Wednesday, 2 April 2025

 

👌 *ह्या हृदयी अंकुरातुन !*

       *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*

        मो. न. ९३७०९८४१३८


ह्या हृदयी अंकुरातुन फुलली ती साद रे

बुध्द शांती दीपातुन अंकुरे भीम नाद रे

बुध्दं सरणं गच्छामी

धम्मं सरणं गच्छामी 

संघ सरणं गच्छामी...


हे उठा झोपल्या ह्या तुझ्या मना राग रे

पक्षांचे किलबिल गाणे आता हे ऐक रे

फुलांच्या बहरण्याने मधु गंधाचा वास रे

बुध्दाच्या करुणेतुन मानवतेचा साद रे...


सुर्याच्या पहाटेने ही रात्र झोपी गेली रे

संध्याच्या साथीची आस चंद्रा लागली रे

ता-यांच्या दोस्तीची रात्र आता झाली रे

बुध्दाच्या शांतीची पहाट ही उगवली रे...


प्रेमाच्या गंधाची मैत्री आता होवु द्या रे

माणसी मानवतेची परिक्षा घडी आली रे

धर्म द्वेष सोडा आता वै-याचे दिन आले रे

बुध्दाचा देश मैत्रीचा हा संदेश जगी द्या रे...


***************************

नागपूर दिनांक २ एप्रिल २०२५

👌 *From this bud of the heart !*

Dr. Milind Jiwane 'Shakya' 

Mob. 9370984138


https://youtu.be/DJ5xfmeHuEw?si=XpwSS9l8WDYz8mAF



No comments:

Post a Comment