित्वात होती. जसे - शाक्य वंश / कोलिय वंश / मौर्य वंश / हरयक वंश / कुशाण वंश / नाग वंश / शुंग वंश / शक वंश / गुप्त वंश / पाल वंश.

            प्राचिन बुध्द कालखंडात मौर्य वंश / हरयक वंश आदी वंशाची सत्ता होती. पुढे तर बुध्द धर्म हा *"हिनयान - महायान"* हा दोन विचारधारेत विभागला गेला. *"त्रिपिटक ग्रंथ"* (सुत्त पिटक / विनय पिटक / अभिधम्म पिटक) हा हिनयान संप्रदाय संबंधित ग्रंथ मानला जातो. तसेच *"आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ह्या विद्वानांचा बोलबाला दिसुन येतो. महायानी *वसुमित्र* रचित अभिधम्म / प्रकरण पादशास्त्र / धातुकाय पादशास्त्र, *आचार्य कल्याणी पुत्र* रचित दिव्यावदान, *नागार्जुन* रचित मध्यमिका कारिका, शुण्यवाद,  *आर्य देव* रचित चतु:शतक, *मैत्रीनाथ* रचित अभिसमयालंकार, *असंग* रचित महायान सुत्रालंकार, *दिग्नाग* रचित न्याय प्रवेश, *धर्म किर्ती* रचित न्यायबिंदु, *आचार्य शांतीदेव* रचित बौध्दाचार्य अवतार, *आचार्य अश्वघोष* रचित बुध्दचरित्रम् / सौदरानंदम् / वज्रसुची / शारीपुत्रप्रकरणम् / उर्वशी वियोग / राष्ट्रपाल ह्या ग्रंथाचे लेखन झालेले दिसुन येते. *हिनयानी ग्रंथ* म्हणुन प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती  हे प्रमुख ग्रंथ तर *महायानी ग्रंथ* म्हणुन प्रज्ञा पारमिता / सद्धर्म पुण्डरीक / ललीत विस्तार / अट्ठसहस्त्रिका / महावस्तु / लंकावतार सुत्र / दशभुमीश्वर / नागानंदा ह्या ग्रंथाचा उल्लेख करता येईल. *"बुध्द वंस"* ह्या प्राचिन ग्रंथात *"बुद्ध वंशावळी"* दिसुन येते. श्रीलंका देशातील *दीपवंश* (बेटांचा इतिहास) आणि *महावंश* (महान इतिहास) ही ग्रंथ प्राचिन बौध्द साहित्याची साक्ष देतात. *"विशुध्दीमग्ग / जातक कथा"* तसेच *"मिलिंद प्रश्न"* ह्या बौध्द साहित्याचाही विशेष उल्लेख करता येईल. ह्याशिवाय *"गांधार कला आणि मथुरा कला"* ह्या शिल्पकलेचा आविष्कार ही बुध्द धर्माची देणं आहे. अर्थात *"साहित्यातील सौंदर्यशास्त्र असो वा कलेतील सौंदर्यशास्त्र"* हा बुध्द धम्माचा अविष्कार आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

           बौध्द साहित्यातील *"प्रेम भाव"* संदर्भात *बोधिसत्त्व अश्वघोष* ह्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या *"उर्वशी वियोग"* या नाटकाचा संदर्भ देता येईल. अश्वघोष लिखित *"बुध्दचरित्रम्"* हे महाकाव्य बुद्ध जीवनावर आधारित आहे. तर *"सौदरानंदम्"* हे महाकाव्य बुद्धाचा चुलत भाऊ *आनंद* ह्यांच्या बुद्ध धम्माच्या दीक्षित प्रसंगावर आधारित आहे. बोधिसत्व अश्वघोष ह्यांचा जन्म इ. पु. १५० चा आहे. अश्वघोष ह्यांच्या साहित्यात *"सौंदर्यशास्त्र / नीतिशास्त्र / दर्शन शास्त्र / मानवशास्त्र / नैतिक वाद"* ह्या उदात्त भावाची अनुभुती होते. तर *कालिदास* ह्यांनी "अभिज्ञान शाकुंतलम् / विक्रमोर्वशीयम् / कुमारसंभवम् / रघुवंशम् / मेघदुतम् / ऋतुसंहारम्"  समान एकुण ४० रचना लिहिल्याचे सांगितले जाते. परंतु *"कालिदास ह्यांचा जन्म कधी - कुठे झाला तसेच त्यांचा मृत्यु कुठे - कधी झाला ???"* अर्थात कालिदास हे *"काल्पनिक पात्र "* आहे काय ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. ह्याशिवाय कालिदास ह्यांच्यावर अश्वघोष ह्यांच्या साहित्याचा प्रभाव दिसुन येतो. तसेच कालिदास ह्यांचे सर्व लिखाण हे *"संस्कृत"* भाषेमध्ये असले तरी काही प्रमाणात *"अपभ्रंश भाषेचा प्रभाव"* हा दिसुन येतो. *"हिब्रू संस्कृत"* भाषा हिच्या नंतर इसवी सहाव्या सातव्या शतकात *"अपभ्रंश भाषा"* ही उदयास आली. पुढे इसवी १२ व्या शतकामध्ये *"आदि हिंदी भाषा"* ही उदयाला आली. आणि *"सामान्यतः पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदी हिंदी होय."* हे समजून घेणे गरजेचे आहे.

               भारतातील लिपीला *"ब्राम्ही लिपी"* द्वारा उगम आधारे *क्षेत्रानुसार दोन भागांमध्ये* विभागता येईल. एक - *उत्तरी धारा* - गुप्त लिपी / कुटील लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / देवनागरी लिपी. दुसरी - *दक्षिणी धारा* - तेलगु लिपी / कन्नड लिपी / तामिळ लिपी / मल्याळम लिपी / कलिंग लिपी / ग्रंथ लिपी / मध्यवेशी लिपी / पश्चिमी लिपी. ह्याशिवाय भारतातील *"खरोष्टी लिपी / चित्र लिपी / शंख लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"*:ह्या प्राचीन लिपी प्रकाराचा उल्लेख करावा लागेल. *"देवनागरी लिपी"* ही इसवी ११०० मध्ये *"प्रथम प्रारूप"* स्वरुपात उदयास आली. आणि इसवी १७९६ ला देवनागरी लिपी ही व्यवहारात आली. *"उर्दु भाषा"* कालखंड हा इसवी १६४५ आहे. इसवी १८ व्या शतकात *"आधुनिक हिंदी भाषा"* ही उदयास आली. *मराठी भाषा"* हिचा पहिला शिलालेख इसवी ७०५ सालचा पुणे जवळील *"तळेगाव ढमढेरे"* येथे सापडला आहे. दुसरा शिलालेख हा इसवीज १०१२ सालचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी आढळला. तिसरा शिलालेख इसवी १०१८ सालचा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुंडल"* येथे सापडला. चवथा शिलालेख इसवी १०३९ सालचा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडलेला आहे. मराठी भाषातज्ज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी मराठीचे मुळ हे *"तामिळ भाषेतुन"* मानलेले आहे. *डॉ श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केली आहे. *दुर्गा भागवत* ह्यांनी राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी भाषा मानलेली आहे. परंतु सदर संस्कृत ही *"क्लासिकल संस्कृत भाषा"* होय, हे समजणे गरजेचे आहे. तर *प्रा. हरी नरके* ह्यांनी *"मराठी भाषा ही इसवी पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचीन म-हाटी भाषेपासून शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासुन मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती झाली"* असा जावई शोध लावला. मराठी भाषेची *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी/ व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार झालेले आहेत. मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्यासाठी *"२००० वर्षांचा इतिहास"* आवश्यक असल्यामुळे *"सातवाहन बौध्द काळातील नाणेघाट शिलालेख"* हा संदर्भ घ्यावा लागलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अशी कसरत करावी लागली, हे समजून घेणे गरजेचे आहे.

            महायान बौध्द संप्रदायातुन *"वज्रयान संप्रदाय"* चा उदय झाला. वज्रयान संप्रदायातुन *"तंत्रयान संप्रदाय"* उदयास आला. वज्रयान - तंत्रयान संप्रदायाने *"शैव पंथ/ वैष्णव पंथ/ साक्त पंथ"* ह्यांना जन्माला घातले. इसवी ८५० साली *शंकर* नावाचा व्यक्ति जन्माला येतो. त्याला *"प्रच्छन्न बौध्द "* ही म्हटले जाते. पुढे तो *नवव्या - दहाव्या* शतकात *आदि शंकराचार्य* बनुन चार पीठाचे गठण करतो. उत्तर - ज्योतिर्मय पीठ, बद्रीनाथ उत्तराखंड (अथर्ववेद) / दक्षिण - ऋंगेरी पीठ, रामेश्वरम् केरल (यजुर्वेद) /  पुर्व -: गोवर्धन पीठ पुरी ओरिसा (ऋग्वेद) / पश्चिम शारदा पीठ द्वारका गुजरात (सामवेद). इतकेच नाही तर महायान बौध्द संप्रदायाच्या बौध्द मठावर आपले अधिपत्य करतो. *"कागदाचा शोध दहाव्या शतकात चीनमध्ये लागलेला आहे."* अर्थात *"वेद / उपनिषद / रामायण/ महाभारत"* ह्या ग्रंथाची उत्पत्ती ही *"दहाव्या शतकानंतर"* झालेली आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण सदर *"ब्राह्मणी ग्रंथाचे प्राचिन शिलालेख"* प्रमाण उपलब्ध नाहीत. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत *"युनोस्को"* ला काहींच्या मते इसवी १४६२ साली तर काहींच्या मते २००५ साली पाठविण्यात आली आहे. अर्थात *"वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म"* हा इसवी अकराव्या - चौदाव्या शतकातील आहे, हा पुरावा म्हणायला हवा. प्रश्न हा की, मग *"ब्राह्मण वर्ग हा हिंदू धर्मीय कसा झाला ?"*  कारण हिंदु धर्म हा *"मुस्लिम / इंग्रज शासन काळात"* उदयास आला, हा इतिहास आहे.

         ‌‌ प्राचिन बौद्ध साहित्यापासुन भारतातील समस्त भाषीक साहित्याचा उगम हा झालेला आहे. त्याचा वरील संदर्भ हा पुरावा म्हणायला हवा. *"मराठी भाषा साहित्यावर असणारी ब्राह्मणी मक्तेदारी ही अन्य साहित्य वर्गातील साहित्यिक समाजाची दमन नीति सांगणारी दिसून येते."* प्रश्न हा की, अन्य साहित्यिक वर्गाने ही ब्राह्मणी साहित्य दमनगिरी कुठपर्यंत ती सहन करावी ? की *"कांग्रेसी गवताप्रमाणे"* अन्य साहित्यिक वर्गाने केवल लिखाण करावे आणि ब्राम्हणी साहित्यिक ह्यांच्या ओंजळीने *"गुलामीचे पाणी हे प्राशन"* करावे वा ब्राम्हणी एकाधिकारशाही वर्गाच्या *"बेडवरची शोषित वेश्या"* बनुन जावे, हा राहाणार काय ? हा प्रश्न आहे. आणि साहित्य लिखाणात *"केवल क्रांतीची भाषा"* लिहावी. कृतीशीलता मात्र *"आकाशातील ता-याप्रमाणे दुरवर"* आहे. मराठी भाषा साहित्यातील *"आद्य अग्रणी कवि"* हे शिंपी जातीचे *संत नामदेव महाराज* (२६/१०/१२७० ते २/१२/१२९६) / नामदेव महाराज परिवारातील आणि वयाने वरिष्ठ *संत जनाबाई* (१२५८ ते १३५०) / महार जातीचे *संत चोखामेळा* (१२७३ ते १३३८) ह्यांच्या लिखाणाला आम्ही न्याय देणार आहोत वा नाही ? की केवळ भिक्षेकरी ब्राह्मणी साहित्यिक वर्गाच्या दरवाजावरील कुत्रे बनुन *मुकुंदराज* (१२ वे शतक) / *संत ज्ञानेश्वर महाराज* (१२/०८/१२७५ ते २/१२/१२९६) ह्यांना *"आद्य अग्रणी कवि"* म्हणुन स्वीकार करणार आहोत ? ह्याशिवाय सोनार जातीचे *संत नरहरी सोनार* / चोखामेळा परिवारातील *संत सोयराबाई / संत निर्मळाबाई / संत कर्ममेळा* / ब्राह्मण जातीचे *संत एकनाथ महाराज* / वाणी जातीचे *संत तुकाराम महाराज* (२१/०१/१६०८ ते १९/०३/१६५०) ही सर्व संत मंडळी पंढरपूरच्या *"विठोबा / बुद्ध"* ह्यांना पुर्णतः शरण गेलेली असल्यामुळे त्यांचा साहित्यातील खरा इतिहास रचला गेला नाही. आम्हाला हा इतिहास नव्याने लिहावा / रचावा लागणार आहे. ब्राम्हण धर्माचे *संत रामदास स्वामी* (१६०६ ते १६८२) ह्यांनी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची कास धरल्यामुळे त्यांचा उदोउदो करण्यात आला. तर संत रामदास स्वामी ह्यांचे दुरचे नातलग आणि वरिष्ठ असलेले *एकनाथ महाराज* मात्र वंचित राहातात. महान *छत्रपती शिवाजी महाराज* हे जगतगुरु *संत तुकाराम महाराज* ह्यांना गुरु मानले असतांना, ब्राह्मणी व्यवस्थेने *संत रामदास स्वामी* ह्यांना गुरु (?) दाखवून खोटा इतिहास लिहिला आहे. आम्हाला हा खोटा इतिहासही मिटवायचा आहे. *ब्राम्हणी व्यवस्थेच्या साहित्यिकांचे साहित्य विश्वातील सौंदर्यशास्त्र कोणते ?*  मग *"नैतिक वाद"* हा विषय खुप दुरवरच्या आहे. अर्थात ब्राह्मणी साहित्यिक (?) ही केवळ *"भोगवादाचे प्रतिक"* आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.

        जय भीम !!!


----------------------------------------

▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        नागपूर दिनांक ९ नोव्हेंबर २०२५

        मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२

Friday, 7 November 2025

🌹 *प्रेमाचा घास हा !*
       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
        मो. न. ९३७०९८४१३८

प्रेमाचा घास हा हृदयी भरवितांना
हे बुध्द सत्याची ती जाणिव दिली...

मनाच्या वेदना ह्या तु जाणतांना
शिक्षण कुशीची ती चेतना दिली
तुटलेल्या ह्या त्या जोड भावनांना
ही सुर्य क्रांतीची ती मशाल दिली...

ह्या दिलेल्या शब्दांना तु जागतांना
कधी ना संग तुझी ती दुरी झाली
हे मायेचा ओलावा आम्हास देतांना
हृदयी करुणा तुझी ती दिसुन आली...

हे समग्र क्रांतीची भाषा ही करतांना 
बुध्द अहिंसेची ना ही ढळता झाली
ह्या वैरत्वा सोडुन मैत्री गीत गातांना
बुध्द संगिताची विश्वाला दिशा आली...

------------------------------------
नागपूर दिनांक ८ नोव्हेंबर २०२५

Wednesday, 5 November 2025

 👌 *भीम सुर्याचा जन्म झाला !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       मो. न. ९३७०९८४१३८


नको छेडु रे ती तार माणसी वेदनांना

आता इथे भीम सुर्याचा जन्म झाला...


परंपरेच्या आलेल्या ह्या दु:ख यातनांना

बुध्दाच्या विचारातुन क्रांती बोध झाला

पुनश्च आलेल्या पेशवी गुलामी पाशांना 

ह्या राजा राणी बंधनातून तो मुक्त झाला...


हे अहिंसा करुणा ती मनात रुजवितांना

बुध्द प्रेम मैत्रीचा संदेश हा जागृत झाला

युध्द की बुध्द हा विवाद जगी रे पेटतांना

बाबांच्या दीक्षा बोध क्रांतीचा उदय झाला...


भीमा कोरेगाव युध्दाची झलक पाहतांना 

तुझ्या सारखे छप्पन हा इतिहास झाला

बाबांनी आपल्या त्या क्रांतीला पेलतांना 

महार शौर्याचा तो इतिहास जागृत झाला...


------------------------------------------

नागपूर दिनांक ५ नोव्हेंबर २०२५

Sunday, 2 November 2025

 🌿  *Who Is the True Founder of Ayurveda — Buddha or Dhanvantari?* (A Research-Based Article)

       ✍️  *Dr. Milind Jiwane “Shakya”*

National President, Civil Rights Protection Cell

Ex–Visiting Professor, Dr. B. R. Ambedkar University of Social Sciences, Mhow (M.P.)

Former Medical Officer / House Surgeon

International Conference Research Paper Evaluator

Mob. No. 9370984138 / 922522692

English Translation: *Adv. Anil Vaidya* (Ex Judge)


🔹 *In My Student Life :*

During our student days, we were taught that “Dhanvantari” was the founder of Ayurveda — and that Dhanvantari was considered an “incarnation of Vishnu.” We were told that the origin of Ayurveda lay in the mythological story of “Samudra Manthan” (the churning of the ocean). However, during my student life, I came across a book titled *"Bharatache Pranacharya”* (The Life-Givers of India) in which the originator of Ayurveda was mentioned as *“Avalokiteshvara”*— meaning “the one who looks upon the world with compassion.” At that time, I was serving as the President of the *"Dr. Ambedkar Ayurvedic Medicos Association"*. The Association regularly organized statewide essay competitions that received overwhelming participation. Later, I published a souvenir titled *“Avalokiteshvara,”* compiling the prize-winning essays. Recently, after listening to *Dr. Rajendra Prasad Singh’s* enlightening lecture *“Buddha is the Real Baidyanath (Bhaisajya Guru),”* those old memories resurfaced in my mind.


🔹 *The Need for Surgery on False History :*

For centuries, false historical narratives have been deeply implanted in our minds. Mere lectures or discourses cannot easily remove these distortions. In medical terms, I would call this condition *“mental paralysis.”* Now, the time has come to perform “historical surgery” to remove the infection of falsehood from our collective consciousness. *"Dhanvantari or Buddha?* Two Opposing Traditions

The ideas that “Dhanvantari is the founder of Ayurveda” and that “Ayurveda emerged from the Samudra Manthan” both originate from Brahmanical texts.

On the other hand, Ayurveda is described as an *“Upaveda of the Atharvaveda.”* If we consider this claim, it implies that the *"Vedic period"* occurred between the 11th and 14th centuries CE.


🔹 *The four Vedic monastic seats (Mathas) established are as follows :*

1. Shringeri Peetha – *Yajurveda* (Kerala)

2. Sharada Peetha – *Samaveda* (Gujarat)

3. Jyotirmath Peetha – *Atharvaveda* (Uttarakhand)

4. Govardhan Peetha – *Rigveda* (Odisha)

These Vedas are written on *"paper, not on palm leaves, copper plates, or stone inscriptions."* Yet, paper was invented in **China only around the 10th century CE"*. This fact itself raises serious doubts about the authenticity of the so-called *"Vedic origin of Ayurveda."*


🔹 *If we look at human history* — from the Stone Age to the Bronze and Iron Ages — people then lived in primitive conditions, often *"unclothed / uncultured."* How, then, could there have existed a gold-adorned Vishnu or Dhanvantari in such a period ? This question alone reveals the mythological nature of these claims. *Buddha’s Era* — A Historical Context *"Modern carbon dating"* has confirmed that Lord Buddha was born in *623 BCE (not 563 BCE).* At that time, there were distinct lineage-based communities — Shakya, Koliya, Haryaka, Maurya, etc. The spoken language of Buddha’s era was *"Pali language"*, and the script was *"Brahmi Script."* In the 1st century BCE, Buddhism split into *"Hinayana and Mahayana traditions."* The Mahayana Buddhists refined Pali and developed what later became *"Hibru Sanskrit."* Today Sanskrit is **Classical Sanskrit "* and script is *"Deonagri."* In the 9th century CE *(around 850 CE), Adi Shankaracharya* was born — a *“crypto-Buddhist”* who later established the *"four monastic Peethas"* and gradually took control over *"Mahayana Buddhist monasteries."* It was during this era that Buddhism declined and the *"Brahmanical / Vedic religion"* rose to prominence (11th–14th centuries CE). Medical Science in the Buddhist Period During the time of the Buddha, great universities such as *"Taxila, Nalanda, Vikramshila, Pushpagiri, Vallabhi, and Odantapuri"* flourished. These centers imparted education in medicine, surgery, nursing, gynecology, obstetrics, and pharmacology. Famous students of that period included Jivaka, Bimbisara, Ajatashatru, and Vasubandhu. Historical evidence from the *"Boer Manuscripts"* discovered in the Kucha region of China mentions Charaka and Sushruta. Both Emperor Ashoka and Emperor Jayavardhana of Cambodia established numerous hospitals and dispensaries for public welfare.


----------------------------------------

Saturday, 1 November 2025

 👌 *हे बुद्ध सुर्याने !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८



ही सांज ना व्हावी रे ह्या प्रात: मनाची

हे बुध्द सुर्याने जगाला शांती दिली ही...


सृष्टी प्रेमाच्या ह्या त्या निसर्ग चक्राची

हिरवळ दाट छाया बिखरे ती जगावर

मृत्यू सत्याच्या ह्या त्या तांडव नृत्याची

भिती हर मनाला कां लागली असे ही...


शब्दांचे निखारे असो वा भाषा प्रेमाची

हे राणी वदले आणि राजा दाढी हाले

शब्दांचे वाटोळे ती ह्या माणसी जगाची

विभिन्न रुपे मनाची ती खुप बदले रे ही...


कालानु परीक्षा ही क्रांती प्रतीक्रांतीची

तो इतिहास झाला नि इतिहास संपला

हा माणुस घडला आणि माणुस संपला

ह्या इतिहासाची नोंद ना खरी दिसे ही...


---------------------------------------

नागपूर दिनांक १ नोव्हेंबर २०२५