Monday, 26 July 2021

 🧕🏻 *महिला यात्री निवारा केंद्र सुरु करण्याबाबत सी.आर.पी.सी. वुमन विंगची मागणी शासनाच्या विचाराधीन...!*

      सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (वुमन विंग) - अर्थात CRPC Women Wing द्वारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री / महिला‌ व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य ह्यांना सीआरपीसी वुमन विंग च्या संस्थापक अध्यक्ष *प्रा. वंदना जीवने* आणि सीआरपीसी वुमन विंगच्या राष्ट्रिय अध्यक्ष *डॉ. किरण मेश्राम* ह्यांच्या नेतृत्वात तसेच सीआरपीसी वुमन विंगच्या पदाधिकारी *आशा तुमडाम / प्रा. डॉ. नीता मेश्राम / प्रा. वर्षा चहांदे / ममता वरठे / ममता गाडेकर / इंजी. माधवी जांभुळकर / इंदु मेश्राम / वनिता लांजेवार / चैताली रामटेके / मीना उके / ऋती गाडेकर* आदींनी मा. जिल्हाधिकारी नागपुर तसेच महापौर आणि आयुक्त नागपुर महानगर पालिका ह्यांना निवेदन देवुन, महाराष्ट्राच्या विविध शहरात तसेच नागपुर शहरात ही *"महिला यात्री निवारा केंद्र"* सुरु करण्याची मागणी केलेली होती. सदर वुमन विंगच्या मागणीची महाराष्ट्र शासनाच्या वतीने दखल घेण्यात आलेली असुन, *महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे* ह्या कार्यालयातुन सेलच्या वुमन विंग ला सकारात्मक पत्र आलेले असुन, सदर *"महिला यात्री निवारा केंद्र"* समस्त महाराष्ट्रात उघडण्याबाबत अजुन सविस्तर माहिती पाठविण्याबाबत सांगितले आहे. सीआरपीसी वुमन विंगच्या *प्रा. वंदना जीवने / डॉ. किरण मेश्राम* आणि समस्त महिला पदाधिकारी वर्गानी महिलांच्या समस्यांच्या  संदर्भात उचललेल्या निर्णयाचे सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल चे राष्ट्रिय अध्यक्ष आणि वुमन विंग चे राष्ट्रिय पेट्रान *डॉ. मिलिन्द जीवने* ह्यांनी अभिनंदन केले आहे.





No comments:

Post a Comment