✍️ *"वादी-हिन" मराठी कवि लोकनाथ यशवंत, काय हा बिन-बापाची औलाद आहे...?*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो.न. ९३७०९८४१३८ /९२२५२२६९२२
मराठी कवि (?) आणि आमचा एक मित्र *लोकनाथ यशवंत* ह्याला नुकताच "यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान" ह्या एका संघटनेच्या वतीने, *"यशवंतराव चव्हान गौरव पुरस्कार"* देवुन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार स्विकारतांना, त्यानी समाज मनाला एक प्रश्न उपस्थित केला. आणि त्यावेळी तो म्हणाला की, *"मी शेवटच्या मागासलेल्या माणसाचा कवि आहे. मी कुठल्याही विचारधारेचा कवि नाही. तरी मला एका विशिष्ट "वादी" चा कवि कां म्हटले जाते, हे माहिती नाही. "* लोकनाथ ह्याचे हे विचार (?) शब्द वाचुन, मी फारचं विचारात पडलो. कारण लोकनाथ ह्यानी ह्यापुर्वी *"रायपुरे "* ह्या आपल्या मुळ आडनावला, आपल्या जीवनातुन हद्दपार केले. आता तो *आंबेडकर - वादी* (?) हा शिक्का पुसण्याला निघाला नाही. जो व्यक्ती आपली स्व-ओळख लपवितो, तो कोणताही "वादी" राहात नाही. *तो आंबेडकरी तर मुळीच नाही.* तो दलित असु शकतो. त्याला हे माहिती नाही की, "जाती"ची ओळख ही मेल्यानंतरही मिटत नसते. भारत देशामध्ये *"जातीची"* ही विशेषता आहे की, जी जन्मत: चिकटत असते. आणि मेल्यावरही ती कधीचं जात नाही. ही साधी परिभाषा जर, भारतात राहाणा-या आमच्या मित्राला कळत नसेल तर, तो अनपढ असलेला भारतीय नागरिक बरा..! म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ह्या "जाती"ला हद्दपार करण्याकरिता, *"बौध्द"* धर्माची कास धरली. आणि *"बौध्दमय भारत"* अर्थात *"जातिविहिन भारत देश"* करण्याचे स्वप्न बघितले. असो. आपल्या देशात तर बिन-अकल असणारे लोकही कवि बनतात, हे अगदी खरे आहे.
लोकनाथ ह्यानी आपल्या मागे वडिलाचे *"यशवंत"* नाव लिहुन, आपली अशी अलग ओळख दिली. आणि *"आंबेडकर-वादी"* ही ओळख नाकारली. बरे झाले, समाजातील एक घाण कमी झाली. नागपुरात दुसरे *"यशवंत"* मनोहर नावाचे एक मराठी कवि आहेत. *"ते आंबेडकर ही सांगतात. मार्क्स ही सांगतात. केशवसुत ही सांगतात."* ते कोणते "वादी" आहेत, हे समजण्यास वाव नाही. काही महिन्यापुर्वी अजुन एक दलित कवि, *शरणकुमार लिंबाळे* ह्यांनी *"सरस्वती पुरस्कार"* हा सन्मान स्विकारुन, घरी सरस्वती नावाचा तो पुरस्कार ठेवण्याला धन्यता मानली. इतकेच काय त्यांनी *"दलित साहित्याची कास धरली."* अजुन एका अफलातुन मराठी साहित्यिकाची मला आठवण झाली. ते नामांकित नाव आहे *"प्रा. रावसाहेब कसबे."* नागपुरातील माजी सनदी अधिकारी *इ. झेड. खोब्रागडे"* ह्यांनी गांधीवादी संस्थेच्या आर्थिक मदतीतुन *"आंबेडकरी सम्मेलन"* आयोजन केले होते. सदर सम्मेलनात बोलतांना रावसाहेब कसबे ह्यांनी *"आंबेडकरी लोकांनी गांधी समजुन घेणे, हे गरजेचे आहे. "* असे ते बोलुन गेले. त्यावर मी एक छानपैकी लेख लिहुन, सदर विधानाचा मी तिव्र विरोध केला. अलिकडे गांधीवादीला सोबत घेवुन *"प्रा. दिपक खोब्रागडे"* नावाचा माणुस, आंबेडकरी परिषद घेतांना दिसतो आहे. ही फार चिंतेची गोष्ट आहे. निश्चितचं शरणकुमार लिंबाळे असो की, लोकनाथ यशवंत असो की, यशवंत मनोहर असो की, रावसाहेब कसबे असो, ह्यांच्या नावाच्या मागे *"दलित"* हे संबोधन आपण लावायला हवे आहे. मी दलितत्व / दलित साहित्य नाकारले म्हणुन माझे नावाच्या मागे *"शाक्य"* हे संबोधन लावलेले आहे. हे संबोधन लावण्याचा माझा एक इतिहास आहे. मुंबई येथिल एका दैनिकाचा संपादक आणि आमचे मित्र ह्याच्यासोबत *"दलित / दलित साहित्य"* ह्या शब्दावर खुप विवाद चालला. शेवटी मी त्याच्या नावाच्या मागे *"दलित"* हे संबोधन लावले. तो फार चिडुन गेला. तेव्हा मी त्याला माझ्या नावाच्या मागे भगवान बुध्दाच्या *"शाक्य"* कुळाचे संबोधन लावुन, मला हे लिहिण्यात आनंद वाटत आहे, हे सांगितले. तेव्हापासुन माझ्या नावाच्या मागे "शाक्य" हे संबोधन लावित आहे. असो.
दलित / दलितत्व / मागासलेपण हे सर्व भाव, आपण कधीपर्यंत स्विकारायला हवे ? एक संशोधनाचा विषय आहे. लोकनाथ हा स्वत:ला "मागासलेला माणसाचा कवि" असे म्हणवुन घेतो. कुठलाही "वादी" हे शब्द नाकारतो. लोकनाथ यशवंतचे हे शब्द ऐकुण मला *मोहनदास गांधी* ह्यांच्यावर *"Unto the Last"* ह्या पुस्तकाच्या पडलेल्या प्रभावाची आठवण झाली. मी त्या पुस्तकाचे दोन तिन वेळा वाचन केले. मला ते पुस्तक पाहिजे तसे प्रभावी वाटले नाही. ती एक लेखकाची संकल्पना असु शकते. प्रत्यक्ष साकार करणे, हा विषय फार दुरचा आहे. *"समाजातील शेवटच्या माणसाचा उध्दार"* ही संकल्पना प्रत्यक्षात आम्ही साकार कशी करणार...? हा मोठा प्रश्न आहे. आपल्या देशातील राजकारण असो की, सत्ताकारण असो की, न्यायकारण असो की, विचारकारण असो, बुध्दाचा *"बहुजन हिताय, बहुजन सुखाय"* हा विचार प्रत्यक्ष अमलात आणतांना, मला कुणीचं दिसत नाही. मग समाजातील शेवटच्या माणसाचा उध्दार ...!!! एक फार ज्वलंत प्रश्न आहे, भारतातील समस्त साहित्यिक वर्गाकरीता. विचारवंताकरिता...!
* * * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment