Wednesday, 5 December 2018

👌 *बुद्धा नमन करतांना....!*
                    *डॉ. मिलिन्द जीवने ''शाक्य'*
                     मो. न. ९३७०९८४१३८

बुद्धा नमन करतांना, भीम मला दिसले
लोक कल्याण करतांना, देश हित जपले...

ह्या धर्मांधी तुफानाला, संविधानाने तरले
देशाच्या विकासाचा, गतीसाद आम्हा कळले
बुद्ध की युध्द, अशा वादात हे जग पडले
बुद्धाच्या करुणेतुन, शांती रूप हे कळले...

दीन हिन पिडितांना, सत्ता वादाने छळले
आयुष्याच्या पर्वणीचे, क्रांती नाद हे कळले
भीम ज्योत पेटतांना, मेघाने फुले सोडले
भारत बुध्द नादाची, ती नीवं आम्हा कळले...

इथे देव वादाने, माणसांचे शव पडले
मानवी रक्ताचे, खरे राजकारण कळले
ना आहारी जावे त्यांच्या, जीवन सुत्र धरले
उठा मित्रांनो आता, वेळेचे हे भान कळले...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment