👌 *ब्राम्ही (धम्म) लिपी - पाली प्राकृत भाषा - प्राचीन बौध्द साहित्य ही तमाम भारतीय भाषा - मराठी - हिन्दी - आंबेडकरी - दलित इत्यादी साहित्याचे जनक आहे.... !*
*डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र
मो. न ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
*"साहित्य"* हा विषय आला की, सहजपणे लिपी - भाषा हे समिकरण आलेचं. जेव्हा आपण *"प्राचिन भारतीय साहित्य"* ह्या अहं विषयाकडे संशोधनात्मक दृष्टीकोनातून बघत असतो तेव्हा, *"पाषाण काल (पुरा पाषाण इ. पु. २५००० - १२०००, मध्य पाषाण काल इ. पु. १२००० - १००००, नव पाषाण काल इ. पु. १०००० - ३५०००) / कांस्य काल (इ. पु. ३३०० - १२००) / लौह काल (इ. पु. १२०० - ५५०)"* ह्या कालखंड सोबतचं प्राचिन भारतातील *"सिंधु घाटी सभ्यता (पुर्व सिंधु घाटी सभ्यता इ. पु. ७५०० - ३३००, प्रारंभिक सिंधु घाटी सभ्यता इ. पु. ३३०० - २६००, परिपक्व सिंधु घाटी सभ्यता इ. पु. २६०० - १९००, उत्तर सिंधु सभ्यता इ. पु. १९०० - १३००)* ह्या कालखंडात आपणास जावे लागणार आहे. आणि *"पाषाण काळात"* चित्र सदृश्य लिपीचा बोध होतो. तसेच *"सिंधु घाटी काळामध्ये"* एक *"वेगळीच चिन्ह लिपी"* दिसुन येते. ती लिपी अजुनही वाचली वा समजली गेली नाही. परंतु प्राचिन सिंधु घाटी उत्खननात *"ध्यानस्थ मुद्रा आणि बौध्द भिक्खु पहरावा असलेला व्यक्ती"* आणि "२८ व्या शाक्यमुनी बुध्दाची ध्यानस्थ मुद्रा आणि घातलेला पहरावा" हा सम - समान दिसुन येतो. *"सिंधु (हडप्पा) घाटी संस्कृतीमध्ये सापडलेले स्वस्तिक चिन्ह"* आणि बुध्दाच्या पादचिन्हातील स्वस्तिकमध्ये समानता दिसुन येते. सिंधु घाटी उत्खननात सापडलेले *"मोठे स्तुप आणि लगतचा तलाव"* आणि वैशाली येथिल स्तुप लगतचा तलाव हे सम - समान दिसुन येते. सिंधु घाटी उत्खननात सापडलेले *"जमिनीवरील गोल चक्राकार सहा आरे स्तुप"* आणि पंजाब राज्याच्या *संगोल* येथिल जमिनीवरील सहा आरे स्तुप हे सम - समान आहेत. सिंधु घाटी उत्खननात सापडलेला *"वृषभ"*(बैल) आणि आंध्र प्रदेश *अमरावती* उत्खननात सापडलेला वृषभ समान आहे. सिंधु घाटी उत्खननात *"कपावर बसलेली सिंह मुद्रा"* आणि चक्रवर्ती सम्राट अशोक ह्यांच्या शासन व्यवस्थेत वापरलेली *"बसलेली सिंह मुद्रा"* ह्यामध्ये समानता आहे. अर्थात सिंधु घाटी सभ्यता काळामध्ये *"पहिला बुद्ध - ताण्हणकर बुद्ध"* हे होवुन गेल्याचे आणि ती बुद्ध परंपरा पुढे - पुढे चालत २८ वे *"शाक्यमुनी बुध्द"* पर्यंत आलेली दिसुन येते. *"सिंधु काळातील "लिपी" ही अजुन पर्यंत वाचणे / उलगडणे शक्य झाले नाही."* परंतु इ. पु. ५ - ६ व्या शतकात *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) उदयास आली. चक्रवर्ती सम्राट अशोक निर्मित प्राचिन शिलालेख हे *"प्राचिन इतिहास घटनेची"* साक्ष देते. प्रमाण देत आहे. *"सिंधु घाटी सभ्यता"* असो की, *"चक्रवर्ती सम्राट अशोकाचे शिलालेख"* असो, त्या काळामध्ये कुठेही *"वैदिक संस्कृतीचा"* गंध / लवलेश हा दिसुन येत नाही. अर्थात तथागत बुध्द काळामध्ये *"वर्णव्यवस्था - जातीव्यवस्था"* ही नव्हतीचं, हे स्पष्टपणे दिसुन येते. वंश वंश ह्यामध्ये संघर्ष हा *"सत्ता वाढ"* वृत्तीचा / प्राप्तीचा होता. त्या काळामध्ये केवळ *"वंश व्यवस्था"* होती, हे स्पष्ट दिसुन येते. जसे की - *"शाक्य वंश / कोलिय वंश / भर्ग वंश / कालाय वंश / मल्ल वंश / बुली वंश / मौर्य वंश / हरयक वंश / कुशाण वंश / नाग वंश / विदेह वंश / शुंग वंश / शक वंश / वाकाटक वंश / पाल वंश"* इत्यादी इत्यादी ही गणराज्य होती. आणि ही सर्व राजे / सम्राट *"बौध्द धर्मिय"* होती.
तथागत बुध्दाचा जन्म हा वैशाख पौर्णिमा इ. पु. ५६३ ला मानला जातो. *"नेपाल देशांमध्ये बुद्धाचा जन्म इ. पु. ६२३ ला साजरा केला जात आहे."* डरहम विद्यापीठतील *प्रा. रॉबीन कनिंगहम* द्वारा केल्या गेलेल्या खोदकामात आणि झालेल्या कार्बन डेटींगमध्ये बुध्दाचा जन्म इ. पु. ६२३ हाच सांगितला आहे. लुंबीनी ह्या पावन स्थळाखाली केलेल्या खोल उत्खननात *"विटाचे मंदिर"* सापडले आहे. पुनश्च त्या खाली केलेल्या उत्खननात *"प्राचिन लाकडाचा मंडप"* हा सापडला. आणि त्या लाकडाच्या मंडपाच्या मधोमध *"शाल वृक्षाची जड"* सापडली. सदर कार्बन डेटींग चा शाल वृक्ष डेटींग कालावधी हा इ. पु. ६०० हा दिलेला आहे. प्रश्र हा आता हा आहे की, *"समस्त विश्वात बुद्धाचा जन्म हा इ. पु. ६२३ (की इ. पु. ५६३ हाच मानायचा ?) ह्यामध्ये एकमतता येणार आहे की नाही ?"* हा आहे. *"कारण सदर नविन संशोधित बुद्ध जन्म तिथी ही अजुन जवळपास ७० वर्षे मागे"* आपल्याला घेवुन जाते. भगवान महावीर ह्यांचा जन्म बुद्ध जन्मानंतर इ. पु. ५४० चा आहे. दुसरा अहं मुद्दा हा सिध्दार्थ हे तथागत बुद्धाचे मुळ नाव *सिध्दार्थ* नसुन *"सुकिती"* हे आहे. तसेच आईचे मुळ नाव हे *महामाया* नसुन *"रुमण देवी"* आहे. मावशीचे मुळ नाव *महाप्रजापती* नसुन *"रुपम"* हे आहे. हा संदर्भ *"सम्राट अशोक शिलालेख"* हे बोलुन जातो. इ. पु. सहाव्या शतकात *"शाक्यमुनी बुध्द "* कालखंडात *"ब्राम्ही लिपी"* (धम्म लिपी) ही उदयास आली. आणि प्रयोग भाषा ही *"पाली प्राकृत"* (कालखंड इ. पु. ६०० - ३५०) ही होती. अर्थात ती बोली भाषा ही होती. ह्यानंतर पाली - प्राकृत भाषेवर संस्कार करण्यात आला. त्या भाषेला *"हिब्रू संस्कृत / हिब्रू पाली"* (इ. पु. ४०० दरम्यान) असे म्हटल्या गेले. आजची संस्कृत भाषा *"क्लासिकल संस्कृत"* ही आहे. पाली - प्राकृत भाषेमध्ये १० स्वर होते. संस्कृत भाषेमध्ये १३ स्वर आहेत. हिंदी भाषेमध्ये ११ स्वर आहेत. अपभ्रंश भाषेमध्ये ८ स्वर आहेत. पाली भाषेत "*वैय्याकरण कच्चायन*" ह्यांनी ४१ ध्वनी सांगितल्या आहेत. पाली भाषेमध्ये *"ऋ, ज्ञ, क्ष, त्र, ऐ, औ, श, ष"* हे शब्द नाहीत. ते समस्त शब्द हे *"संस्कृत भाषेत"* दिसुन येतात. *मॅक्स बैसलर* (जर्मन) ह्यांनी पाली भाषेचा उगम *"पाटली"* (पाटलीपुत्र) ह्या शब्दापासुन झाल्याचे म्हटलेले आहे. तर *पंडित विधुशेखर भट्टाचार्य* ह्यांनी *"पंक्ती"* ह्या शब्दापासून उत्पत्ती सांगितली आहे. *"अभिधम्म दिपिका"* नुसार पाली शब्दाची उत्पत्ती *"पालेति रक्खतीति पालि |"* ही सांगितली आहे. *भिक्खु जगदीश* ह्यांना भट्टाचार्य ह्यांचे विधान मान्य केले नाही. त्यांचे मते *"पाली > परियाम"* म्हटलेले आहे. सम्राट अशोक ह्यांच्या *"भाब्रु शिलालेख"* नुसार *"धम्म पलिपाय"*(अर्थात - बुद्ध वचन) हा संदर्भ दिसुन येतो. *दिपवंश* ग्रंथानुसार *"बुद्ध वचन"* ह्या शब्दाला खरे प्रमाण मानलेले आहे. *सिंहली परंपरा"* नुसार पाली शब्दाची उत्पत्ती *"मागधी / मगध"* ही सांगितली आहे. *प्रा. आर. डेव्हिस* ह्यानी इसवी पुर्व ६ - ७ व्या शतकातील *"कोसल प्रदेश भाषा"* मानलेली आहे. *"पाली"* भाषा उगम संदर्भात बरेचं मतभेद आहेत. परंतु कालखंड संदर्भात विवाद नाहीत. असे म्हणायला हरकत नाही.
*"प्राचिन बौध्द साहित्य / साहित्यिक"* ह्या विषयाच्या अंतरंगात गेल्यावर, बुध्द काळामध्ये *"आचार्य अश्वघोष / आचार्य नागार्जुन / आचार्य आर्यसुरा / आचार्य कुमारल्भ"* ही जगाला उजळुन टाकणारी चार सुर्य दिसुन येतात. ह्याशिवाय अजुन काही नावे आहेत . जसे - *आचार्य अश्वघोष (बुध्द चरित्रम) / आचार्य वसुबंधु / आचार्य वसुमित्र (अभिधम्म, प्रकरण पाकशास्त्र, धातुकला पादशास्त्र) / आचार्य कल्याणीपुत्र (दिव्यावदान) / नागार्जुन (मध्यमिका कारिका) / आर्य देव (चतु:शतक) / मैत्रीनाथ (अभिसमयालंकार) / असंग (महायान सुत्रालंकार) /दिग्गनाग (न्यायप्रवेश)/ धर्म किती (न्यायबिंदु) / आचार्य शांतीदेव (बौध्दाचार्य अवतार)"* ह्यांचा उल्लेख दिसुन येतो. बुध्द धर्म *"प्रथम संगिति"* ह्या भदंत आनंद ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिषदेत *"सुत्त पिटक"* ह्या ग्रंथाची निर्मिती झाली. *"द्वितीय संगति"* ह्या भंदंन्त उपाली ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या परिषदेत *"विनय पिटक"* ह्या ग्रंथाची निर्मिती झाली. चक्रवर्ती सम्राट अशोक काळामध्ये झालेली *"तिस-या संगिंती"* ही *"अभिधम्म पिटक"* ह्या ग्रंथ निर्मितीची कारक झाली. आणि ह्या *"त्रिपिटक"* ह्या ग्रंथाची लिपीबध्दता सर्वात आधी *"सिंहली भाषेत"* (श्रीलंका) करण्यात आली. त्यानंतर इ. स. ४ थ्या शतकात *"आचार्य बुध्दघोष"* ह्यांनी श्रीलंकेत जावुन *"सिंहली भाषी त्रिपिटक"* ग्रंथाचा अभ्यास करुन, त्रिपिटक ह्या ग्रंथाचा *"पाली भाषेत"* अनुवाद केला. ह्याशिवाय *"विशुध्दीमग्ग / अरुणोदय / अट्ठकथा"* ह्या ग्रंथाचे लेखन केले. ह्याशिवाय *"हिनयानी संप्रदाय"* संदर्भित ग्रंथ - *"प्रतित्यसमुत्पाद / निर्वाण प्राप्ती"* ग्रंथाची निर्मिती झालेली दिसुन येते. *"महायानी संप्रदाय"* संदर्भित ग्रंथ - *"महायान श्रध्दोत पद / सद्धर्म पुंडरिक / ललित विस्तार / अट्ठसहस्त्रिका / महावस्तु / लंकावतार सुत्र / दशभुमिश्वर / नागानंदा"* समान ग्रंथांची निर्मिती झालेली दिसुन येते. बुध्द काळामध्ये अजुन बरेच ग्रंथ लिपीबद्ध झालेले आहेत, त्यावर चर्चा पुन्हा तरी करु या. वरील सर्व ग्रंथाच्या आधी *"दिपवंश"* हा बौध्द धर्माचा पहिला प्राचिन ग्रंथ मानला जातो.
.*"सिंधु घाटी सभ्यता लिपी"* ह्या प्राचीन मुलं लिपी नंतर इ. पु. ६ व्या शतकामध्ये *"ब्राम्ही (धम्म लिपी) लिपी"* चा जन्म होतो. सदर लिपीचा प्रभाव हा इ. पु. ३५० पर्यंत दिसून येतो. तदनंतर *"शंख लिपी / खरोष्टी लिपी"* ह्या लिपीचाही प्रभाव हा दिसुन येतो.. त्यानंतर *"कुटिल लिपी / देवनागरी लिपी / शारदा लिपी / गुरुमुखी लिपी / ग्रंथ लिपी / तेलगु - कन्नड लिपी / तामिळ - मल्याळम लिपी / शाहमुखी लिपी / मोडी लिपी"* अशा अनेक लिपी उदयाला येतात. ह्या तमाम लिपीच्या कालखंडाबद्दल, पुन्हा कधी तरी आपण चर्चा करु या. जेव्हा *"देवनागरी लिपी"* ह्या संदर्भात चर्चा होते, तेव्हा *"इसवी आठव्या"* शतकातील *"संस्कृत / हिंदी / मराठी / भोजपुरी / नेपाली / कोंकणी / मैथाली / गढवाली"* ह्या भाषा देवनागरी लिपीचा बोध करतात. *"हिब्रू संस्कृत "* ही भाषा *"ब्राम्ही लिपी"* संदर्भित (पाली भाषेवर संस्कार झालेली हिब्रू संस्कृत भाषा आहे) जुळलेली असुन, नंतर आठव्या शतकातील *"संस्कृत भाषा"* ही *"क्लासिकल संस्कृत"* भाषा असुन तिची लिपी ही *"देवनागरी लिपी"* आहे. बुध्द कालखंडात अभिलेख हे *"लघु शिलालेख / भाबरु शिलालेख / कलिंग शिलालेख / बृहद शिलालेख / स्तंभ शिलालेख / लघु स्तंभ शिलालेख / गुफा लेख"* ह्या प्रकारचे दिसुन येतात. आणि ह्या शिलालेखात कुठेही *"वैदिक संस्कृतीचा"* उल्लेख दिसुन येत नाही. *"धम्म"* (धर्म) ह्या शब्दाची सर्वात प्रथम व्याख्या **ब्राम्ही"* अभिलेखात दिसुन येते. *"अत्तनो सभावं, अत्तनो लक्खनं, धारेति ति धम्म |"* (अर्थात - जो आपल्या स्वभावाला धारण करतो, जो आपल्या लक्षणाला धारण करतो, त्याला धम्म असे म्हणतात). ह्याशिवाय प्राचिन बुध्द काळात *"बम्हण"* हा शब्द *"ब्राह्मण धर्म"* निगडीत नसुन *"बम्हण / श्रवण / समन / विद्वान"* ह्या अर्थाने आहे. ह्याशिवाय सम्राट अशोक काळामध्ये *मेगास्थनिज / एरियन"* सारख्या दोन अलग लेखकांनी लिहिलेल्या *"इंडिका"* ह्या ग्रंथामध्ये *"वर्णाश्रम व्यवस्था "* संदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यांच्या ग्रंथात सात वर्गात व्यवस्थेची विभागणी केलेली दिसुन येते. *"विद्वान वर्ग / खेतीहार वर्ग / पशुपालन - शिकारी वर्ग / कारागीर वर्ग / सैनिक वर्ग / दुकानदार वर्ग / गरिब वर्ग."*
*"कागदाचा शोध"* हा चीन देशामध्ये इ. स. *"९ - १० व्या शतकात"* लागला. बुध्द धर्माच्या पांडुलिपी ह्या कागदावर नसुन त्या शिलालेखावर अंकित आहेत. भारतात कागदाचा प्रयोग हा ९ - १० व्या शतकानंतर आपणास दिसुन येतो. भारतात *"मुर्ती कला"* संदर्भात जन्म *"गांधार कला / मथुरा कला"* ही बौध्द धर्माची देणं आहे. ही कला उगम संदर्भात *"वैदिक संस्कृतीचे"* काही सौख्य नाही. ह्याशिवाय *"विक्रम सवंत (इ. पु. ५७) / शक सवंत (इ. स. ७८) कॅलेंडर"* संदर्भात ही *"बुद्ध धर्माचा"* संदर्भ असुन *"वैदिक धर्माचा"* काडीचाही संबंध नाही. कारण *"वैदिक धर्म"* (इ. स. १० व्या शतकात उदय) हा भारतात तेव्हा उदयाला आला नव्हता. ह्या संदर्भात सविस्तर चर्चा ही पुन्हा कधी तरी करु या. इसवी ८५० पर्यंत बौध्द धर्माच्या *"महायान संप्रदायाचा"* बोलबाला होता. महायान संप्रदायातुन *"वज्रयान संप्रदाय"* आणि वज्रयान संप्रदायातुन पुढे *"तंत्रयान संप्रदायाचा"* जन्म झाला. इसवी ८५० मध्ये महायान / वज्रयान संप्रदायातुन *"शैव पंथ / वैष्णव पंथ / शाक्त पंथ"* हे उदयाला आले. परंतु ह्या तिन्ही प़थामध्ये कोणताही समन्वय नव्हता. महायान संप्रदायाने बुध्दाची *"बोधिसत्व अवलोकितेश्र्वर"* ही संकल्पना उदयास आणली. *"ओम मणी पद्म हुम्"* ही ऋचा सधर्मपुण्डरीक ग्रंथामध्ये दिसुन येते. हिमाचल प्रदेशातील *"तुंदा"* ह्या मठातील (त्रिलोचनाय गाव) १० शतकातील *"अवलोकितेश्र्वर बुद्ध"* प्रतिमा ही साक्ष आहे. ह्यापुर्वी *"वैदिक संस्कृती"* मध्ये मुर्तीची संकल्पना ही दिसुन येत नाही. इ.स. ७८८ मध्ये *शंकर* नावाच्या व्यक्ती जन्माला येवुन तो *"शैव पंथाचा"* उद्गाता बनतो. त्यानंतर भारतात तो चार पीठाचे निर्माण करतो. *"श्रृंगेरी पीठ* रामेश्वरम्, केरळ (यजुर्वेद)/ *शारदा पीठ* द्वारका, गुजरात (सामवेद) / *ज्योतीर्मठ* बद्रिकाश्रम, उत्तराखंड (अथर्ववेद) / *गोवर्धन मठ* पुरी, ओरिसा (ऋग्वेद). तसेच *"१२ ज्योतिर्लिंग"* ची स्थापना केली जाते. *"केदारनाथ"* येथे आदीशंकर ह्यांची समाधी स्थळ आहे. आणि तमाम *"बौध्द विहाराचे"* रुपांतरण ह्या पंथ / संप्रदाय मठात केले गेले. इतकेच काय तर *"जैमिनी / कुमारील भट्ट"* ह्यां दोघानी मग *"वैदिक साहित्य"* जन्माला घातले. *"रामायण"* ह्या काव्य ग्रंथाचा *वाल्मिकी* हा निर्माता नसुन *"संपादक"* आहे. *"महाभारत"* ह्या व्यास रचित काव्याचे मुळ नाव *"जय"* आहे. *"उपनिषद"* इत्यादी वैदिक ग्रंथ सुध्दा. ही सर्व महाकाव्य *"क्लासिकल संस्कृत"* भाषेत असुन, *"देवनागरी लिपीमध्ये"* ती कागदावर अंकित आहेत. प्राचीन शिलालेखावर नाहीत. ह्या विषयावर सविस्तर चर्चा पुन्हा कधी तरी करु या. परंतु सदर काव्य ही *"त्रेतायुग / द्वापर युग"* असा *"ग्लोबल्स तंत्र"* खोटा प्रचार करुन, ती लोकांच्या मानस पटावर बिंबविण्यात आली आहेत.
भारतातील *"सिंधु घाटी सभ्यता"* ह्या संदर्भात वर बरीच चर्चा झालेली असुन, भारतात ह्या व्यतिरिक्त अन्य *"सात संस्कृती"* असल्याचा संदर्भ असुन ह्या विषयावर सखोल संशोधन झालेले दिसुन येत नाही. वा काही विशेष असे अभिलेख दिसून येत नाही. *"कायथा संस्कृती (इ. पु.. २००० - १८०० ) / मालवा संस्कृती (इ. पु. १७०० - १२००) / आहर संस्कृती (इ. पु. २१०० - १५००) / गौरिक मृदभांड संस्कृती (इ. पु. २००० - १५००) / सवालदा संस्कृती (इ. पु. २००० - १८००) / चिरांद संस्कृती (इ. पु. १५०० - ७५०) / जोखे संस्कृती (इ. पु. १४०० - ७००) / परंतु "वैदिक संस्कृती"* ह्या संदर्भात पुनश्च प्रश्नचिन्ह निर्माण होतात. *तथागत बुध्द* ह्यांना *"जगन्नाथ"* म्हटले जात असल्याचा पुरावा हा संस्कृत (क्लासिकल संस्कृत) श्लोक देत आहे. *"प्राणिपत जगन्नाथम् | सर्व जीवा वराचितम् | सर्व बुद्धमय सिध्दीतापिनम् | गगनोपम् |"* कबिरपंथी ग्रंथ *"लक्ष्मण बोध"* ह्यामध्ये म्हटले आहे की, *"अब कल युग बैठेगा सोयी | बौध्द था अपना हमरा कोई | जगन्नाथ मम नाम है सोई | हमरी स्थापना यही भी होई ||"* ह्याशिवाय आलाहहलल काव्यामध्ये बुध्दाबद्दल स्तुती दिसुन येते. *"फिरिमय सुरु जगन्नाथ को | कलियुग बौध्द रुप अवतार ||"* तथागत बुध्द प्राचिनता संदर्भात अजुन काय प्रमाण हवे ?
बुध्द काळातील *"ब्राम्ही लिपी"* आणि पाली - प्राकृत बोली (इ. पु. सहावे शतक ते इ. स. ३५० पर्यंत) भाषा, ह्यानंतर *"पाली भाषा"* ह्यावर संस्कार झाल्यावर *"हिब्रू संस्कृत"*(इ. पु. ४००) ह्या भाषा जन्मावर विवेचन झालेले आहे. ह्यांनतर इ. स. १ ली - ५ वी शती ह्या काळात *"अपभ्रंश भाषा"* प्रभाव दिसून येतो. जसे इतिहासात *चाणाक्य* असल्याचा कोणताही पुरावा *"चक्रवर्ती सम्राट अशोक शिलालेखात"* दिसुन येत नाही. तसेच *कालिदास* ह्यांच्या संदर्भात असे म्हणता येईल. आपण एक वेळ हे जरी मान्य केले असले तरी, कालिदास ह्यांच्या लिखाणात *"अपभ्रंश भाषा"* प्रभाव हा दिसुन येतो. *"वल्लभी दर्शन (इ. स. ५५०) / सिध्द सराहपाद (इ. स. ७६९) / उद्दोत्तर सुरी (इ. स. ७७९) देवसेन (इ. स. ९३४) / आणि शेवटचा अपभ्रंश भाषा कवि रईधु (इ. स. १४००)"* ही नावे देता येतील. ह्यानंतर *"आदि हिन्दी भाषा"* हिचा उदय होतो. *"सामान्यत: पाली प्राकृत भाषेची अंतिम अपभ्रंश अवस्था म्हणजे आदि हिन्दी भाषा होय."* आता आदि हिन्दी भाषेतील साहित्यिक संदर्भात चर्चा करु या. इसवी १२ व्या शतकातील *अब्दुल रहमान* (अद्दाहमान) हे आदि हिन्दीचे पहले कवि मानले जातात. त्यांनी *"संदेश रासक"* ही काव्य रचना लिहिलेली आहे. ह्याशिवाय *"शालिभद्र सुरी (११८४) / अमिर खुसरो (१२५३ - १३२५) / हंसाउली (१३७०) / संत कबिर (१३९९ - १५१२) / रामानंद (१४५०) / कालामितुल (१५८०) / नाभादास (१५८५) / बनारसी दास (१६०१) / गुरु अर्जुन देव (१६०४) / गोस्वामी तुलसीदास (१५३२ - १६२३) / जटमल (१६२३) / आचार्य केशव दास (१६३४)"* ही नावे आहेत. त्यांनंतर इ. स. १६४५ हा कालखंड *"उर्दु भाषा"* उदयाचा कालखंड आहे. तसेच इसवी ११०० ला *"देवनागरी लिपी प्रथम प्रारुप स्वरुप"* मानले जात असुन, इसवी १७९६ पासुन *"देवनागरी लिपी"* हिचा प्रारंभ मानला जातो. आदि हिन्दी भाषेतील आद्य कवि *अद्दाहमान* आणि त्यांच्या नंतरचे आदि हिंदीचे कवि *कबिरदास* ह्या दोघांनी त्यांची जाती *"कोली"* तसेच *"जुलाह"* ही सांगितली आहे. आधी ती दोन्ही कवि ही *"कोली"* जाती निगडीत असुन *"मुस्लिम धर्म"* स्वीकारल्यावर त्यांनी स्वतः:ला *"जुलाह"* जातीचे म्हटलेले दिसुन येते. कोली आणि जुलाह ह्या जातीचा व्यवसाय हा *"विणकाम"* होता. परंतु *"कोळी - कोली"* ही जाती *"कोलिय"* वंशासोबत सलग्न दिसुन येते. जी *"सिध्दार्थ गौतम"* ह्यांची पत्नी *"यशोधरा"* हिच्या कोलिय वंश निगडित असुन त्यांचा व्यवसाय *"विणकाम"* हा होता. आणि म्हणुन *संत कबीर* हे त्यांच्या तथागत बुद्ध संदर्भातील दोह्यात म्हणतात *"झिनी झिनी बिनी चादरीया | जसं के तस घर बिनी चादरीया | अष्ट कमल दल चरखा डोले | पाच तत गुण तिनी चादरीया | पुरब दिशा से उठी बदरीया | अपना अपना मेल संभालो | कर ये खेत निर्वाणी ||"*
*"आधुनिक हिन्दी भाषा"* इसवी १८ व्या शतकात उदयास आली आणि साहित्याकार - *गार्सा तासी* (१८३९) यांना आधुनिक हिन्दी भाषेतील पहिला इतिहासकार मानले जाते. *"उदत मार्तंड (१८२६) / ओम जय जगदीश १८३७) / मौलवी करिमुद्दीन (१८४८) / शिव सिंह सरोज (१८८३) / राजा शिवप्रसाद (१८६८) / अयोध्या प्रसाद खत्री (१८७७) / जार्ज गिअर्सन (१८८८) / मिश्र बंधु (१९१३ & १९३४) / एडविन ग्रिक्स (१९१७) / एफ. इ. के. महौदय (१९२०) / रामचंद्र शुक्ल (१९२९) / हजारीप्रसाद द्विवेदी (१४० - १९५२) / रामकुमार वर्मा (१९३६) / डॉ धिरेंद्र वर्मा / डॉ नगेंद्र (१९७३) / राम स्वरूप चतुर्वेदी (१९८६) / बच्चन सिंह (१९९६) / डॉ मोहन अवस्थी / बाबु गुलाब राय / राजेंद्र प्रसाद सिंह"* अशी लांब यादी आहे. १ में १९५० ला *"हिंदी राजभाषा हिंदी साहित्य संमेलन"* स्थापना केली जाते. ह्यापुर्वी इसवी १८८१ ला *"उत्तरप्रदेश हिंदी प्रयाग"* आणि १८९३ ला *"काशी नागरी प्रचारीनी सभा"* हिची स्थापना केली जाते. *"ऋग्वेद"* ह्या ग्रंथाची प्रमाणित प्रत *"युनोस्को"* ला १४६२ साली उपलब्ध करुन देण्यात आली. तेव्हा *"क्ष, त्र, ज्ञ, औ"* ही अक्षरे असल्याचे प्रमाण दिसत नाही. *"क्लासिकल संस्कृत"* भाषेचा आरंभ *"ऋ"* ह्या अक्षरा पासुन होतो काय ? हा संशोधनाचा विषय आहे.
मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी ७०५ वर्षांचा हा पुणे जवळील *तळेगाव ढमढेरे"* येथे सापडलेला आहे. दुसरा मराठी शिलालेख इसवी १०१२ वर्ष असलेला रायगड जिल्हा अलिबाग तालुक्यातील *"अक्षी"* ह्या गावी सापडला. तिसरा शिलालेख हा इसवी १०१८ वर्ष असलेला हा सोलापूर जिल्ह्यातील *"हत्तरसंग कुडल"* येथे सापडला आहे. चवथा मराठी शिलालेख इसवी १०३९ हा कर्नाटक राज्यातील *"श्रवणबेळ गोळ"* येथे सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिलालेखावर *"स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त सवंत्सरे माघ कधनुळिकाळ छेळा"* असे अंकित आहे. छत्रपती शिवाजी महाराज (१६३६ - १६४६ - १६८०) कालखंडातील सर्व शिलालेख हे मराठी भाषेतील नसुन *"क्लासिकल संस्कृत"* भाषेत आहेत. ह्यावरून शिवाजी महाराज कालखंडात ब्राह्मणी व्यवस्था किती मजबुत झालेली होती, है दिसुन येते. एकंदरीत पाली प्राकृत ह्या भाषेच्या प्रभावाने मराठी भाषेचा उगम झाल्याचे उपरोक्त एकंदरीत विवेचनावरून म्हणता येईल. मराठी भाषातज्ञ *विश्वनाथ खरे* ह्यांनी *"समंत सिध्दांत"* नुसार मराठीचे मुळ हे तामिळ भाषेतून मानलेले आहे. *डॉ. श्री. ल. कर्वे* ह्यांनी सदर विधानाची पुष्टी केलेली आहे. *दुर्गा भागवत* हिने राजाराम शास्त्री भागवत ह्यांच्या संशोधन आधारे *"जुनी माहाराष्ट्री"* भाषा ही संस्कृत पेक्षा जुनी आणि खरी जीवंत भाषा मानलेली आहे. तर बडे बोल *प्रा. हरी नरके* ह्यांनी *"मराठी भाषा ही इसवी सनाच्या पुर्वीपासून अहिर माहाराष्ट्री - प्राचिन म-हाटी भाषेपासुन शौरसेनी भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. आणि शौरसेनी भाषेपासुन कालांतराने मागधी / पैशाची या दोन भाषेची उत्पत्ती मानलेली आहे. अर्थात ती दोन मराठीचे नातवंडे असल्याचा जावई शोध लावलेला आहे."* मराठी भाषा संदर्भात बोलतांना मराठी भाषेचे *"मुख्य मराठी / अहिराणी मराठी / मालवणी मराठी / व-हाडी मराठी / कोल्हापूरी मराठी"* असे पोट प्रकार दिसून येतात. मराठी भाषेचा इतिहास बघता मराठीला १००१ वर्ष झाल्याचे दिसून येते. आणि नविन संशोधन आधारे *"अभिजात दर्जा"* मिळण्याकरीता किमान *"दोन हजार वर्षांचा इतिहास"* असणे गरजेचे आहे. तेव्हा मराठी भाषेला *"अभिजात दर्जा"* मिळण्याकरिता *"सातवाहन काळातील नाणेघाट शिलालेख"* हा आधार घ्यावा लागल्याचे इतिहास बोलुन जातो. मराठी भाषेतील आद्य कवि हे १२ व्या शतकातील *संत नामदेव महाराज (शिंपी) / संत जनाबाई (शिंपी) / संत चोखामेळा (महार)"* ही असतांना ब्राह्मणी व्यवस्थेने मराठी भाषेतील आद्य कवि - *"मुकुंदराज / झानेश्वर महाराज "* ह्यांना मानलेले आहे. कारण संत नामदेव महाराज / संत जनाबाई / संत चोखामेळा ही संत तसेच त्यांनंतर झालेले *"संत एकनाथ महाराज (ब्राह्मण) / संत नरहरी सोनार (सोनार) / संत सोयराबाई / संत मुक्ताबाई / संत कर्म मेळा / संत तुकाराम महाराज (वाणी)"* ही सर्व संत पंढरपुरच्या *"विठोबा अर्थात बुद्धाला शरण"* गेलेली आहेत. हा इतिहास आहे. त्यांच्या अभंगावर चर्चा आपण पुन्हा कधी तरी करु या !
जय भीम ! नमो बुध्दाय !!!
-------------------------------------
▪️ *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर, दिनांक १४ डिसेंबर २०२४